शुक्रवार, ८ मार्च, २०१९

आपल्या जीवनाचा आपण खरा आनंद घेतला पाहिजे

आपल्या जीवनाचा आपण खरा आनंद घेतला पाहिजे

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये सर्वजण घड्याळ्याच्या काट्यावर जीवन व्यतीत करताना दिसून येत आहेत. प्रत्येकाचे कामाच्या वेळापत्रकाप्रमाणे संपूर्ण दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे वेळापत्रकच जणू बनून गेलेले आहे. बऱ्याचदा सर्वजण यांत्रिकपणे स्वतःचे जीवन जगताना दिसून येतात.
Related image

रोजच्या कामाच्या रगाड्यात स्वतःसाठी आणि इतरांसाठीही आपण पुरेसा वेळ काढताना दिसून येत नाही. आपण बदलत्या जीवनशैलीमध्ये स्वतःला पुरते बांधून घेतले आहे की, आपण खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद न घेता यांत्रिकपणे आपल्या कामांमध्ये स्वतःला झोकून देतो. काम करणे हे आपले कर्तव्य आहे. योग्य वेळी योग्य काम करून आपण आपला चरितार्थ चालवणं हे तर क्रमप्राप्तच आहे. पण आपण कुठल्याही प्रकारे स्वतःची काळजी न घेता सतत स्वतःला कामात झोकून देणे हे ही अयोग्यच आहे.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येकालाच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. अर्थात त्यातून लोक यशस्वी होऊन अमाप पैसा व प्रसिद्धी मिळवत आहेतच. पण त्याबरोबर वेळीच स्वतःची काळजी न घेतल्याने विविध शारीरिक तसेच मानसिक व्याधींनाही सामोरी जात आहेत.

कुठलंही काम करताना आपण ते काम करत आहोत, हे जर आपल्याला पक्कं ठाऊक असेल तर आपण त्या कामाला योग्य निवाडा देऊन त्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आपण आपल्या कामाचा डोक्यावर बोजा घेतला तर, त्यातला मोबदलाही आपल्याला बोजाच्या स्वरूपातच मिळेल. तेच जर आपण आपल्या कामाचा आनंद घेतला तर आपण त्या कामाला योग्य न्याय देऊन आपल्या आयुष्यातही आनंद निर्माण करण्यात यशस्वी होऊ. मग आपल्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला आस्वाद घेता येईल.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract? खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेल...