पावसाळ्यामध्ये लेप्टोस्पायरोसिसचा धोका अधिक | Risk of leptospirosis is high in monsoons

पावसाळ्यामध्ये लेप्टोस्पायरोसिसचा धोका अधिक | Risk of leptospirosis is high in monsoons

लेप्टोस्पायरोसिस हा एक रोग सगळ्यात जास्त मान्सून दरम्यान वाढतो. 2013 मध्ये भारतात हा रोग जास्त प्रमाणात दिसून येऊ लागला आणि या रोगापासून दरवर्षी साधारण 5000 पेक्षा अधिक लोक प्रभावित झालेले आढळून आलेले आहेत. या रोगाचे बळी वाढण्याचे प्रमाण दर वर्षी 10-15 टक्के आहे. हा रोग लेप्टोस्पायर नावाच्या जीवाणूमुळे होतो, जो प्राण्यांच्या मल-मूत्रमार्गे पसरला जातो. सामान्यतः, मनुष्यांमध्ये संसर्ग प्रदूषित पाण्याद्वारे पसरला जातो. तुंबलेले पाणी, छोटी-मोठी तयार झालेली तळी तसेच अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून त्यात पाणी साचून राहिल्याने लेप्टोस्पायरोसिस फैलावण्याची शक्यता अधिक आहे.
Image result for लेप्टोस्पायरोसिस धोका
पावसाळा आणि आजारपण हे जोडीने येतं. ताप, सर्दी, खोकला, इन्फेकशन याबरोबरच पावसाळ्यात येणारा अजून एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. परंतु, अनेक लोकांना याबद्दल माहीती नाही. या आजाराचा पसार कुत्रा, उंदीर यांसारख्या प्राण्यांमुळे होतो. खूप पाऊस पडल्यावर पाणी साचतं. काही वेळा पूर येतो. अशा साचलेल्या पाण्यात प्राण्यांच्या  लघवीतील बॅक्टरीया मिसळतात व त्यामुळे इन्फेकशन पसरते.

लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणूंपासून होणारा आजार आहे. प्रामुख्याने याचा प्रसार प्रसार उंदीर, डुक्कर तसेच पाळीव प्राणी गाय, म्हैस, घोडा, कुत्रा , मांजर यांच्या लघवीतून होतो. लेप्टोस्पायरोसिसचे जीवाणू पाण्यात तसेच चिखलात अनेक महिने जिवंत राहतात. या प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसांच्या त्वचेची संपर्क आल्यास किंवा जखमा असल्यास लेप्टोस्पायरोसिस हा रोग होतो. सर्वाधिक पाऊस पडल्याने हा आजार होण्याची शक्यता असते. दुषित पाण्याशी जखमांचा संपर्क आल्यास जंतूसंसर्ग शरीरात पसरतो. 

पावसाच्या साठलेल्या पाण्यात सांडपाणी व घाण मिसळल्याने प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. संसर्गजन्य आजारांमुळे मानवजातीला आतापर्यंत भरपूर नुकसान सोसावं लागलं आहे. पण प्रगत विज्ञानामुळे आणि निरनिराळ्या लसी आणि अँटीबायोटिक्सच्या सहाय्याने, संसर्गजन्य रोगांचे प्रमाण काही अंशी अटोक्यात आणण्यास यश आलं आहे. मात्र आज देखील काही संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे आजार योग्य काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतात. असाच एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. सगळ्यांनाच लेप्टोस्पायरोसिसचा धोका आहे. परंतु, जर तुम्ही रहात असलेल्या ठिकाणी आजूबाजूला उंदीरांचा प्रादुर्भाव असेल तर हा धोका अधिक वाढतो. कारण त्यामुळे पाणी, माती, अन्न प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित होऊन इन्फेकशन पसरण्याची शक्यता असते. 

लेप्टोस्पायरोसिसमध्ये थंडी वाजून ताप येणे, डोळे लाल होणे,डोके, कंबर आणि पाय दुखणे,स्नायू दुखणे,त्वचेवर रॅश येणे अशी लक्षणे दिसतात. वेळीच लक्ष न दिल्यास मेनेन्जायटिस, कावीळ होणे, किडणीला सूज येऊन किडणी निकामी होणे, यकृताचे काम बंद पडणे, लघवी वाटे रक्त पडणे अशी गंभीर लक्षणे जाणवतात. तसेच रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात.

लेप्टोस्पायरोसिसच्या प्रतिबंध करणं महत्त्वाचं आहे. घरामध्ये आणि वस्त्यांमध्ये स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून उंदरांचे प्रमाण वाढणार नाही. पावसाळ्यात योग्य काळजी घेणं, साचलेल्या पाण्यात अथवा पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण करणं टाळणं, विशेषतः पायास जखम असल्यास. लेप्टोस्पायरोसिसची साथ असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतल्यास काही प्रमाणात संरक्षण मिळू शकेल. स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांनाकडे जाणे योग्य ठरेल. कारण स्वतःहून औषधे केल्यास त्रास वाढून परिस्थिती गंभीर होऊ शकते.

लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी कोणती काळजी घ्याल
- पावसाळ्यादरम्यान पाणी जमा झाले तर अशा पाण्यातून फिरणे टाळा.
- जर आपणास दुखापत झाली असेल तर त्यास व्यवस्थित झाकून ठेवा.
- शूज आणि मोजे घालून चालणे बंद करा. शक्यतो सॅंडलचा वापर जास्त करावा.
- मधुमेह रुग्णांनी विशेषत: सावध रहा.
- बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ करा. कारण ओल्या पायांमुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
- पाळीव प्राण्यांना संक्रमणापासून संरक्षण देण्यासाठी त्यांचे वेळोवेळी लसीकरण करून घ्या.
- पाणी साठलेल्या जागेतून चालणे टाळा. चिखल, घाण असलेल्या जागी अधिक काळ राहू नका. बरं वाटत नसल्यास किंवा लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे दिसून आल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या