वजन वाढण्याची काही महत्वाची कारणे


वजन वाढण्याची काही महत्वाची कारणेहल्ली प्रत्येकजण आपल्या वाढत्या वजनाच्या समस्येने हैराण आहे. खरं तर वाढत्या वजनाची वेगवेगळी कारणं असतात. पण त्यातल्यात्यात जर लक्षात घ्यायचं झालं तर, आपल्या वाढत्या वजनासाठी आपला दिनक्रम आणि काही सवयी जबाबदार असतात. वजन अचानक वाढणे, किंवा वाढत राहण्याची अनेक कारणं आहेत, ती आपण नेहमी तपासून पाहिली पाहिजेत, किंवा त्याविषयी निरीक्षण नेहमीच नोंदवत राहिलं पाहिजे, यामुळे तुम्हाला वजन वाढण्याची नेमकी कारणं तरी कळतील, यामुळे तुम्हाला वजन पुन्हा कसं नियंत्रणात आणता येईल, हे देखील कळेल.
Related image
हल्ली बरेच जण आपल्या वाढत्या वजनाच्या समस्येने हैराण असून खरं तर वाढत्या वजनाची वेगवेगळी कारणं असू शकतात. पण त्यातल्यात्यात जर लक्षात घ्यायचं झालं तर, आपल्या वाढत्या वजनासाठी आपला दिनक्रम आणि काही सवयी ह्याच जास्त प्रमाणात जबाबदार असतात. ज्याबाबत आपल्यापैकी बऱ्याच जणांना काही माहीत नसतं. ह्यातील काही सवयी अशा आहेत, ज्यांमुळे आपलं वजन सतत वाढत असतं आणि त्याबाबत आपल्याला पुसटशी कल्पनाही नसते. वजन वाढल्यामुळे आपलं शरीर लठ्ठ दिसू लागतं, पण त्याचबरोबर शरीर अनेक आजारांच्या जाळ्यातही अडकतं. अशातच वजन वाढणं ही एक गंभीर समस्या होऊन बसते. त्यामुळे आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुम्हाला अशा कोणत्या सवयी आहेत. ज्या वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. तुम्ही या सवयी जर वेळीच बदलल्या तर वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच तुम्ही आजारांपासूनही स्वतःचा बचाव करू शकता. 

आहारातील  असमतोल
खाणं आणि कॅलरी बर्न करणं या दोन्ही गोष्टींमध्ये नेहमीच समतोल राखणं गरजेचं असून जर याचा समतोल राखला नाही तर वजनात बदल होतो. तुम्ही जर जास्त खाल्लं आणि कमी प्रमाणात कॅलरी बर्न केल्या तर वजन वाढण्याची शक्यता असते.

पाणी कमी पिणं
जर तुम्ही दिवसभरामध्ये 2 लीटरपेक्षा कमी पाणी पित असाल तर त्यामुळे तुमचं शरीरातून नको असलेले पदार्थ बाहेर टाकणं शरीरासाठी कठिण होतं. ज्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म प्रोसेस स्लो होते आणि तुमचं वजन कालांतराने वाढू लागते. आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असतं. जर शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर डोकेदुखी तसंच त्वचा कोरडी पडणे अशा समस्या उद्भवतात.


सततच्या आजारांमुळे वजनात बदल
आजारपणाचा अनपेक्षितरित्या आपल्या वजनावर परिणाम होत असतो. कॅन्सर, मधुमेह, हार्ट फेल्युअर किंवा साधी सर्दी या आजारांमुळे वजनात बदल होण्याची दात शक्यता असते. आजारपणानंतंर वजनात जर अतिप्रमाणात बदल दिसून येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.


आहारात प्रोटीनची कमतरता 
आरोग्य जपण्यासाठी हेल्दी डाएट घेणं अत्यंत आवश्यक असून जर तुम्ही आहारामध्ये प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करत नसाल तर हे देखील तुमच्या शरीराचं वजन वाढण्याचे कारण बनू शकते. म्हणूनच आपल्या जेवणामध्ये दूध, दही किंवा अंड्यांचं सेवन अवश्य करा. असं केलं नाही तर, शरीरातील मेटाबॉलिज्म प्रोसेस स्लो होते आणि वजन वाढू लागतं. 

झोपण्याच्या पद्धती
अनेक संशोधनानंतर असे आढळून आले की तुम्ही किती वेळ झोपता किंवा कमी झोप घेता यांचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होतो. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर सकाळी तुम्हाला जास्त भूक लागू शकते. ज्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात खाता आणि परिणामी वजन वाढू शकते.  

टिव्ही अथवा मोबाईल पाहताना खाणं 
जर तुम्हाला टिव्ही किंवा लॅपटॉपवर काम करताना खाण्याची सवय असेल तर तुमचं वजन वाढू शकतं. आता तुम्ही म्हणाल, टिव्ही पाहण्याचा आणि वजन वाढण्याचा काय संबंधं? तर ह्याचा थेट एकमेकांशी संबंध आहे. तुम्ही जेव्हा टिव्ही पाहताना काहीही खाता. तेव्हा तुम्हाला वेळेचा अंदाज न आल्याने जास्त प्रमाणात जेवणाचे सेवन करता. यामुळे शरीरातील फॅट्स वाढतात. त्यामुळे जेवताना फक्त जेवणाकडेच लक्ष द्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या