व्यायामाचे महत्त्व जाणा | Learn the importance of exercise

व्यायामाचे महत्त्व जाणा | Learn the importance of exercise

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 
व्यायाम म्हणजे आपल्या डोळयासमोर पैलवान किंवा पीळदार शरीरे येतात. असे होण्यासाठी तर व्यायाम लागतोच, पण निरोगी राहण्यासाठीही व्यायाम लागतो हे अनेकांना माहितच नसते. भारतीय समाजामध्ये व्यायामाची आवड कमी आहे. सुशिक्षित सुखवस्तू समाजात तर व्यायामाची आवड अगदीच कमी आहे. भारताताल्या जातिव्यवस्थेमुळे कष्टकरी वर्गाला अन्न कमी तर खाणा-यांना श्रमच नाही अशी परिस्थिती आहे. 
Image result for व्यायामाचे महत्व काय आहे
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीत स्त्रियांना मागच्या-पुढच्या अंगणासह केरकचरा काढायचा असे. गोठा साफ करायचा असे. पाणी विहिरीतून शेंदून भरावं लागत असे. सगळ्यांचे कपडे घेऊन लांब नदीवर जावं लागत असे. हंडाभर ताक घुसळावं लागत असे. त्या बाईला कदाचित वेगळ्या व्यायामाची गरज भासत नव्हती; पण सध्याच्या जीवनशैलीत घरकामानं स्त्रीचा कोणताही व्यायाम घडत नाही. नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर निरोगी राखण्यास मदत होते. व्यायामाने मानसिक आरोग्यही उत्तम राहते. सुदृढ शरीर हीच मोठी संपत्ती आहे.

जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग्यसमस्या जाणवतील. या सर्व हळूहळू वाढणा-या समस्या असल्याने त्यांची मनुष्याला सवय होऊन जाते. व्यायाम न करणेही अंगवळणी पडते. अनेकजण या आळसाचे समर्थन करतात. व्यायामाची आवड लहानपणापासूनच लावली पाहिजे. प्रत्येकाने काही ना काही व्यायाम आयुष्यभर नियमित करायला पाहिजे. व्यायाम म्हणजे नेमके काय हेही समजायला पाहिजे. केवळ थोडेफार चालणे यालाच अनेकजण व्यायाम समजतात. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. सर्व दृष्टीने फायदेशीर होईल असे व्यायाम शोधून ते चिकाटीने नियमित करणे आवश्यक आहे.

सध्याचे जीवन हे धावपळीचे आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. प्रतिकारकशक्ती वाढत असल्याने आजारही पळतात. दररोज साधारण ४५ मिनिटे व्यायाम केला पाहिजे. पीळदार शरीरासाठी व्यायामापेक्षा डाएट महत्त्वाचे असते. २५ टक्के व्यायाम केला तर ७५ टक्के डाएट असावा. व्यायाम केल्यानंतर आठवडयातून एक ते दोन दिवस शरीराला आराम द्यावा. तसेच झोप ही सर्वात महत्त्वाची असते. व्यायामामुळे कार्यक्षमता वाढते. अधिक प्रमाणात व्यायाम करू नये. त्यामुळे शरीर पीळदार बनण्यापेक्षा कडक बनते. पीळदार शरीरासाठी नव्हे, तर धकाधकीच्या जीवनात व्यायाम महत्त्वाचा आहे.

वजन कमी करण्यासाठीच व्यायाम गरजेचा असतो, हा विचार आता जुना झाला आहे. तब्येत ठणठणीत असताना कोणतीही व्याधी जडलेली नसतानाच व्यायामाला सुरुवात करणे हितावह असते. व्यायाम सुरू करायला आता खूप उशीर झालाय, अशी स्थिती नसते. मनात निश्चय करा आणि लगेच सुरुवात करा. कोणतीही गोष्ट कमी वापरू लागला, की ती गमवावी लागते. हा निसर्गनियम आहे. शरीरासाठीही तो लागू पडतो. सध्याच्या यंत्र युगानं इतक्या साधनसुविधा उपलब्ध केल्या आहेत, की त्यामुळे आपल्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. 

स्टेरॉईड वापरावर बंदी आहे. त्यामुळे कोणीही स्टेरॉईडचा वापर करून नये. त्यामुळे अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. स्टेरॉईडमुळे उष्णता, मूळव्याध यांसारखे आजार होतात. तसेच वैवाहिक जीवनातही त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे स्टेरॉईडचा वापर करणे शक्यतो टाळावेच. शरीर संपदा सुदृढ राखण्यासाठी योग्य आहार आणि योग्य दिनक्रमाची गरज आहे. अनेकदा वाढलेले वजन कमी करण्यासाठी खूप जण नाश्ता किंवा जेवण घेत नाहीत. त्यामुळे वजन आटोक्यात येण्याऐवजी वजन अधिक वाढू शकते. म्हणूनच सकाळी नाश्त्याच प्रमाण योग्य असावं. त्यात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेडचे प्रमाण योग्य असणं गरजेच आहे. 

व्यायाम हा मानसिक, शारीरिक ताणतणाव कमी करण्याचा मंत्र आहे. अकाली वार्धक्य दूर ठेवण्याची व्यायाम म्हणजे एक गुरुकिल्ली आहे. कोणतेही काम करण्याची शरीराची क्षमता व्यायामामुळे वृद्धिंगत होते; पण दर्जेदार आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर व्यायामाला पर्याय नाही.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या