हायपरटेंशन म्हणजे काय


हायपरटेंशन म्हणजे काय

हायपरटेन्शन हा हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक, मूत्रपिंड रोग आणि पायातील धमन्यांमध्ये ब्लॉकेजसाठी वेदनादायक आणि गँगरीन होणारा सर्वात मोठा आणि टाळता येणारा धोका आहे. वेगवेगळ्या कारणांनी अलिकडे हायपरटेंशनची समस्या अधिक होत आहे. हृदयाचं मुख्य काम धमण्यांच्या माध्यमातून ऊर्जा आणि ऑक्सिजन देण्यासाठी शरीरात सगळीकडे ब्लड पंप करणे आहे. रक्तदाब वाढल्याची उदाहरणे सतत आजुबाजूला घडताना दिसतात. सतत परिश्रम, मानसिक ताण यासोबत इतर कारणांमुळेही रक्तदाबावर परिणाम होतो. वाढलेला रक्तदाब हा अनेक आजारांना निमंत्रण देतो. अतिरक्तदाबाची कोणतीही बाह्यलक्षणे दिसत नाहीत व तो केवळ मोजल्यानंतरच समजतो. त्यामुळे त्याला सायलंट किलर म्हणतात.
Older man measuring his blood pressure.


शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या शरीरात असलेल्या रक्ताद्वारे होत असतो. हे रक्त हृदयाकडून शरीरात सर्व भागात पसरते. हृदयाच्या आकुंचनामधून रक्तवाहिन्यांच्या आत दाब तयार होतो. जेव्हा हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्ताचा दाब सर्वात अधिक असतो तर हृदय विश्रामावस्थेत असताना रक्ताचा दाब कमी प्रमाणात असतो. हे दोन्ही दाब आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. साधारणपणे १२०/ ८० हा सामान्य दाब असतो. मात्र रक्तवाहिन्यातील दाब १४०/९० पेक्षा अधिक होऊ लागला की त्याचे विपरित परिणाम आपल्या शरीरावर होतात. या रक्तदाबाला हायपरटेंशन म्हणजेच अतिरक्तदाब म्हणतात. आपल्या शरीराच्या धमण्यांच्या माध्यमातून ब्लड फ्लो करण्यासाठी दबावाच्या एका निश्चित मात्रेची गरज असते. जर ब्लड फ्लो चा हा दबाव सामान्य दबावापेक्षा अधिक असतो, तेव्हा रक्त वाहिन्यांवर अतिरिक्त तणाव येतो. यालाच हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेंशन म्हणतात. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनीच्या समस्या होतात.

हायपरटेंशन कसे टाळावे?

1) बाजारातील तयार अन्नपदार्थ शक्यतो टाळावेत. अशा खाद्यपदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. बिस्किटस्, न्याहरीचे पौष्टिक असल्याचा दावा करणारे पदार्थ आणि तयार जेवण यामध्ये आपल्या शरीरात जाणार्‍या मिठापैकी ८० टक्के मीठ असते. तेव्हा तयार खाद्यपदार्थ वर्ज्य करावेत.

2) हायपरटेन्शन बद्दल बरेच गैरसमज आहेत, जे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहेत. हायपरटेन्शन नियंत्रित करण्याचा एक सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे स्वत:ला त्याबाबत शिक्षित करणे.

3) रक्तदाब कमी करण्यासाठी गोळ्या औषधे आहेतच डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांची योग्य निवड व निरनिराळ्या औषधांचे संमिश्रण व नियमित सेवन यामुळे रक्तदाब आटोक्यात राहू शकतो. याचसोबत आहारातील मीठासारख्या क्षारांचे नियंत्रण, नियमित व्यायाम व मानसिक स्वास्थ्य यामधूनही अतिरिक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत होते व त्याला प्रतिबंधही करता येतो.

4) आपल्या ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्यासाठी मीठ प्रतिबंध ही सर्वात महत्वाची आणि प्रभावी पद्धत आहे. प्रतिदिन मिठाच्या सेवनाचे प्रमाण 4-6 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. मीठ प्रतिबंधित करणे म्हणजे सोडियम (Na) प्रतिबंधित करणे. जेवणातील मिठा शिवाय सॉस, पॅकेज केलेले अन्न, चिप्स, जंक फूड यांसारख्या खाद्य पदार्थांमधून आपण बरेचसे अप्रत्यक्ष मिठाचे (अंदाजे 75%) सेवन बऱ्याचवेळा करत असतो. म्हणूनच आपण ह्याकडे जास्त लक्ष्य दिले पाहिजे.

5) हे तर अगदी सर्वज्ञातच आहे की वजन वाढण्यासोबतच हायपरटेंशन आपोआपच वाढतं. त्यासोबतच जर वजन अधिक असेल तर झोपताना श्वासासंबंधी समस्याही होऊ शकतात, याला स्लीप एप्निया असं म्हणतात. याने हायपरटेंशन अधिक प्रमाणात वाढतं. म्हणूनच वजन कमी करणे हे हायपरटेंशनला नियंत्रणात ठेवण्याचं सर्वात चांगलं माध्यम आहे. दिवसातून ३० ते ६० मिनिटे एक्सरसाइज करा. याने मूडही चांगला राहतो आणि तुम्ही फिट राहता. 

6) अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन करणे हायपरटेन्शन, स्ट्रोक, हृदय फेल्युअर, अनियमित हृदयाचे ठोके, उच्च कोलेस्ट्रॉल, कर्करोग आणि अपघात होण्यास कारणीभूत आहे. आपला रक्तदाब कमी करण्यासाठी सोडियम सेवन, निरोगी आहारासह – अधिक फळे / भाज्या, नियमित शारीरिक क्रिया, वजन कमी करणे, अल्कोहोलचा सेवन कमी करणे, धूम्रपान थांबवणे, योग / ध्यान आणि नियमित औषधे, ताण नियंत्रित करणे आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

आपण आपल्या जीवनशैलीत जर सकारात्मक बदल केल्यास आपण आपला रक्तदाब सहजपणे नियंत्रणात ठेवू शकतो. वेळोवेळी योग्य काळजी घेतल्यास प्रत्येक स्त्रीपुरुष या प्राणघातक रोगाशी योग्य मुकाबला करू शकतो. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार-विहारात बदल व वर नमूद केलेली कारणे न घडवून देणं हे महत्त्वाचं ठरेल. राहणीमानात बदल करणे म्हणजेच, ठराविक वेळ काम करणं ठराविक वेळी खेळणं, रात्रीची पूर्ण विश्रांती, तसेच आठवड्याचे शेवटी विश्रांती व तापट स्वभावात मूलतः बदल करणे जास्त गरजेचे आहे.


खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या