स्ट्रेस फ्री राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स! | Simple Tips to stay stress free Life

स्ट्रेस फ्री राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स! | Simple Tips to stay stress free Life

बदलती लाईफस्टाईल आणि स्पर्धेच्या युगात स्वत: ला टिकवून ठेवण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. धावपळीदरम्यान वेगवेगळ्या कारणांमुळे स्ट्रेस येतो. अनेकदा आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र अशा प्रकारे दुर्लक्ष करणं हे महागात पडू शकतं. त्यामुळे स्टेस फ्री राहायचं असेल तर काही टिप्स आवश्यक आहेत. मानसिक आरोग्य हा गहन आणि व्यापक विषय आहे. मात्र ताण आणि नैराश्य हे मानसिक आरोग्याचे सर्वाधिक चर्चेत असणारे मुद्दे. ताण ही सर्वाधिक जणांना भेडसावणारी समस्या आहे तर नैराश्य हा सर्वात जास्त आढळणारा मानसिक आजार आहे. अनेकदा ताण हे नैराश्य येण्याचे कारण असते. मात्र ताणाचे परिणाम व नैराश्याची कारणे इतरही असू शकतात.
तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. थकवा वाटू लागतो. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, ह्रदयासंबंधी लेख, लठ्ठपणा, एसिडीटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात.

1) धकाधकीच्या या जीवनात प्रत्येकजण ताण तणाव घेऊन वावरत असतो. जर तुम्हाला तणावमुक्त जीवन जगायचं असेल, तर तुम्हाला नेहमी नित्यक्रमाचं पालन करावं लागेल. दिवसभराचं नियोजन केल्यानंतर त्याचं पालन करताना तुमची सगळी कामं वेळेत पूर्ण होतात आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो. ज्याचा उपयोग तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी वापरू शकता.

2) स्ट्रेस फ्री जगायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने करा. सकाळी लवकर उठा. मोकळ्या वातावरणात जाऊन मूड फ्रेश करा. आरोग्यासाठी व्यायाम आणि नाश्ता महत्त्वाचा असल्याने तो वेळेत करा. सकाळी उठल्या उठल्या कामाचा ताण घेऊ नका. चांगली गाणी ऐका यामुळे शरिरात उत्साह येईल. 

3) जर तुम्ही एखाद्या वाईट परिस्थितीत असाल किंवा तुमचा एखादा निर्णय चुकला असेल तर त्यावेळी त्यांना घाबरुन पळवाटा शोधण्याऐवजी त्यांचा धैर्याने सामना करा. असं केल्याने तुमच्या विचारक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो. जे भविष्यात कठीण काळात लढण्यासाठी तुम्हाला मजबूत बनवतं.

4) ऑफिसमध्ये खूप काम असल्याने त्याचा स्ट्रेस हा हमखास येतो. अनेकदा घरच्या काही समस्या देखील स्ट्रेससाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे वेळेचे आणि कामाचे नियोजन करा. असं केल्यास कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.

5) तणाव वाढल्यास लोक मद्य, ड्रग्ज, धुम्रपान सेवन सुरू करतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी तणाव कायमस्वरूपी दूर होत नाही. शिवाय यामुळे आरोग्याच्या इतर समस्या सुरू होतात. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी जीवनपद्धती बदलण्याची गरज आहे.

6) कामाच्या धावपळीत आपण स्वत: साठी वेळ काढायलाच विसरतो. आराम शरिरासाठी गरजेचा असतो. तुमच्या आवडी-निवडीसाठी वेळ काढायला हवा. सुट्ट्यांमध्ये कुठेतरी फिरायला जा. यामुळे स्ट्रेस कमी होण्यास नक्की मदत होईल.
 
7) तणावमुक्त राहण्यासाठी सगळ्यात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे आपल्या शरीराला आणि मनाला आराम द्या. सतत काम केल्याने तुमचं शरीर आणि डोकं दोन्ही थकतं. अशावेळी जर त्यांना विश्रांती दिली तर तुम्ही मन शांत आणि संयमी बनतं.

8) कामात कितीही व्यस्त असलात तरी जेवण कधीच टाळू नका. जेवणाने आपल्याला पोषण मिळतं. पौष्टीक आहाराने मानसिक आणि शारीरिक रूपाने आपल्याला नेहमीच फिट राहता येतं. स्ट्रेस कमी होतो.संतुलित आहाराचं सेवन करा. नाश्ता आणि जेवण टाळून कोणतही काम करू नका. कारण यानेच तुम्हाला काम करण्यासाठी शक्ती मिळेल. 

9) मेडीटेशन अर्थात ध्यान करण्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. योगासन आणि ध्यानधारणेमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते. यासाठी दररोज सकाळी नियमित ध्यानाचा सराव करा. सुरूवातीला तुमचे मन ध्यान करण्यास नकार देईल. ध्यानाला बसल्यावर तुमच्या मनात अनेक विचारांचा गोंधळ देखील उडेल. मात्र मुळीच चिंता करू नका. हळूहळू सरावाने तुमचे मन शांत आणि निवांत होईल. जर तुम्हाला मेंटल प्रेशरपासून दूर राहायचे असेल तर नियमित मेडीटेशन करा.

मानसिक ताण वाढल्यास माणूस मानसिक आजार आणि नैराश्याच्या आहारी जातो. मानसिक ताण सहन न झाल्यास दगावल्याच्या अनेक घटना आहेत. शिवाय यामुळे ह्रदयावर ताण येऊन हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे मानसिक ताणावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या