बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 

लहानथोरांच्या सर्व प्रकारच्या आजारांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बाहेरून येणा-या पदार्थांचा या संस्थेशी खूप संबंध येतो. दूषित अन्न, अयोग्य अन्न, दूषित पाणी या सर्वांशी संबंध आल्याने या संस्थेच्या आजारांचे प्रमाण जास्त आहे. अन्नपाण्याची योग्य खबरदारी घेतल्याने पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण खूप कमी होते. आपण जे खातो, ते अंगी लागले पाहिजे असे वाटत असेल, तर त्यासाठी योग्य आहार योग्य पद्धतीने पचला पाहिजे, असे घरातील आजी, मोठी माणसे सांगत असतात. कारण, आपण जे खातो ते नीट पचले, तरच शरीराचे पोषण होते. पोटाची काळजी घ्यायची असेल, तर भुकेपेक्षा दोन घास कमी अन्‍न खावे, असेही म्हटले जाते. आपण जे अन्‍न सेवन करतो, ते पचवण्याचे मुख्य काम पचनसंस्था करते. पचनसंस्था व्यवस्थित असेल, तर आहार पचून शरीरापर्यंत पोषणमूल्य पोहोचू शकते. थोडक्यात, पचनसंस्थेचे आरोग्य नीट, तर शरीराचे पोषण योग्य! त्यासाठी पचनसंस्था नीट राहण्यासाठी दैनंदिनीमध्ये काही गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत.

Image result for digestive system

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

डोकेदुखीवर उपाय काय? | How to overcome headaches

डोकेदुखीवर उपाय काय? | How to overcome headaches


खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 
सर्दीनंतर सर्वात सामान्य त्रास म्हणजे डोकेदुखीचा… डोकेदुखी नक्की कशामुळे होते हे नक्की सांगता येत नसले तरी त्यावर घरच्या घरी उपाय करता येतात. काही प्रकारची डोकेदुखी जेवण न घेतल्याने, स्नायूंचा ताण यांच्यामुळेही होते आणि तिच्यावरचा औषधोपचार घरीच केला जाऊ शकतो. परंतु, काही प्रकारची डोकेदुखी गंभीर बाबींशी संबंधित असू शकते आणि त्यामध्ये वैद्यकीय मदतीची गरज भासते. डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांपैकी डोकं दुखण्याची तक्रार असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. जगातील ५० टक्के लोकांचे वर्षभरात एकदा का होईना डोकं दुखतंच, असं जागतिक आरोग्य संघटनेचं सर्वेक्षण सांगतं. कुठल्याही वंशाच्या, कोणत्याही वयाच्या, स्त्री किंवा पुरुषांमध्ये ही लक्षणं आढळतात.
1

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

कांद्याच्या सालीचे उपयोग काय आहेत | What are the uses of onion peel?

कांद्याच्या सालीचे उपयोग काय आहेत | What are the uses of onion peel?

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 

कांद्याचे काय फायदे आहेत हे जवळपास सर्वांनाच माहीत असावेत. पण कांदा कापल्यानंतर जी साल आपण कचऱ्यामध्ये टाकून देतो त्याचे फायदे अनेकांना हे माहीत नाहीत. कांद्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला काद्यांची साल उपयोगी पडू शकते. अनेकजण कांद्याशिवाय त्यांच्या जेवणाचा विचारच करू शकत नाही. कांद्याचा आहारात विविध स्वरूपात समावेश केला जातो.जर आपण कांद्याचा वापर करण्यापूर्वी त्याची साले बाजूला काढून ठेवलीत तर ह्या सालांमध्ये लपलेले आरोग्य आणि सौंदर्य विषयक ही रहस्ये जाणून घेतल्यानंतर आपण त्यास फेकणे नक्कीच विसरू शकता -
Image result for onion peel

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 
मेंदूला होणार्‍या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास चक्कर येणे, भोवळ येणे अशाप्रकारचा त्रास होतो. चक्कर येण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. पण अशावेळेस काही उपचार तात्काळ मिळणे गरजेचे आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवताना दिसत आहेत. मात्र, सततच्या कामाच्या व्यापामध्ये आपण अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करतो. अलीकडील काळात अनेकांमध्ये आढळणारी, पण दुर्लक्ष केली जाणारी समस्या म्हणजे चक्‍कर येणे. बैठी जीवनशैली असणार्‍या तरुणपिढीमध्येही ही समस्या जाणवते. काही वेळा एका जागी बसून राहिले की, उठताना एकदम गरगरायला होते. डोळ्यांसमोर अंधारी येते. अशा वेळी काय करावे ते सुचत नाही. अनेकदा मेंदूमध्ये रक्‍तपुरवठा कमी झाल्याने चक्‍कर येऊ शकते. 

