लठ्ठपणा कमी करण्यासाठी या पदार्थांपासून दूर राहा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी या पदार्थांपासून दूर राहा


हल्लीच्या जीवनशैलीत प्रत्येकजण लठ्ठपणामुळे परेशान आहे. कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा ही आजच्या जिवनपद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जातोय. सध्या भारतमध्ये जवळपास 4 कोटी 10 लाख लोकांचे वजन सामान्य वजनापेक्षा जास्त आहे. बहुतांश लोक सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसतात. 
Related image
व्यायाम करणे, २४ x ७ आनंददायी राहणे. खरी भूक लागल्यावर आणि प्रसन्न चित्ताने, सावकाश खाणे. पोट भरावयाच्या आधी पूर्णविराम घेणे. जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. वजन कमी करण्यासाठी कधी डायटिंग तर कधी व्यायाम तर कधी काय...तरी यश हाती लागत नसेल तर सर्वात मोठं कारण आहे की आपल्या रोजच्या जेवणांमध्ये सामील असलेल्या अशा वस्तू ज्यामुळे आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. 

1) जर आपण सातत्याने मिठाचे अधिक सेवन करत असाल तर हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. एका शोधाप्रमाणे एका दिवसात अधिक मीठ सेवन केल्यास लठ्ठपणा वाढू शकतो. संतुलित प्रमाणापेक्षा अधिक मीठ खाणार्‍यांचे वजन इतर लोकांपेक्षा अधिक असतं. तसेच पॅक्ड पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिकच असतं. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.
  
2) गोड पदार्थ प्रत्येकालाच आवडतात परंतू अधिक प्रमाणात साखर आपल्या शरीराचे नुकसान करते. कारण साखरेमुळे लठ्ठपणा जलद गतीने वाढतो आणि नंतर यावर नियंत्रण ठेवणं कठिण जातं. आपण आपल्या रोजच्या आहारात साखरेचे प्रमाण कमी करून वजन सहजपणे कमी करू शकता. तज्ञांच्या शोधानुसार चांगल्या आरोग्यासाठी पुरुषांनी दररोज 50 ग्राम आणि महिलांनी 70 ग्रॅमहून अधिक साखरेचे सेवन करू नये. अधिक साखरेमुळे हृदय नलिकेत चरबी जमा होऊन ती ब्लॉक होण्याची शक्यता असते. याने हार्ट अटॅकची शक्यता वाढते. 

3) प्रत्येक पदार्थांप्रमाणे तांदूळ खाणेही आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण ते लिमिटमध्ये. आपण जर जास्त प्रमाणात तांदूळ खाण्याचे शौकीन असाल तर लठ्ठपणा कमी करणे आपल्याला जड जाऊ शकते. कारण पांढर्‍या तांदळात कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. वजन कमी करण्याची इच्छा असल्यास पांढर्‍याऐवजी ब्राऊन राईसचे सेवन करावे. 


4) मैदा आणि मैद्याने तयार केलेल्या खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होण्यास बाधा येते. कारण मैद्यामुळे शरीरात ब्लड शुगर वेगानं वाढते ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि कर्करोग यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक पटीने वाढते. रोजच्या आहारात मैद्याचा समावेश असेल, तर तो लगेच नुकसान करेल असं नाही. पण मैद्याचे अनेक साइड इफेक्ट्स असतात. ते शरीराला अपायकारक असल्याचं समोर आलं आहे. मैद्याचे जास्त आणि वारंवार पदार्थ खाल्ल्यानं वजन वाढणं सुरु होतं. अंगी लठ्ठपणा येतो. इतकंच नाही, तर यामुळे कोलेस्टरॉलचं प्रमाणही वाढतं. रक्तातील ट्रायग्ल‌सिराइडलाही यामुळे चालना मिळते. तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत असाल, तर मैदा खाणं कायमचं बंद करावं.


आपण रोज किती खातोय यापेक्षा काय खातो आहे याकडे लक्ष द्या. दररोज एकच एक पदार्थ खाण्यापेक्षा आहारामध्ये विविधता आणण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. एक गोष्ट कायम लक्षात घ्या नियमित जेवणाऐवजी आठवड्यातून दोन वेळा फळे, दोन वेळा कोशिंबीर, दोन वेळा कडधान्ये, दोन वेळा फळांचा रस, दोन वेळा पालेभाज्यांचा रस किंवा सूप घेण्याचा प्रयत्न करावा. आपली आरोग्य तपासणी नियमित करावी.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या