पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती | What is the right time to drink water?

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती | What is the right time to drink water?

पृथ्वीचा सर्वाधिक भाग ज्याप्रमाणे पाण्याने व्यापलेला आहे त्याचप्रमाणे शरीराच्याही अधिक 70% भागात पाणी असते. पाण्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालू असतात. शरीराची योग्य पद्धतीने साफ व्हावे यासाठी पाण्याची आवश्यकता असते. दिवसभरात प्रत्येकाने किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे असे आपण नेहमी ऐकतो. मात्र कामाच्या किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या नादात आपण पाणी पिणे पूर्णपणे विसरुन जातो. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये पाण्याचे विशेष योगदान असते. ही गोष्ट आपल्यापैकी सर्वचजणांना माहीत आहे. पण वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी पाणी पिणं फायदेशीर ठरतं. ही बाब लक्षात घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण जर पाणी पिण्याची वेळ योग्य असेल तर झटपट वजन कमी करण्यास मदत होते. 

1) आयुर्वेदानुसार जेवणापूर्वी पाणी पिणे आरोग्यासाठी अहितकारक आहे. असे म्हटले जाते की, जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो. पचनशक्ती कमजोर होते. पचनशक्तीला आवश्यक असणाऱ्या जठरातील पाचन रसावर जेवणापूर्वी पाणी पिण्याचा परिणाम होतो. त्यामुळे आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे जेवणापूर्वी अर्धा तास अगोदर पाणी प्यावे. 

2) जर तुम्ही काहीही खाण्याआधी पाणी पित असाल तर तुम्ही जास्त जेवणं टाळता. जेव्हा आपल्याला तहान लागते, ती आपल्या शरीराची भूक असते. जेव्हा तुम्ही पाणी पिता, तेव्हा शरीर पाण्यामार्फत शरीराच्या गरजा पूर्ण करतं. ज्यामुळे जेव्हा तुम्ही जेवता, तेव्हा जास्त जेवण करण्यापासून दूर राहाता. ज्या व्यक्ती जेवणाअगोदर जवळपास अर्धा लीटर पाणी पितात. त्या 12 आठवड्यांमध्ये कमीत कमी 1.5 किलोपर्यंत आपलं वजन कमी करतात.

3) जेवताना मधे सारखे पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. मात्र ते आरोग्यासाठी चांगले नसते. फारतर पोळी आणि भात खाण्याच्या मधे दोन घोट पाणी आणि जेवणानंतर दोन घोट पाणी पिणे ठिक आहे. पण त्याहून जास्त पाणी जेवताना पिऊ नये.

4) अनेकांना जेवणानंतर लगेचच क्षणाचाही विलंब न करता ४ ते ५ ग्लास पाणी पिण्याची सवय असते. पण थांबा तुमची ही सवय तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते. आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेचच पाणी पिणे टाळावे. ज्याप्रमाणे जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे जेवणानंतर लगेचच भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने पचनशक्ती कमकुवत होते. आपण जेवणातून खात असलेल्या अन्नात प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते. मात्र जेवणानंतर पाणी प्यायल्याने खाल्लेले अन्न थंड होते. त्यामुळे जेवणानंतर लगेचच पाणी पिण्याची सवय असल्यास तुमचे वजन वाढण्याची शक्यता आहे.

5) जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला जेवण्याआधी 30 मिनिटं कमीत कमी अर्धा लीटर पाणी पिणं आवश्यक ठरतं. जेवणाआधी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने होण्यास मदत होते. 

6) सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला पाहिजे.सुरवातीला 1 ग्लास पासून सुरुवात करावी व हळू हळू सवय लागल्यानंतर 2-3 ग्लास पाणी प्यावे. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.रात्रभर तोंडात जमा झालेली लाळ आपल्या पोटात जाते व लाळ हे एक उत्तम औषध आहे असे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे.त्यामुळे पचन संस्थेचे सर्व आजार कमी होतात.पित्ताचा त्रास ही यामुळे कमी होतो.त्यामुळे सकाळी लवकर उठल्या उठल्या पाणी पिण्याची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे.

7) पाणी उभे राहून पिऊ नये. बसून पाणी प्यायल्याने शरीरात त्याचे जास्त चांगल्या पद्धतीने आवश्यक त्याठिकाणी वहन होते. उभ्याने पाणी प्यायल्याने नसांवर ताण येतो.

8) कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याच्या १० ते १५ मिनिटे आधी एक ग्लास पाणी प्यावं, यामुळे ऊर्जा वाढण्यास मदत होईल. व्यायाम करुन झाल्यानंतर २० मिनिटांनी पाणी प्यावे.

अशाप्रकारे तुम्ही जर पाणी योग्य प्रकारे प्यायलात तर तुम्हाला ह्याचे अनेक फायदे होऊ शकतात.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या