सलॅड आणि फ्रूट्स खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये | Do not drink water after eating salads and fruit

सलॅड आणि फ्रूट्स खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये | Do not drink water after eating salads and fruit

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 

आपल्या सर्वांनाच हे माहित आहे की फळे किंवा सलॅड खाणे जरी चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे अशा समस्या उद्भवतात. संशोधकांच्या मते यामागील सर्वात मोठं कारण आहे कच्ची फळे किंवा सलॅड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिण्याची सवय. आयुर्वेदानुसार देखील कच्च्या भाज्या आणि फळे सेवन केल्यानंतर पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी योग्य नाही. आपल्याला नेहमी मोठ्यांकडून सांगितलं जातं आणि कधी कधी आपण देखील आपल्या लहानग्यांना सांगतं असतो की, काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. पण जर आपण यामागचं कारण विचारलं तर मात्र काही स्पष्ट उत्तर मिळत नाही. मग मनात अनेक प्रश्न येतात. 
1) अनेक फळांमध्ये पाण्याचे प्रमाण हे नैसर्गिकरित्या हे जास्त असते. म्हणूनच फळे खाल्ल्यानंतर तज्ञ् मंडळी पाणी न पिण्याचा सल्ला देतात. फळं खाल्ल्यानंतर जर लगेचच पाणी प्यायल्यास तुम्हाला जठरासंबंधी समस्या उद्भवू शकतात. तसेच ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे अशा फळांवर पाणी प्यायल्यास तुम्हाला कॉलरा देखील होऊ शकतो.

2) फळांमध्ये उच्च प्रमाणात शुक्रोज, फ्रूक्टोज आणि यीस्ट असतं. फळं खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पाणी आणि ऍसिडचा घोळ पोटात यीस्टचा मोठ्या प्रमाणात विस्तार होण्यास मदत मिळते. परिणामस्वरूप पोटात गॅस निर्माण होते आणि पोट फुगू लागतं.पाण्याचं प्रमाण जास्त असणाऱ्या फळांवर पाणी पिल्यास कॉलरा होऊ शकतो. मात्र फळे जर इंफेक्टेड असतील, तरच असं होऊ शकतं, असं तज्ञांचे म्हणणे आहे. अन्न किंवा फळांवर जास्त पाणी पिल्यावर पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं. ज्यामुळे अन्न पचन होण्याऐवजी अन्न आणि पाण्याचं मिश्रण होतं.

3)तज्ञ मंडळी असेही म्हणतात की, फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीर त्या फळांमधील आवश्यक पोषकतत्वे खेचून घेऊ शकत नाही आणि ते खाल्लेले अन्न थेट मलोत्सर्जनातून बाहेर टाकले जाते.
फळामध्ये जास्त प्रमाणात मूलद्रव्ये असतात. पचनासाठी काही ठराविक ऍसिड्सची आवश्यकता असते जे आपल्या जठरात तयार होत असतात. जर फळं खाल्ल्यानंतर आपण लगेच पाणी प्यायलो तर हे ऍसिड्स डायल्युट होतात म्हणजेच त्यांची तीव्रता कमी होते आणि त्यामुळे फळांचे पचन व्यवस्थित होत नाही आणि फळांमधील मूलद्रव्ये शरीरात शोषून घेतली जात नाहीत. तसेच यामुळे काही वेळा अपचन होऊन पोटात गॅस होऊ शकतो आणि काही प्रमाणात पोटही दुखू शकते.

फळामध्ये जास्त प्रमाणात मूलद्रव्ये असतात. पचनासाठी काही ठराविक ऍसिड्सची आवश्यकता असते जे आपल्या जठरात तयार होत असतात. जर फळं खाल्ल्यानंतर आपण लगेच पाणी प्यायलो तर हे ऍसिड्स डायल्युट होतात म्हणजेच त्यांची तीव्रता कमी होते आणि त्यामुळे फळांचे पचन व्यवस्थित होत नाही आणि फळांमधील मूलद्रव्ये शरीरात शोषून घेतली जात नाहीत. तसेच यामुळे काही वेळा अपचन होऊन पोटा

4) फळांमध्ये अधिक प्रमाणात पाणी असतं आणि फळं खाल्ल्यानंतर पाणी पिण्याने अतिसाराचा धोका वाढतो. फळांचे सेवन करताना पोटात आढळणारे बॅक्टेरिया सामान्यपेक्षा अधिक वेगाने कार्बन डायऑक्साइडचं निर्माण करू लागतात ज्यामुळे पोट जड वाटू लागतं. ज्यामुळे ढेकर येण्याची आणि पोटात गॅस निर्माण होण्याची शक्यता वाढू लागते. त्यामुळे फळं योग्य प्रमाणात आणि चावून खावे.त गॅस होऊ शकतो आणि काही प्रमाणात पोटही दुखू शते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या