'हे' आहेत हसण्याचे फायदे'हे' आहेत हसण्याचे फायदे


हसण्याचे अनेक फायदे आहेत. हसण्याने माणूस फक्त दीर्घायुषीच होत नाही तर ह्द्यविकार , रक्तदाबाचा धोखाही कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, मनमोकळे हसल्याने रक्तप्रवाहाची प्रक्रिया योग्यप्रकारे सुरू राहते आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही त्याचा फायदा होतो. मनमोकळे हसल्याने शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. हसण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण तणावग्रस्त होत नाही. तणाव अनेक गंभीर विकारांना आमंत्रण देतो. तणावामुळेच हृदय, मेंदू, मूत्रपिंड, यकृत आदींचे नुकसान होते. बेचैनी, चिडचिड, सतत राग येणे आदी त्रास होतात. पण व्यक्ती सतत हसत राहिल्यास ही समस्या उद्भवत नाही. हास्ययोग केल्याने रक्तदाबाच्या समस्येचे निर्मूलन होते. हसल्यामुळे व्यक्तीला चांगले वाटते. मनमोकळे हसल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते.
आजच्या तणावग्रस्त काळातही स्मितहास्याचे चांगले परिणाम सिद्ध होतात. जसे की, स्मितहास्याने तणाव नाहीसा होऊ शकतो. प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व्हसारखे ते असते. हसल्याने तणाव कमी होऊ शकतो आणि आपल्याला परिस्थितीशी तोंड द्यायला मदत मिळू शकते. हसण्यामुळे आरोग्यावर अनेक प्रकारचे चांगले परिणाम होतात. त्यामुळे व्यक्तीला आपण निरोगी असल्याची जाणीव होते. तणाव, निराशा आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवता येते. व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो. पूर्वकालीन मानसशास्त्राच्या तत्त्वामध्ये हास्यविनोदाला शरीराचा रक्षक म्हणून संबोधून त्यापासून शरीराला तणाव आणि त्रासापासून मुक्ती मिळते असे म्हटले आहे. 

हसऱ्या स्वभावाचा मानसिकदृष्ट्या फायदा होतो. तसेच हसणे प्रकृतीलाही चांगले असते. हसणे औषधासारखे आहे असे म्हणतात. डॉक्टरांचे तर असे म्हणणे आहे की, मानसिक स्थितीचा प्रकृतीशी फार मोठा संबंध आहे. अनेक अभ्यासांवरून असे निष्पन्न झाले आहे की, एकसारखा तणाव, नकारात्मक विचार करणे अशा गोष्टींमुळे शरीराची रोगप्रतिबंधक शक्ती कमजोर होते. तर दुसऱ्या बाजूला, हसण्यामुळे मानसिक स्थितीही चांगली राहते आणि रोगप्रतिबंधक शक्ती देखील सुदृढ होते.


हसण्यामुळे सकारात्मक आणि शक्तिशाली भावना निर्माण होण्यास मदत होते. यामुळे तुमच्यामध्ये अधिक उर्जा निर्माण होते. वातावरणात शांत परिस्थिती निर्माण होण्यास मदत होते. मग तुम्ही आनंदी आणि आत्मविश्‍वासपूर्ण वागू लागता. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी हसण्याची नितांत गरज आहे. शरीरातील स्नायूंना व्यायाम मिळून रक्‍ताभिसरणाची क्रियादेखील सुरळीत पार पडते शिवाय हृदयाचं कार्यसुद्धा नीट चालू राहतं. हसण्याचा इतरांवरही मोठा प्रभाव पडतो. समजा तुम्हाला कोणी सल्ला देत आहे किंवा तुमची सुधारणूक करत आहे. अशा वेळी सल्ला देणाऱ्‍या व्यक्‍तीचा चेहरा अगदी गंभीर असला तर असे वाटेल की त्याला राग आला आहे किंवा त्याला आपण मुळीच पसंत नाही. पण तेच जर त्याच्या चेहऱ्‍यावर स्मितहास्य असेल तर तुम्हाला इतके घाबरल्यासारखे वाटणार नाही आणि त्याचा सल्ला तुम्ही अगदी आनंदाने स्वीकारालही. तणावपूर्ण स्थितीत असताना स्मितहास्यामुळे बऱ्‍याच गैरसमजुती दूर होतात.

आजकाल प्रत्येकाचं आयुष्य ताणतणावाचे झाले आहे. हसण्यामुळे काही काळ हा ताणतणाव कमी होण्यास मदत होते. परिणामी रक्तदाबाच्या समस्या कमी होतात. हसण्यामुळे रक्‍तदाब नियंत्रणात राहतोच, शिवाय फुप्फुसांनाही व्यायाम मिळतो. आजकाल सतत वाढणारी स्पर्धा आणि कामाचा ताण यामुळे मनावर सतत एक ओझं असतं. आयुष्य जगताना समोर येणाऱ्या अडचणींमुळे टेंशन सतत डोक्यावर असू शकतं. थोडक्यात चिंता आणि काळजी अनेकांच्या हा जगण्याचाच एक अविभाज्य भाग असतो. मात्र सतत चिंता काळजी करत बसल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. यासाठी हसणं हा दैनंदिन ताणतणावाला दूर करणारं उत्तम औषध ठरू शकतं. 

जेव्हा आपण मनमोकळे हसतो तेव्हा शरीराची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. मनमोकळे हसल्याने शरीर हलके होते आणि दिवसभर उत्साही वाटते. 


खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या