पोट कमी कसे करावे | How to reduce the stomach fatपोट कमी कसे करावे | How to reduce the stomach fat

जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.
Image result for पोट कमी कसे करावेआपल्यामधील प्रत्येक जण हा स्वत:ला नीटनेटके ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. आपण दररोजच्या कामामुळे व्यस्त असतो. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. खाण्यावरही फार नियंत्रण ठेवता येत नाही.  बऱ्याच लोकांना असे वाटते की मी रोज चालायला जातो व्यायाम करतो तरीही माझे पोट कमी का होत नाही तर ह्याचे मुख्य कारण हे आहे की तुम्ही व्यायाम अथवा चालून आल्यावर काय खाता आणि दिवसभरात काय करता. म्हणूनच पोट कमी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स-

1) झोप पूर्ण करा
पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं. झोपण्यापूर्वी काही वेळ शांतपणे ध्यान करावं, आनंद देणारं संगीत ऐकावं किंवा एखादे चांगले पुस्तक वाचावे. त्यामुळं चांगली झोप लागते. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त फॅट देखील बर्न होण्यास मदत होते. झोपल्यानं शरीरातील हार्मोन कंट्रोलमध्ये राहतात, त्यामुळं सतत भूख लागत नाही आणि शरीराची उर्जाही कमी होत नाही.

2) बसण्याच्या पद्धती
आपली बसण्याची अयोग्य पद्धत आपल्या पोटाची चरबी वाढण्याचं महत्त्वाचं कारण ठरू शकतं. खासकरून ज्या व्यक्ती जास्त वेळ कंम्प्युटरच्या समोर बसतात किंवा जे लोक जास्त वेळ बसून काम करतात, अशा लोकांच्या पोटातील स्नायू कालांतराने बाहेर येण्यास सुरुवात होते आणि त्याने पोट बाहेर यायला सुरुवात होते. म्हणूनच जास्तीत जास्त वेळ सरळ बसण्याचा प्रयत्न करा, पण त्याने जर तुमच्या पाठीला त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पाठीमागे उशी ठेवून बसा. तसेच तर एक ते दोन तासाने ऑफिसमधील पॅसेजमध्ये चालायला जा जेणेकरून तुमचे स्नायू शिथिल होण्यास मदत होईल.

3) रात्रीचे जेवण
रात्रीच्या वेळेस जास्त जेवण किंवा फास्ट फूड जसं की पिझ्झा, पास्ता, बर्गर इत्यादी खाणं बिल्कुल बंद करा. सोबतच शक्य असेल तर रात्री कोल्डड्रिंक आणि तळलेले पदार्थ खाण्याचे टाळावे. याचं मुख्य कारण असे आहे की रात्रीच्यावेळी आपली पचनक्रिया हळू काम करते. त्यामुळं जास्त फॅट बर्न न होता लठ्ठपणा वाढतो आणि पोटही वाढते. तसेच रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपेमध्ये कमीतकमी २ तासाचे अंतर असावे. 

4) पाण्याची मात्रा किती असावी
पोटाखालची चरबी कमी करण्यासाठी किमान 7 ते 8 ग्लास पाणी दररोज पिणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातील वाईट घटक बाहेर निघून जातात आणि पचनशक्ती सुधारते. जितके आपल्या शरीरातून अनावश्यक पदार्थ बाहेर टाकले जातील तितके ते शरीरासाठी चांगले असते आणि पाणी त्यासाठी उत्तम पर्याय आहे. तसेच पोटाचा घेर कमी करण्यासाठी लिंबू फायदेशीर आहे. दररोज सकाळी लिंबूपाणी प्या. यामुळे चरबी कमी होईल. यातले पाणी कोमट असेल तर जास्त चांगले. कोमट लिंबूपाण्यात थोडे मध घालून प्यायले तर जास्त फायदेशीर ठरू शकते किंवा आपण रोज सकाळी एक ग्लास नुसते गरम पाणी देखील पिऊ शकता.

5) डाएटमध्ये फायबरयुक्त पदार्थ खा
आपल्या रोजच्या आहारात जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. याने खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. तसेच पोटाचे आजार देखील टाळतात आणि वाढत्या चरबीवर नियंत्रण राहते. तसेच आपण विटॅमिन सी असलेली फळं आणि भाज्या खाण्यावर भर दिला पाहिजे, ज्याने शरीरातील लोहयुक्त पदार्थांचे पचन होण्यास मदत होते.


आजकाल लठ्ठपणा ही समस्या सामान्य झालीय. तुम्ही अनेक महिन्यांपासून आपल्या पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण यश मिळत नसेल तर ह्या दररोज नियमांचं पालन करा कारण हे नियम पाळल्यास आपलं वजन कमी होण्यास आणि पोट कमी होण्यास नक्कीच मदत होईल. 

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या