शुक्रवार, ३१ मे, २०१९

ऐन तारुण्यात हार्ट अ‍ॅटॅक येण्याची कारणेऐन तारुण्यात  हार्ट अ‍ॅटॅक येण्याची कारणे

बऱ्याच वेळेला पेपरचं पान उघडलं की कोणाच्या तरी अचानक मृत्यूची बातमी आपलं लक्ष वेधून घेते. इतक्या लहान वयात असं कसं झालं? नुकतंच लग्न झालं होतं. लहान मुलं देखील आहेत, आता त्यांचं कसं होणार? यासारख्या विचारांनी त्याच्या कुटुंबियांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सहानुभूतीची भावना निर्माण होते. त्याच्या जागी आपणही असू शकतो या जाणिवेने एक थंड शिरशिरी डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला अक्षरशः थिजवून जाते. एखाद्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर घरी परत येऊ का? असा अपशकुनी विचारही मनात येऊन जातो. नेमका काय हा प्रकार आहे?बुधवार, २९ मे, २०१९

या मार्गाने थकवा दूर कराया मार्गाने थकवा दूर करा

सततचे काम, शरीराला विश्रांती न दिल्याने खूप थकवा आणि अशक्तपणा येतो. अशावेळी काम करायचे ठरवले तरी शरीर मात्र साथ देत नाही. या थकव्याला दूर करण्याचे उपाय हे आपल्याच हातात आहेत हे आपण काय लक्षात ठेवले पाहिजे. दिवसभर काम, काम आणि फक्‍त काम करणारे अनेक जण असतात. त्या कामापुढे मग त्यांना कशाचेही भान नसते. याचा परिणाम त्यांच्या केवळ जीवनशैलीवरच होत नाही तर आरोग्यावरही होतो. विशेष म्हणजे सततचे काम आणि दररोजचे ताण देणारे काम यामुळे एकप्रकारे थकवा येतो. हा थकवा दूर करण्यासाठी मग नाना प्रकारे प्रयत्न केले जातात. असेच काही योग्य रीत्या केलेले उपाय आणि प्रयत्न थकवा दूर करू शकतात. सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर त्यासाठी आपण मनातून काही गोष्टी करणे आवश्‍यक आहे.


शनिवार, २५ मे, २०१९

लिंबू पाण्याचे फायदे
लिंबू पाण्याचे फायदे

सदैव ताजेतवाने आणि फ्रेश राहण्यासाठी लिंबूपाण्याचे सेवन नियमित केलेले चांगले. लिंबूमध्ये क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. शरीरासाठी आवश्यक असणारी क जीवनसत्वाची कमतरता लिंबूपाणी सेवनाने भरून काढता येते. दिवसाची सुरूवात लिंबूपाण्याने करणे अतिशय फायदेशीर ठरेल. आपल्या शरीराला क जीवन सत्वाची रोजच आवश्यकता असते त्या प्रमाणात ते शरीरात गेले पाहिजे ह्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे म्हणजेच नियमित लिंबूरस पोटात जायला हवा. रोज लिंबूपाणी घेतल्याने फक्त वजन कमी होणार नाही तर तुम्ही आरोग्याच्या इतर समस्यांपासूनही दूर रहाल. तर आपण आता जाणून घेऊया लिंबूपाणी घेण्याचे काय फायदे आहेत. लिंबूपाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन शरीर साफ होण्यास मदत होते.
हे आहेत लिंबू पाण्याचे फायदे!मंगळवार, २१ मे, २०१९

डिप्रेशनची कारणे काय आहेत


डिप्रेशनची कारणे काय आहेत


अनेकदा कामाचा ताण आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच बरेच लोकं मूड ठिक करण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर करतात. काही लोकं टीव्ही पाहतात तर काही लोकं सोशल मीडियाचा आधार घेतात. अशातच काही लोकं आपला मूड ठिक करण्यासाठी त्यांच्या आवडत्या पदार्थांकडे धावतात आणि अशा मूड ठिक करणाऱ्या पदार्थांमध्ये अनेकदा जंक फूडचाच समावेश असतो. संशोधनांधून असे समोर आले आहे की यामध्ये समावेश होणारे पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ तुमचं डिप्रेशन कमी करण्याऐवजी आणखी वाढवतात.
Image result for डिप्रेशन ची कारणे काय आहेत

शनिवार, १८ मे, २०१९

हायपरटेंशन म्हणजे काय


हायपरटेंशन म्हणजे काय

हायपरटेन्शन हा हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक, मूत्रपिंड रोग आणि पायातील धमन्यांमध्ये ब्लॉकेजसाठी वेदनादायक आणि गँगरीन होणारा सर्वात मोठा आणि टाळता येणारा धोका आहे. वेगवेगळ्या कारणांनी अलिकडे हायपरटेंशनची समस्या अधिक होत आहे. हृदयाचं मुख्य काम धमण्यांच्या माध्यमातून ऊर्जा आणि ऑक्सिजन देण्यासाठी शरीरात सगळीकडे ब्लड पंप करणे आहे. रक्तदाब वाढल्याची उदाहरणे सतत आजुबाजूला घडताना दिसतात. सतत परिश्रम, मानसिक ताण यासोबत इतर कारणांमुळेही रक्तदाबावर परिणाम होतो. वाढलेला रक्तदाब हा अनेक आजारांना निमंत्रण देतो. अतिरक्तदाबाची कोणतीही बाह्यलक्षणे दिसत नाहीत व तो केवळ मोजल्यानंतरच समजतो. त्यामुळे त्याला सायलंट किलर म्हणतात.
Older man measuring his blood pressure.

गुरुवार, १६ मे, २०१९

लठ्ठपणा कमी करण्यासाठी या पदार्थांपासून दूर राहा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी या पदार्थांपासून दूर राहा


हल्लीच्या जीवनशैलीत प्रत्येकजण लठ्ठपणामुळे परेशान आहे. कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा ही आजच्या जिवनपद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जातोय. सध्या भारतमध्ये जवळपास 4 कोटी 10 लाख लोकांचे वजन सामान्य वजनापेक्षा जास्त आहे. बहुतांश लोक सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसतात. 
Related image

सोमवार, १३ मे, २०१९

संत्र्याच्या रसाचे फायदे

संत्र्याच्या रसाचे फायदेसंत्र्याचा रस प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे होतात. रोगाच्या साथींपासून बचाव करण्यात संत्र्याचा रस महत्त्वाची भूमिका बजावतो. रक्त वाहिन्यांचं रोगांपासून रक्षण करण्याचं काम संत्र्याचा रस करतो.
उत्तम आरोग्यासाठी आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर नेहमीच आपल्याला देतात. आपल्या सर्वांच्या आवडीचं आणि आंबटगोड फळ म्हणजे संत्र. आहारात संत्र या फळाचा समावेश आपण अवश्य करावा. संत्र्याच्या नियमित सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात हे तर आपण चांगलेच जाणतो. संत्र्यात व्हिटॉमिन सी, कॅल्शियम, आयोडीन, सोडीयम, फॉस्फरस, अमिनो अॅसिड आणि व्हिटॉमिन ए यांसारखे प्रमुख घटक असतात.

शनिवार, ११ मे, २०१९

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपायआजारांचा सामना करण्यासाठी शरीराला सक्षम प्रणालीची आवश्यकता असते. ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. काही व्यक्तींमध्ये जन्मतःच रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा व्यक्तींना आजारांची लागण पटकन होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात थोडेसे बदल करणं आवश्यक असतं. जर रोग प्रतिकारक शक्ती मजबूत नसेल तर शरीराची रोगांच्या सोबत लढण्याची शक्ती कमी होते ज्यामुळे आपण लवकर आजारी पडतो. रोग प्रतिकारक शक्ती आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची डिफेंस सिस्टम आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जर शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अशातच आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी खाली दिलेल्या गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
Image result for रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे उपाय

बुधवार, ८ मे, २०१९

वजन वाढण्याची काही महत्वाची कारणे


वजन वाढण्याची काही महत्वाची कारणेहल्ली प्रत्येकजण आपल्या वाढत्या वजनाच्या समस्येने हैराण आहे. खरं तर वाढत्या वजनाची वेगवेगळी कारणं असतात. पण त्यातल्यात्यात जर लक्षात घ्यायचं झालं तर, आपल्या वाढत्या वजनासाठी आपला दिनक्रम आणि काही सवयी जबाबदार असतात. वजन अचानक वाढणे, किंवा वाढत राहण्याची अनेक कारणं आहेत, ती आपण नेहमी तपासून पाहिली पाहिजेत, किंवा त्याविषयी निरीक्षण नेहमीच नोंदवत राहिलं पाहिजे, यामुळे तुम्हाला वजन वाढण्याची नेमकी कारणं तरी कळतील, यामुळे तुम्हाला वजन पुन्हा कसं नियंत्रणात आणता येईल, हे देखील कळेल.
Related image

शुक्रवार, ३ मे, २०१९

सतत ढेकर येण्याची कारणे


सतत ढेकर येण्याची कारणे


जेवणानंतर ढेकर देणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. किंबहुना जेवणानंतर ढेकर दिल्यानंतर जेवणाऱ्याचे मन आणि भूक दोन्ही तृप्त झाले अशी मान्यता आपल्याकडे आहे. तर काही लोक ढेकर येण्याला अपचनाचे लक्षण समजतात. अश्या वेळी ढेकर येण्यामागे नक्की कोणते शास्त्रीय कारण आहे हे जाणून घेणे अगत्याचे आहे.  जेवल्यानंतर ढेकर जेवल्यानंतर दोन-चार वेळा ढेकर येणं समान्य गोष्ट आहे. परंतु सतत बराच वेळ ढेकर येत असतील तर ही काळजी कारण्यासाखी बाब आहे. सतत ढेकर येणे हे आरोग्यस हानिकारक ठरू शकते. 
Image result for ढेकर येण्याची कारणे

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...