सफरचंद खा, निरोगी रहा.

सफरचंद खा, निरोगी रहा. 


आपल्याकडे विविध फळांची वर्षभर रेलचेल असते. ऋतुमानानुसार पौष्टिक घटकांनी युक्त विविध फळे आणि भाज्या आपल्या बाजारात आढळून येतात. वर्षभर मिळणारे, भरपूर गुणांनी युक्त, सर्वांचे आवडते फळ म्हणजे "सफरचंद". सफरचंद सहज उपलब्ध असणारे, खायला सोपे असणारे आणि शरीराला विविध फायदे मिळवून देणारे सुंदर फळ आहे.
Image result for सफरचंद

खूप जणांना सफरचंदाची साल काढून खाण्याची सवय असते. खरं पाहता, सफरचंदाच्या सालींमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, त्यामुळे केव्हाही सफरचंद सालीसकट चावून खाणे फायदेशीर ठरते. अथवा सफरचंदाच्या फोडी करून खाणे योग्य ठरेल. वयोमानानुसार चावण्याची शक्ती कमी झाल्यास सफरचंदाचा रस पिण्यास हरकत नाही.

आपण सफरचंदाचे विविध आरोग्यदायी गुणांची माहिती करून घेऊयात :
१) सफरचंदामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येते, ज्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते.   

२) सफरचंद सालीसकट पूर्ण खाल्यास कफाचा त्रास कमी होण्यास मदत होते.

३)नियमितपणे सफरचंदाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास दातांमधील कॅल्शिअम वाढण्यास मदत होते आणि हिरड्या सुदृढ राहण्यास मदत होते. 

४) खूप जणांचे दात किडलेले आढळून येतात. सफरचंद नियमित योग्य प्रमाणात खाल्ल्यास दाताला लागलेली कीड थांबवण्यास मदत होते. कारण सफरचंदामधील तंतू दातांची आतून साफ सफाई करतात आणि ह्यातील प्रतिजैविक तत्व शरीरातील हानिकारक जीवाणू आणि विषाणूची संख्या कमी करण्यास उपयोगी ठरतं.

५) सफरचंदाच्या योग्य सेवनाने शरीरातील लाळेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते. अर्थात तोंडातील हानिकारक जीवाणू आणि विषाणू कमी होतात.

६) सफरचंदाच्या नियमित योग्य प्रमाणात सेवनाने वाताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

७) सफरचंद योग्य प्रमाणात सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. सफरचंद नियमित सेवनाने आणि योग्य व्यायाम केल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. सफरचंद खाल्याने शरीरातील कॅलरी कमी होतात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.  

८) सफरचंद खाल्ल्याने आपले डोळे मजबूत, स्वच्छ आणि निरोगी राहतात. सफरचंदाच्या नियमित सेवनाने डोळ्याचे स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.

९) सफरचंदाच्या नियमित सेवनाने चेहऱ्यावरील काळे डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. सफरचंदामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते, त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

१०) सफरचंदातील सालामुळे रक्तातील सारखेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणून मधुमेह असलेल्या व्यक्तींनी सफरचंद सालासकट खाणे फायदेशीर ठरते.

११) नियमितपणे सफरचंदाच्या योग्य सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

१२) सफरचंदामध्ये लोहाची मात्रा जास्त असल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होण्यास मदत होते. अर्थात शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.

१३) सफरचंदामधील पोषक घटकांमुळे कर्करोगपासून बचाव होण्यास मदत होते.

१४) सफरचंदामधील अँटी ऑक्सिडंट घटकांमुळे शरीरातील यकृत चांगले राखण्यास मदत होते.

१५) सफरचंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने अतिसार आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये सफरचंदाच्या सेवनाने शरीराला आराम मिळतो.

१६) सफरचंद हे फळ म्हणजे ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे सफरचंदाच्या नियमित आणि योग्य प्रमाणात सेवनाने शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. शरीराची क्षमता त्यामुळे वाढते.

अशा विविध गुणांनी युक्त आणि शरीरातील जवळजवळ सर्वच अवयवांना फायदेशीर ठरणारे, वर्षभर उपलब्ध असणारे बहुगुणी फळ म्हणजे "सफरचंद" होय. डॉक्टर नेहमी म्हणतात "जर तुम्ही रोज एका सफरचंदाचे सेवन कराल, तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही." म्हणूनच सफरचंदाचे नियमितपणे योग्य प्रमाणात सेवन करणे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे आणि ते आपल्या शरीरासाठी लाभदायकसुद्धा आहे.


खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या