वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight

हल्लीच्या धावपळीच्या काळात वजन कमी करण्याचा सोपा उपाय वाढलेल्या वजनामुळे हैराण झालेली प्रत्येक व्यक्ती शोधत आहे. कुणी एक्सरसाइज करतं, कुणी डाएट करतं, तर कुणी वेगळ्या पद्धतीची एखादी थेरपी करताना आढळून येतं. ह्या अशा लोकांमध्ये वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. ह्यातील बऱ्याच लोकांना वाढलेले वजन अगदी काही दिवसात कमी व्हावं असं वाटत असतं. ह्यामधील काहींचं वजन कमी होतं तर काहींचं नाही. वजन नियंत्रित ठेवण्याचा एक चांगला आणि सोपा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक गोष्ट इथे ध्यानात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे वजन वाढण्याला ती व्यक्ती स्वत: जबाबदार असते आणि वजन कमी करण्यासाठी डाएट आणि वेगवेगळ्या एक्सरसाइजची गरज पडते. अशात आणखी एक उपाय आहे ज्याने तुम्ही सहजपणे वजन नियंत्रित ठेवू शकता. 
Related image

वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आयुष्यात मानसिक शांतता मिळवा. मानसिक शांतता मिळवून तुम्ही सहजपणे तुमचे वजन कमी करू शकता. वेगवेगळे उपाय आधीच करून झाले असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. पण जर तुम्ही मानसिक रूपाने शांत नसाल, तर तुम्ही वजन कमी करू शकणार नाही.

आता बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की, मानसिक शांतता मिळवून वजन कमी कसं केलं जाऊ शकतं? त्याआधी तुम्ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, तणाव आणि सतत चिंता करणे या गोष्टी वजन वाढण्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे अर्थातच वजन कमी करण्यासाठी खूश राहणे गरजेचे आहे. तज्ञ नेहमीच सांगत असतात की, आनंदी राहून एखादी व्यक्ती त्याचं बरंचसं वजन कमी करू शकते .

आपल्याला हे तर माहीतच आहे की जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा अनेक नकारात्मक विचारांमधून जात असता. यामळे स्ट्रेस हॉर्मोनचं प्रमाण प्रचंड वाढतं आणि जेव्हा शरीरात अशा हार्मोन्सचं प्रमाण वाढतं तेव्हा तुम्हाला फार थकवा जाणवतो. त्यामुळे तुम्ही एक्सरसाइज करत नाहीत. सोबतच तुम्ही अशा पदार्थांकडे आकर्षित होता, ज्याने तुमचं वजन वाढतं.

वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी आनंदी राहणं फार गरजेचं असतं आणि हे  वैज्ञानिकांनी त्यांच्या संशोधनाद्वारे सिद्ध केलं आहे आणि वैज्ञानिकांनी असेही म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही आनंदी होता, तेव्हा तुमच्या शरीरात डोपामाइन हार्मोनचं प्रमाण वाढतं. ह्या डोपामाइन हार्मोनमुळे तुम्हाला वजन कमी करण्यास खूपच मदत मिळते. तसेच आनंदी राहिल्याने तणाव कमी होतो. एका रिसर्चनुसार, तुम्ही आनंदी असता तेव्हा किमान १० कॅलरी बर्न करत असता.

आता तुमच्या मनात असा विचार येत असेल की, आनंदी राहण्यासाठी नक्की काय करावं? तर सर्वातआधी तुमची लाइफस्टाईल तुम्ही नियमित करा. तसेच आनंदी राहण्यासाठी सकारात्मक विचार करा, तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करा, आनंदी लोकांना भेटा, एक्सरसाइज करा इत्यादी. रोजच्या जगण्यात आनंदी राहण्यासाठी वेगवेगळी कारणे तुम्ही शोधून काढली पाहिजेत. 

ह्यात प्रामुख्याने तुम्ही आनंदी आणि हेल्दी राहण्यासाठी रोजच्या रोजच हेल्दी डाएटचा आधार घेतला पाहिजे. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट असलेल्या पदार्थांचा समावेश करून त्यासोबतच भरपूर पाणी प्यावे आणि हलक्या पदार्थांचं सेवन करावं. पुरेशी म्हणजेच साधारण 7-8 तास झोप घ्यावी. झोपण्याच्या दोन तासांपूर्वी डिजिटल वस्तूंपासून दूर राहिले पाहिजे. याने तुमचा तणाव आणि चिंता दूर राहील.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या