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

व्यायामाचे महत्त्व जाणा | Learn the importance of exercise

व्यायामाचे महत्त्व जाणा | Learn the importance of exercise

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 
व्यायाम म्हणजे आपल्या डोळयासमोर पैलवान किंवा पीळदार शरीरे येतात. असे होण्यासाठी तर व्यायाम लागतोच, पण निरोगी राहण्यासाठीही व्यायाम लागतो हे अनेकांना माहितच नसते. भारतीय समाजामध्ये व्यायामाची आवड कमी आहे. सुशिक्षित सुखवस्तू समाजात तर व्यायामाची आवड अगदीच कमी आहे. भारताताल्या जातिव्यवस्थेमुळे कष्टकरी वर्गाला अन्न कमी तर खाणा-यांना श्रमच नाही अशी परिस्थिती आहे. 
Image result for व्यायामाचे महत्व काय आहे
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीत स्त्रियांना मागच्या-पुढच्या अंगणासह केरकचरा काढायचा असे. गोठा साफ करायचा असे. पाणी विहिरीतून शेंदून भरावं लागत असे. सगळ्यांचे कपडे घेऊन लांब नदीवर जावं लागत असे. हंडाभर ताक घुसळावं लागत असे. त्या बाईला कदाचित वेगळ्या व्यायामाची गरज भासत नव्हती; पण सध्याच्या जीवनशैलीत घरकामानं स्त्रीचा कोणताही व्यायाम घडत नाही. नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर निरोगी राखण्यास मदत होते. व्यायामाने मानसिक आरोग्यही उत्तम राहते. सुदृढ शरीर हीच मोठी संपत्ती आहे.

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

पोटावरची चरबी वाढण्याची कारणे | Reasons for increasing fat on the stomach

पोटावरची चरबी वाढण्याची कारणे | Reasons for increasing fat on the stomach

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 

नियमित व्यायाम किंवा खाण्या-पिण्याचे पथ्य पाळल्यानंतरही तुमचे वजन कमी होत नसेल तर सावध व्हा. खरे तर स्थूलपणासाठी काही वेगळेच घटक कारणीभूत आहेत. तज्ज्ञांच्या मते, त्याची खरी कारणे तुम्हाला ठाऊक नसतात. त्यामुळेच ती वजन कमी करण्याचा योग्य उपाय करू शकत नाही.  कोणत्याही औषधांचे सेवन करणे, शारीरिक अशक्तपणावर योग्य उपचार न करणे आणि चुकीचा व्यायाम ही कारणे वजन कमी करण्याच्या योजनेत अडथळा आणू शकतात. 

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

भूक न लागण्याची कारणे | Causes of loss of appetite

भूक न लागण्याची कारणे | Causes of loss of appetite

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 

भूक न लागणे किंवा जेवणाची इच्छा न होणे ही तक्रार अनेक वेळा केली जाते. भूक न लागण्यामागे काही आजारच असेल असेही नाही. दैनंदिन तणावामुळेदेखील एखाद्या वेळेस भूक लागत नाही. भूक न लागणे हा प्रकार बहुतेक सर्वांबरोबरच कधी ना कधी होतो. काही दिवसांसाठी असं होणं हे सामान्य आहे मात्र अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो चिंतेचा विषय आहे. भूक न लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अगदी शारिरीक जडणघडणीपासून ते मानसिक कारणामुळेही भूकेवर परिणाम होतो. भूक न लागण्याच्या समस्येकडे जास्त काळ दूर्लक्ष केल्यास शरिरावर त्याचे दिर्घकालीन परिणाम होऊ शकतात.

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती | What is the right time to drink water?

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती | What is the right time to drink water?

पृथ्वीचा सर्वाधिक भाग ज्याप्रमाणे पाण्याने व्यापलेला आहे त्याचप्रमाणे शरीराच्याही अधिक 70% भागात पाणी असते. पाण्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालू असतात. शरीराची योग्य पद्धतीने साफ व्हावे यासाठी पाण्याची आवश्यकता असते. दिवसभरात प्रत्येकाने किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे असे आपण नेहमी ऐकतो. मात्र कामाच्या किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या नादात आपण पाणी पिणे पूर्णपणे विसरुन जातो. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये पाण्याचे विशेष योगदान असते. ही गोष्ट आपल्यापैकी सर्वचजणांना माहीत आहे. पण वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी पाणी पिणं फायदेशीर ठरतं. ही बाब लक्षात घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण जर पाणी पिण्याची वेळ योग्य असेल तर झटपट वजन कमी करण्यास मदत होते. 

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract? खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेल...