शनिवार, २९ जून, २०१९

मानसिक तणावाचे दुष्परिणाम | Side effects of mental stress

मानसिक तणावाचे दुष्परिणाम | Side effects of mental stressनिरोगी आयुष्यासाठी शरीराइतकेच मानसिक स्वास्थ्यालाही महत्त्व आहे. वाढलेले मानसिक ताणतणाव अनेक आजारांना निमंत्रण देणारे ठरू शकतात. वाढलेल्या मानसिक ताणतणावातून कोणते त्रास होऊ शकतात. मानसिक तणाव, चिंता या मानवी आयुष्याच्याच भाग आहेत, परंतु त्यांचा अतिरेक मानवी आरोग्यास बाधक आहे. अधिक चिंता व तणावग्रस्त असलेल्या व्यक्तीला पुढे मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. या व्यक्तीला पुढे अनेक मानसिक विकार जडतात आणि त्यातून बाहेर येण्यासाठी खूपच वेळ लागतो. 

सोमवार, २४ जून, २०१९

पोट कमी कसे करावे | How to reduce the stomach fatपोट कमी कसे करावे | How to reduce the stomach fat

जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.
Image result for पोट कमी कसे करावे

गुरुवार, २० जून, २०१९

'हे' आहेत हसण्याचे फायदे'हे' आहेत हसण्याचे फायदे


हसण्याचे अनेक फायदे आहेत. हसण्याने माणूस फक्त दीर्घायुषीच होत नाही तर ह्द्यविकार , रक्तदाबाचा धोखाही कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, मनमोकळे हसल्याने रक्तप्रवाहाची प्रक्रिया योग्यप्रकारे सुरू राहते आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही त्याचा फायदा होतो. मनमोकळे हसल्याने शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. हसण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण तणावग्रस्त होत नाही. तणाव अनेक गंभीर विकारांना आमंत्रण देतो. तणावामुळेच हृदय, मेंदू, मूत्रपिंड, यकृत आदींचे नुकसान होते. बेचैनी, चिडचिड, सतत राग येणे आदी त्रास होतात. पण व्यक्ती सतत हसत राहिल्यास ही समस्या उद्भवत नाही. हास्ययोग केल्याने रक्तदाबाच्या समस्येचे निर्मूलन होते. हसल्यामुळे व्यक्तीला चांगले वाटते. मनमोकळे हसल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते.

मंगळवार, ४ जून, २०१९

फळांचे शरीराला होणारे फायदे


फळांचे शरीराला होणारे फायदे

हल्ली वेळेचा अभाव असल्याने व्यक्ती झटपट गोष्टी करण्यामध्ये अधिक रस घेतो. पूर्वी थोड्याशा भुकेला पटकन एखादे फळ खाल्ले जात असेल तर हल्ली फास्ट फूड किंवा जंक फूडचा आधार घेतला जातो. हे पदार्थ आपल्या जीवनशैलीचा भाग झाले आहेत. पण, त्याचा शरीरावर दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतो. अनेक विकारांसाठी हे पदार्थ मूळ ठरू शकतात. त्याऐवजी आपण फळे खाल्ल्यास अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. आहार संतुलित असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मोसमी फळांचे अवश्य सेवन करावे, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहेच. या फळांच्या सेवनामुळे आजारांपासून बचाव होतो. 


रविवार, २ जून, २०१९

लसूण खाण्याचे फायदेलसूण खाण्याचे फायदे

सर्वसाधारणपणे लसणीचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी, किंवा चटणी बनविण्यासाठी केला जातो. एखादी बेचव भाजी केवळ लसूण त्यामध्ये घातल्याने किती चविष्ट बनते ! पण केवळ खाद्यपदार्थांची चव वाढविण्याखेरीज ही लसूण अजून किती तरी प्रकारे उपयोगाला येते. लसणीमध्ये अशी अनेक गुणकारी तत्वे आहेत, ज्यामुळे आपला अनेक विकारांपासून बचाव होऊ शकतो. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्याच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे.आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...