चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 
मेंदूला होणार्‍या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास चक्कर येणे, भोवळ येणे अशाप्रकारचा त्रास होतो. चक्कर येण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. पण अशावेळेस काही उपचार तात्काळ मिळणे गरजेचे आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवताना दिसत आहेत. मात्र, सततच्या कामाच्या व्यापामध्ये आपण अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करतो. अलीकडील काळात अनेकांमध्ये आढळणारी, पण दुर्लक्ष केली जाणारी समस्या म्हणजे चक्‍कर येणे. बैठी जीवनशैली असणार्‍या तरुणपिढीमध्येही ही समस्या जाणवते. काही वेळा एका जागी बसून राहिले की, उठताना एकदम गरगरायला होते. डोळ्यांसमोर अंधारी येते. अशा वेळी काय करावे ते सुचत नाही. अनेकदा मेंदूमध्ये रक्‍तपुरवठा कमी झाल्याने चक्‍कर येऊ शकते. 

चक्कर येणे हे कदाचित साधेही असू शकते. वरवर दिसणारी ही बाब भयानक रूपही घेऊ शकते. आपण बऱ्याचदा पहिले असेल की मुले शाळेत सकाळची वंदना करताना किंवा कसरत करताना, उन्हात खेळताना वगैरे चक्कर येऊन पडतात, तसेच बऱ्याचवेळेला थकवा आल्यावर, उपवास केल्यावर शरीरातील साखर कमी होते व मग चक्कर येणे स्वाभाविक असते. हे एक त्याचे कारण आहे व हे आपण आपल्या जीवनात अनुभवलंही असणार. पण कैकवेळा ही कुठल्यातरी आजाराची धोक्याची घंटा असते. केव्हा केव्हा चक्कर येते तेव्हा आणखीही वेगळी लक्षणे आपल्याला आढळतात. ती म्हणजे फिके पडणे, घामाघूम होणे, डोके जड होणे, मानसिक दाब, वगैरे. त्यामुळे तुमच्या आसपास कोणाला चक्कर आल्यास घाबरून न जाता त्यांना ही मदत नक्की करा.

1. चक्कर येत असल्यास तुळशीच्या पानांच्या रसामध्ये साखर मिसळून हे मिश्रण घ्यावे किंवा तुळशीच्या पानांमध्ये मध मिसळून हे मिश्रण घेतल्यास चक्कर येणे बंद होईल.

2. चक्कर आलेल्या व्यक्तीचे कपडे खूप घट्ट असतील तर ते थोडे मोकळे करा. बेल्ट, कॉलर, बटणं, स्कार्फ़, जॅकेट थोडे सैलसर कराचक्कर आल्यानंतर लगेजच बाहेर पडू नका. रुग्णाला किमान अर्धा तास आराम करू द्या. त्यानंतर पुन्हा कामाला सुरवात करू द्या.

3. चक्‍कर येण्याचा त्रास असणार्‍यांनी चहा आणि कॉफीचे प्रमाण कमी ठेवावे. या समस्येवर नारळाच्या पाण्याचाही चांगला फायदा होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

4. जर एखाद्याला वारंवार चक्कर येत असल्यास  दहा ग्रॅम धने पावडर तसेच दहा ग्रॅम आवळा पावडर एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्यावे. यामुळे चक्कर येणे बंद होण्यास होईल.

5. काही वेळेस उन्हांत फिरताना, कष्टाच्या कामाने त्रास झाल्यास किंवा प्रवासात डीहायड्रेशनच्या त्रासामुळे चक्कर येऊ शकते. अशा वेळेस रुग्णाला शुद्ध आल्यानंतर इलेक्ट्रोरल पावडरचे पाणी, फळांचा रस किंवा साखर-मीठाचे पाणी, लिंबूपाणी द्या. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलेट बॅलन्स नियमित राहण्यास मदत होते.

6. हल्ली मानेचे विकार जास्त उद्भवलेत. मान हलवल्यावर चक्कर येते. कामावर जाताना बरेचजण दुचाकी वापरतो. तसेच हेल्मेट देखील वापरतो. ते जास्तवेळ परिधान केल्यावर मान आखडते. मग चक्कर यायला सुरुवात होते. कुठल्याही प्रकारचे व्यायाम करायला हल्लीच्या माणसास वेळ नसतो. दिवसाचे ८-१० तास तो ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेला असतो व घरी परतल्यावर बाकी वेळ टीव्हीसमोर किंवा मोबाइलमध्ये घालवतो. तेव्हा मानेचे व कंबरेचे व्यायाम योग्यरित्या, योग्य प्रमाणात, डॉक्टरी सल्ल्यानुसार करणे हे आजच्या काळात जास्त गरजेचे वाटते.

मात्र चक्कर येण्याचा त्रास सतत होत असल्यास किंवा एकाच महिन्यात अनेकवेळा चक्कर येण्याचा त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. चक्कर येऊन गेल्यावरच्या काळात डॉक्टरी सल्ला घ्यावा व उपचार करून घ्यावा, ज्यामुळे चक्कर येण्याच्या आजाराविषयीचे पक्के निदान होणे गरजेचे आहे. डॉक्टरी सल्ला घेतला व चक्कर पळाली…असे म्हणत बेफिकिर होणे बरे नाही. त्यावर लक्ष देणे. परत चक्कर आली तर पुढे ज्येष्ठ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. याबाबत नक्की रोगाचे निदान झाल्याशिवाय स्वस्थ बसणे योग्य ठरणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या