पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder 


सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण, ज्या तडजोडी करतात त्यामध्ये सर्वात पहिला क्रमांक येतो तो आहार, झोप आणि व्यायामाचा. अयोग्य आहार, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे बहुतेक लोकांना पाचक रोग जडल्याचे पाहण्यास मिळत आहे. पचनक्रिया खराब असल्याने पोटदुखी आणि गॅस निर्माण होतो. परंतु हा संकेत इतर आजारांचाही असू शकते. या साधारण संकेतांसोबतच इतर संकेत जाणून घेतले तर आपल्याला इतर आजारांविषयी कळू शकते. सतत काही चुकीचं आणि यावेळी खात राहिल्याने पचन तंत्रावर वाईट प्रभाव पडतो. पचनक्रिया अन्न ऊर्जेत बदलून शरीराला आजारांशी लढण्याची शक्ती देते. पचनक्रिया व्यवस्थित न झाल्यास अन्न पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अपचन, गॅस, उलटी, पोटदुखी, पोटात सूज या समस्या निर्माण व्हायला लागतात. पचनक्रिया बिघडली की, वेगवेगळ्या आजारांचा देखील सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला तुमची पचनक्रिया खराब झाल्यावर आपले शरीर कोणते संकेत देते हे सांगणार आहोत. जेणेकरून त्यात तुम्ही वेळीच सुधारणा करू शकाल.

Image result for पचनक्रिया खराब
1) जेव्हा शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत, तेव्हा शरीरातून दुर्गंधी येऊ लागते. अधिक घाम, पायांची दुर्गंधी हे पचनक्रिया खराब असण्याचे प्राथमिक संकेत आहेत. शरीरातून न निघणारे विषारी पदार्थ रक्तप्रवाहात जाऊन त्वचेमध्ये तसेच अडकून राहून तुम्हाला शरीराची दुर्गंधी येऊ शकते. अशातच आपण सातत्याने शरीरातून टॉक्सिन्स दूर करणाऱ्या पदार्थाचं सेवन जास्त प्रमाणात करायला हवं. अनेकदा श्वासांची दुर्गंधी येणे हा सुद्धा पचनक्रिया खराब असण्याचा संकेत आहे. दोन-तीनदा ब्रश करूनही श्वासांची दुर्गंधी जात नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरू शकते.


2) जास्त दिवस पोट खराब राहणे किंवा पोट साफ न होणे ही पचनक्रियेची समस्या असून जेव्हा असं होतं तेव्हा तुमच्या त्वचेचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशावेळी पिंपल्स, सोरायसिस किंवा एक्जिमाची समस्या होण्याची शक्यता जास्त प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे याकडे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

3) पचनक्रिया खराब झाल्याने केसगळीतही मोठ्या प्रमाणात होऊन खराब डायजेशनमुळे केस कमजोर व्हायला लागतात. पचनक्रिया खराब असल्याने अन्नातील योग्य पोषण केसांपर्यंत पोहोचण्यास बाधा येते, ज्यामुळे केसगळती, केस पांढरे होणे आणि केस पातळ होणे यासारख्या समस्या होऊ लागतात.

4) पोटदुखीच्या कारणांचा विचार करता खूप कोरडा तिखट आहार घेणे, जेवणाची वेळ अनियमित नसणे, पाणी कमी पिणे, ब्रेड-पाव, शिळे अन्न जास्त खाणे, पोट साफ नसणे, लघवीला जाण्याचा कंटाळा करणे आदींमुळे पोट दुखू शकते. मुलांच्या बाबतीत स्वच्छ हात न धुणे, खूप गोड खाणे या कारणांनी जंत होऊन पोट दुखू शकते. मात्र फार वाट न पाहता तज्ज्ञांना दाखवावे. कारण मुतखड्यामुळेही पोटात दुखू शकते. 

5) पचनक्रिया फार जास्त काळासाठी खराब राहिली तर याचा प्रभाव शरीरासह आपल्या नखांवरही बघायला मिळतो. जेव्हा पचन तंत्र खराब असतं तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर न निघाल्यामुळे वेगवेगळ्या समस्या होतात. यात नखे तुटणे किंवा नखे कमजोर होणे यांचाही समावेश होतो.

6) पाणी कमी प्यायल्यामुळे पोटातील आतड्यातील ओलसरपणा कमी होतो व त्या परिस्थितीमध्ये बद्धकोष्ठतेचा आजार निर्माण होतो. या परिस्थितीमध्ये मोठ्या आतड्यातील पाणी शोषून घेण्याचा प्रयत्न आपले शरीर करते. पाण्याच्या कमतरतेमुळे मल (विष्ठा) मऊ न राहता ती कडक होते आणि मल मार्गातून सरकण्यास अडचण निर्माण होते. फायबर घटक नसलेले अन्न, प्रोसेस्ड फूड खाल्ल्यामुळे तसेच फळे, भाज्या आणि द्रव्य पदार्थांचे सेवन न केल्यामुळे असे होते.

पचनक्रिया दुरूस्त करण्याचे उपाय

पचनक्रिया चांगली आणि मजबूत ठेवण्यासाठी हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचं सेवन सातत्याने करावं. जास्तीत जास्त फायबर युक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करावा, जेणेकरून पोट साफ राहील. जेवण चांगलं चावून खावं. कारण घाईघाईने काही खाल्ले तर ते व्यवस्थित पचणार नाही. त्यासोबतच पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी नियमित एक्सरसाइज करणेही तितकेच गरजेचे आहे.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या