डिप्रेशनची कारणे काय आहेत


डिप्रेशनची कारणे काय आहेत


अनेकदा कामाचा ताण आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच बरेच लोकं मूड ठिक करण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर करतात. काही लोकं टीव्ही पाहतात तर काही लोकं सोशल मीडियाचा आधार घेतात. अशातच काही लोकं आपला मूड ठिक करण्यासाठी त्यांच्या आवडत्या पदार्थांकडे धावतात आणि अशा मूड ठिक करणाऱ्या पदार्थांमध्ये अनेकदा जंक फूडचाच समावेश असतो. संशोधनांधून असे समोर आले आहे की यामध्ये समावेश होणारे पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ तुमचं डिप्रेशन कमी करण्याऐवजी आणखी वाढवतात.
Image result for डिप्रेशन ची कारणे काय आहेत
धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात नैराश्य किंवा उदासीनता हा आज बऱ्याच प्रमाणात आढळणारा मानसिक आजार आहे. १० ते २५ टक्के लोकांना आज डिप्रेशन म्हणजेच उदासीनतेने ग्रासलेले आहे. जीवघेणी स्पर्धा, आर्थिक टंचाई, एकमेकांशी बिघडलेले नातेसंबंध, त्यामुळे आलेला दुरावा, स्वतःला कमी लेखणे, नापास होणे, असफलता, धंद्यामध्ये नुकसान, पती-पत्नींचे न पटणे, घटस्फोट, मुलांची प्रगती न होणे, शारीरिक आजार अशी बरीच कारणे डिप्रेशन म्हणजेच नैराश्य या आजाराची असू शकतात. दोन आठवडे सतत एखाद्या व्यक्तीमध्ये खालील लक्षणे दिसली तर त्याला डिप्रेशन हा आजार झाला आहे असे समजता येईल.
Image result for डिप्रेशन ची कारणे काय आहेत
मानसिक आरोग्य हा गहन आणि व्यापक विषय आहे. मात्र ताण आणि नैराश्य हे मानसिक आरोग्याचे सर्वाधिक चर्चेत असणारे मुद्दे. ताण ही सर्वाधिक जणांना भेडसावणारी समस्या आहे तर नैराश्य हा सर्वात जास्त आढळणारा मानसिक आजार आहे. अनेकदा ताण हे नैराश्य येण्याचे कारण असते. मात्र ताणाचे परिणाम व नैराश्याची कारणे इतरही असू शकतात. 

रोजच्या आयुष्यातील दगदग, अपयश, नकार, विरह, पैशांचे व्यवस्थापन हे ताण वाढवणारे असते. काही वेळा यापेक्षाही अधिक तणावपूर्ण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार-बलात्कार-सार्वजनिक ठिकाणी अपमान यापैकी एखाद्या कारणाने आत्मसन्मानावर झालेला आघात, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो.


नैराश्य कोणालाही येउ शकते श्रीमंत- गरीब, स्त्री-पुरूष, लहान मुले ते वृद्ध. नैराश्य जीवनाच्या सर्व घटकांवर प्रभाव करते. छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टीपासून ते करिअर वर परिणाम होतो. त्याचा नात्यावर कुटुंबावरही तसेच दररोजच्या कामावर सुध्दा परिणाम होतो. नैराश्य हा असा आजार आहे ज्यावर प्रतिबंधात्मक उपाय व उपचार उपलब्ध आहेत. नैराश्य काय आहे हे समजुन घेणे, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय व उपचाराबाबत माहिती करून घेणे खूप मह्त्त्वाचे आहे. सर्वात मह्त्त्वाचे आहे ते म्हणजे नैराश्याशी निगडित कलंकीत भावना दुर करणे ज्यामुळे जास्तीत जास्त लोक नैराश्यासाठी मदत घेतील.


डिप्रेशन टाळण्यासाठी काय करावे?
१. नियमित झोप घ्यावी.
२. सकारात्मक बोला, सकारात्मक वाचा, सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहावे.
३. दररोज किमान ३० ते ४० मिनिटे भरपूर व्यायाम करा.
४. मेडिटेशन/स्वसंमोहन करावे.
५. कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी (CBT) रॅशनल इमोटिव्ह बिहेविअर थेरपी (REBT) या उपचारांनी फायदा होतो.
६. लोकांना मदत करा, लोकांच्या संपर्कात राहावे. इतरांसाठी जे काही करता येईल ते करण्याची नेहमी तयारी ठेवावी.
७. उद्योगामध्ये गुंतलेले राहावे.
८. आपल्या जवळच्या व्यक्तीशी (नातेवाईक/मित्र) यांच्याशी बोला. गरज असल्यास मनोविकारतज्ञाची मदत घ्या. आराम करा. तणावाचे नियोजन करा. स्वतःसाठी वेळ द्या. छंद जोपासा.
९. वाईट काळात देखील तुम्हाला विश्वास असायला हवा की तुम्ही यातून पुर्णपणे नक्कीच बरे व्हाल व पुन्हा आनंदी आयुष्य जगू शकाल. जीवनात घडलेल्या सर्व छोट्या-मोठ्या चांगल्या गोष्टींकडे स्वत:चे लक्ष वेधा.तुमच्या मनाला उभारी आणणा-या गोष्टी शोधा.तुम्हाला आनंद वाटेल अशा छोट्या छोट्या गोष्टी करा.या गोष्टी केल्याने तुम्हाला अधिक आनंद व प्रोत्साहन मिळेल.
१०. नकारात्मक माणसे,टिव्हीवरील नकारात्मक बातम्या व नकारात्मक गोष्टी तुमची स्थिती अधिक खराब करु शकतात.त्यामुळे अशा गोष्टींपासून दूरच रहा.तसेच ताणात देखील आनंदी व सकारात्मक असल्याची कल्पना करा.

तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या मित्र-मंडळी,कुटूंबातील माणसे अथवा एखाद्या जिवलग व्यक्तीला सांगू शकता.तसेच यासाठी प्रोफेशनल मदत देखील घ्या ज्यामुळे तुम्हाला ही समस्या दूर करणे सहज शक्य होईल.


खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या