मटार आपल्या आरोग्यासाठी खूपच फादेशीर आहेत

मटार आपल्या आरोग्यासाठी खूपच फादेशीर आहेत

हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीज, तांबे अशा पूर्व प्रकारच्या खनिजाचे प्रमाण जास्त असते. खनिजांचा योग्य प्रमाणात शरीराला पुरवठा झाल्याने वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला बचाव करता येतो.
तसेच मटारमध्ये अँटी ऑक्सिडेंट तत्व असल्याने, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या शरीराला विविध आजारांपासून लढण्यास मदत मिळते.

ज्यांना हृदयरोग आहे अशा लोकांसाठी मटारचं योग्य प्रमाणात सेवन फायदेशीर ठरू शकत. मटारमध्ये सूज कमी करणारे अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तसेच हृदयासंबंधी असणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते. 

मटारमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे केसगळती कमी होण्यास मदत होते. तसेच केस मुलायम आणि मजबूत होण्यास मदत होते. तसेच मटारमध्ये असलेले व्हिटॅमिन बी ६, बी १२ आणि फॉलिक अॅसिड हे घटक लाल रक्तपेशी तयार करण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या