कांद्याच्या सालीचे उपयोग काय आहेत | What are the uses of onion peel?

कांद्याच्या सालीचे उपयोग काय आहेत | What are the uses of onion peel?

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 

कांद्याचे काय फायदे आहेत हे जवळपास सर्वांनाच माहीत असावेत. पण कांदा कापल्यानंतर जी साल आपण कचऱ्यामध्ये टाकून देतो त्याचे फायदे अनेकांना हे माहीत नाहीत. कांद्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला काद्यांची साल उपयोगी पडू शकते. अनेकजण कांद्याशिवाय त्यांच्या जेवणाचा विचारच करू शकत नाही. कांद्याचा आहारात विविध स्वरूपात समावेश केला जातो.जर आपण कांद्याचा वापर करण्यापूर्वी त्याची साले बाजूला काढून ठेवलीत तर ह्या सालांमध्ये लपलेले आरोग्य आणि सौंदर्य विषयक ही रहस्ये जाणून घेतल्यानंतर आपण त्यास फेकणे नक्कीच विसरू शकता -
Image result for onion peel
1. कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
यासाठी, आपण कांद्याची साले रात्रभर पाण्यात भिजवावी आणि सकाळी हे पाणी प्यावे. मला माहित आहे आपल्याला त्याची चव नक्कीच आवडणार नाही, म्हणून आपल्याला हवं असेल तर आपण त्यात प्रमाणामध्ये  मध किंवा साखर मिसळून देखील पिऊ शकता. दररोज याचा वापर केल्याने आपल्याला काही दिवसांत निश्चितच कोलेस्टेरॉल कमी झाल्याचा फरक दिसून येईल.

2. त्वचेची एलर्जी दूर करा -
जर आपल्याला त्वचेच्या कोणत्याही एलर्जी असतील तर आपण वर नमूद केलेल्या पध्दतीचा वापर करुन कांद्याच्या सालाचे पाणी बनवू शकता. (म्हणजे कांद्याच्या सालास रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी कांद्याच्या सालाचे पाणी वापरा) अशाप्रकारे आपण दररोज या पाण्याने आपली त्वचा स्वच्छ करू शकता.

3. केस सुंदर दिसण्यासाठी-
आपण आपले केस चमकदार करण्यासाठी अनेक प्रकारचे कंडिशनर वापरता, तर आतापासून आपण कांद्याची साल पाण्यात टाकून ते पाणी देखील वापरू शकता. हे पाणी आपले केस मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत करेल.

4. चेहर्‍यावरील डाग -
चेहर्यावरील डागांपासून मुक्त होण्यासाठी आपण कांद्याचा रस वापरावा. यासाठी कांद्याच्या सालामध्ये हळद मिसळा आणि डाग असलेल्या जागेवर लावा. तुम्हाला लवकरच तुमच्या चेहऱ्यात फरक दिसेल.

5. घसा खवखवणे-
जर आपल्या घशात खवखवाट झाला असेल तर आपण कांद्याची साले गरम पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास गळ्याशी संबंधित समस्यांमध्ये हा अनोखा कांद्याचा चहा खूप फायदेशीर ठरेल.

6. डास घरापासून दूर -  
कांद्याच्या साली फायदेशीर आहेत. घरातील किडे, कीटकं, डास यांना हटवण्यासाठी फिनाईलप्रमाणेच कांद्याची सालही काम करते.  रात्रभर कांद्याच्या साली पाण्यात भिजत ठेवा. या पाण्याला दुसर्‍या दिवशी खिडकी आणि दरवाज्यासमोर ठेवावे. या पाण्याचा वास उग्र असतो. या वासानेच घरातील किडे दूर जातात. डेंग्यूचे मच्छर हटवण्यासाठीही कांद्याची साल फायदेशीर आहेत.


अशाप्रकारे कांद्याची साले आपल्याला उपयोगी पडू शकतात म्हणूनच ती फेकून न देता त्याचा तुम्ही असाही वापर करू शकता.


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या