पोटावरची चरबी वाढण्याची कारणे | Reasons for increasing fat on the stomach

पोटावरची चरबी वाढण्याची कारणे | Reasons for increasing fat on the stomach

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 

नियमित व्यायाम किंवा खाण्या-पिण्याचे पथ्य पाळल्यानंतरही तुमचे वजन कमी होत नसेल तर सावध व्हा. खरे तर स्थूलपणासाठी काही वेगळेच घटक कारणीभूत आहेत. तज्ज्ञांच्या मते, त्याची खरी कारणे तुम्हाला ठाऊक नसतात. त्यामुळेच ती वजन कमी करण्याचा योग्य उपाय करू शकत नाही.  कोणत्याही औषधांचे सेवन करणे, शारीरिक अशक्तपणावर योग्य उपचार न करणे आणि चुकीचा व्यायाम ही कारणे वजन कमी करण्याच्या योजनेत अडथळा आणू शकतात. 

लठ्ठपणाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. परंतु, काही लोकांची समस्या लठ्ठपणा नाही तर त्यांचं वाढलेलं पोट असतं. वाढलेल्या पोटामुळे तुमचा लूक तर खराब दिसतोच पण इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाहीतर इतरही अनेक गंभीर आजार बळावण्याची शक्यता वाढते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोटोच्या आजूबाजूला काही प्रमाणात चरबी असणं अत्यंत आवश्यक असतं. कारण कंबरेच्या हाडांच्या रक्षणासाठी ती आवश्यक असते. पण पोटाच्या आजूबाला असलेली चरबी म्हणजेच, फॅट्स जर एका ठराविक मर्यादेपेक्षा वाढली तर अनेक गंभीर आजारही बळावू शकतात. जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत, ज्यांमुळे पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढवण्यासाठी जबाबदार ठरतात. 

1) जर आपल्याला एक किंवा दोनदा भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडावी लागेल. आपला आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकावेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा. याने पोटही भरलेलं राहील पोटाचा स्थूलपणा कमी होईल.

2) काही लोकांच्या पोटावर चरबी जमा होण्याचं कारण हे अनुवंशिक असतं. जर त्यांच्या कुटुंबामध्ये आई-वडिलांपैकी कोणा एकाला जरी लठ्ठपणाची समस्या असेल तर त्यामुळे त्यांच्या मुलांनाही ही समस्या होण्याची शक्यता वाढते. 

3) अनेकांचे वजन त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे वाढते. शरीराचा आकारा वाढलेल्या वजनामुळे बेढब दिसतो. मग वेगवेगळे प्रयत्न बाहेर आलेले पोट, वाढलेली कंबर आणि पायांवर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी केले जातात. प्रत्येकाचे वजन वाढण्याचे वेगवेगळे कारण असू शकते. त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याची कारणे उपचार करण्याआधी जाणून घ्यायला हवी.

4) अनेक लोक काहीही काम नसल्यामुळे किंवा तणावामध्ये असल्यामुळे गरजेपेक्षा जास्त खातात. अनेकदा तर या व्यक्ती भूक नसतानाही उगाचच भरपेट खात राहतात. ज्यामुळे त्यांच्या पोटावरील चरबी वाढू लागते. 

5) आहारात जंक फूडचा वापर बदलत्या जीवनशैलीमुळे वाढला आहे. वजन बाहेर खाण्याच्या सवयीमुळे वाढणार नाही याची काळजी घ्यायला हवी. फॅट बाहेरील पदार्थांमध्ये जास्त असतात त्याचबरोबर आरोग्यासाठी त्या गोष्टी किती चांगल्या आहेत याबाबतही प्रश्न असतो. नियमित संतुलित आहार घेतला तर वजन नियंत्रित राहते. त्यामुळे शरीर फिट ठेवण्यासाठी आहार कसा असायला हवा याचा सल्ला तुम्ही तज्ज्ञांकडून घ्यायला हवा.

6) जर एकाद्या व्यक्तीला पचनक्रियेशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्या व्यक्तीच्या पोटावर चरबी जमा होऊ लागते. पचनक्रिया कमकुवत असल्यामुळे त्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

7) शारीरिक हालचाल तशी बैठ्या जीवनशैलीमुळे कमीच झाली आहे. हे परिणाम मोबाईल आणि टीव्हीमुळे लहानमुलंसुद्धा दिसून येत आहेत. पोटावर वाढणारी चरबी ही आपोआप कमी होत नाही, त्यासाठी नियमित व्यायाम आणि चालणे किंवा इतर कामे करणेही तितकच महत्त्वाचे आहे. फक्त बसून राहिल्यानेही अनेक लोकांच्या पोटाजवळील चरबी वाढू लागते. बसल्या बसल्या फक्त मोबाईल, टिव्ही पाहत राहणं यामुळे शारीरिक अॅक्टिव्हिटी फार कमी होते. पोटावर वाढणाऱ्या चरबीमागील हेही एक मुख्य कारण आहे. 

8) जर एखादी व्यक्ती तणावात असेल तर पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढते, परिणामी लठ्ठपणाही वाढतो. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, कार्टिसोल. जेव्हा व्यक्ती तणावात असते त्यावेळी शरीरारील कार्टिसोलचं प्रमाण वाढतं. कार्टिसोल शरीरामधील फॅटचं प्रमाण वाढविण्यासाठी मदत करतो. त्यामुळे कंबर आणि पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढू लागते.

पोटावर चरबी साठणे धोकादायक असू शकते.जर तुम्हाला वर दिलेल्या आरोग्य स्थितीमुळे पोटावर चरबी जमा होत नाही असे वाटत असेल तर तुमच्या जीवनशैलीत बदल करा आणि वाढलेले पोट कमी करा.यासाठी वेळेवर झोपा,नियमित व्यायाम करा,योग्य आहार घ्या व ताण-तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या