थकवा येण्याची ही मूळ कारणे माहीत आहेत का?

थकवा येण्याची ही मूळ कारणे माहीत आहेत का? 

जर का आपण थोडेसे जरी कष्टाचे काम केले तर दम लागतो का? आपल्याला नेहमीच पायऱ्या चढताना-उतरताना त्रास होतो का? एखादे साधारणसे वजनदार सामान उचलण्यास आपण घाबरता का? याचा अर्थ तुम्ही बहुतेक लवकर थकत असाल. तज्ञांच्या एका अभ्यासात असे दिसून आले की नेहमी थकवा येणे हे अनेक आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात. कसे ते आता आपण नीटपणे समजावून घेऊया.
Related image

हृदयाशी संबंधित समस्या

आपल्या माहितीसाठी म्हणून येथे सांगावेसे वाटते आणि ते म्हणजे शारीरिक थकवा आणि हृदयाशी संबंधित समस्या यांचा एकमेकांशी खूप घनिष्ट संबंध आहे. हृदयरोगाने पीडित असलेल्या लोकांवर करण्यात आलेल्या तज्ञांच्या एका संशोधनानुसार, त्यांच्यापैकी ७० टक्के लोकांनी नेहमी त्यांना नेहमीच थोड्या फार प्रमाणात थकवा जाणवत असल्याबाबत दुजोरा तज्ञांना दिला आहे. रक्तवाहिन्यांमध्ये होणारा रक्तप्रवाह जर बाधित झाला असेल तरीही असे होऊ शकते.

थायरॉइडशी संबंधित समस्या 

हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये साधारण ३० ते ४५ वर्षांच्या मध्यम वयाच्या महिला व पुरुषांना अनेक वेळा थायरॉइड ग्रंथींच्या सामान्य प्रमाणापेक्षा कमी सक्रियतेमुळेही अधिक थकवा जाणवू शकतो असे तज्ञांना दिसून आले. या ग्रंथी गळ्यात स्थित असतात आणि टी ३ व टी ४ हार्मोन सक्रिय करण्याचे काम करतात. यामध्ये जर कमतरता निर्माण झाली तर वजन वाढणे, खूप थंडी वाजणे, मलावरोध, त्वचा रुक्ष होणे आणि केस गळणे यांसारख्या समस्या उद्भवण्यास सुरवात होते.

रक्ताची कमतरता 

ज्या व्यक्तीच्या शरीरात लोहाची कमतरता असते त्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवते असे आपण म्हणू शकतो. साधारणत: मासिक पाळी, गर्भावस्था आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांना ही अशा प्रकारची समस्या झेलावी लागू शकते. अशा वेळी अशा महिला ऍनिमिक होण्याची शक्यताही खूप प्रमाणात वाढते. याशिवाय मधुमेह असलेल्या लोकांच्या शरीरात रक्तातील साखरेच्या कमतरतेमुळे देखील थकवा जाणवू शकतो.

लिव्हरशी संबंधित समस्या 

जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हानिकारक व्हायरस झाले असतील तर त्या व्यक्तीच्या लिव्हरला इजा पोहोचून अशा व्यक्तीस नेहमी थकवा येऊ शकतो. लिव्हरची कार्यप्रणाली जर असामान्य असेल किंवा शरीरामध्ये एखादा संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीला थकवा येण्यासारखी परीस्थिती निर्माण होते.


खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या