बहुगुणी पेरूचे फायदे आपल्याला माहित आहेत का

बहुगुणी पेरूचे फायदे आपल्याला माहित आहेत का 

ऋतुमानानुसार आपल्याला वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचा आस्वाद वर्षभर घेता येतो. आपल्या आवडीप्रमाणे गोड, आंबट, रुचकर आणि बहुगुणी फळं आपल्या जिभेला तर खुश करतातच, पण आपल्या शरीरालाही आवश्यक असलेल्या पौष्टिक घटकांचा नैसर्गिकरित्या पुरवठा करतात. आज अशाच एका रुचकर आणि बहुगुणी फळाची माहिती जाणून घेऊयात, ते फळं म्हणजे "पेरू". 
Related image

पेरू हे खूप लोकांना आवडतात. काही लोकांना कडक तर काही लोकांना अगदी पिकलेले पेरू खायलाही आवडतात. पेरू एक आंबट-गोड चवीचे फळ आहे. पेरूची झाडे ही  विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात बहुतेककरून वाढतात. पेरू आतून पांढरे अथवा लालसर अथवा गुलाबी असते. पेरूच्या गरात भरपूर बिया आढळतात. पेरू चवीला अतिशय रुचकर असतात. पेरूमध्ये "क' जीवनसत्त्व आणि 'अ' जीवनसत्व तसेच लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम ही खनिजदेखील मुबलक प्रमाणात आढळतात.

अशा ह्या बहुगुणी पेरूचे आपण फायदे बघुयात: 

१) पेरू शरीरातील चयापचय क्रिया सुरळीत ठेवायला मदत करतो. म्हणून पेरू खाल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

२) आपल्या शरीरात चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यात थायरॉइड ग्रंथी महत्त्वाची भूमिका बजावतात. पेरूमध्ये आयोडीनचे प्रमाण थोडे जास्त असते, त्यामुळे थायरॉइडच्या समस्येत आराम मिळण्यास मदत होते आणि शरीराचे हार्मोनल संतुलन कायम राहण्यास मदत होते.

३) पेरुंमध्ये 'क' जीवनसत्व आणि पोटॅशियम आढळून येते. म्हणून पेरूच्या सेवनाने त्वचेवर उमटणारे चट्टे, किंवा डोळ्यांभोवती येणारी काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होते. 

४) पेरुचा गर शरीरावर लावल्याने त्वचेमधील अशुद्धी दूर होते आणि त्वचा नितळ होऊन तेजस्वी दिसण्यास मदत होते. 

५) पेरू ८०% पाणी असल्यामुळे पेरूच्या सेवनाने त्वचेतील ओलावा कायम राखण्यास मदत करते.

६) पेरूमध्ये 'अ' जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे डोळे निरोगी ठेवण्यात मदत होते. 

७) पेरूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तातील साखरेचा स्तर कमी होण्यास मदत होते. ह्यातील नैसर्गिक घटक साखरेच्या पातळीला नियंत्रित ठेवायला मदत करते आणि इन्सुलिन वाढवण्यात उपयोगी ठरते. म्हणून मधुमेह असलेल्यांची पेरूचे योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते. 

८) पेरूच्या पानांचा काढा करून त्याने जर गुळण्या केल्यास अथवा पेरूच्या पानांचा काढा थोडा वेळ तोंडात धरल्यास दंतविकार, हिरडय़ांची सूज व तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. 

९) एखाद्या व्यक्तीला दारू अथवा भांग जास्त झाल्यामुळे भरपूर नशा झाली असल्यास त्या व्यक्तीला  पेरूच्या पानांचा रस प्यायला दिल्याने त्याची नशा कमी होण्यास मदत होते.

१०) पेरूमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. पेरूच्या सेवनाने शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.  त्यामुळे रक्तदाब संतुलित राहण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.


खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या