खरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं

खरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं

जर कोणाच्या काही लक्षात राहत नसेल तर सर्रास आपण म्हणतो, "अरे भिजवलेले बदाम खा म्हणजे तुझी स्मरणशक्ती वाढेल". खरं पाहता, लहान मुलांना आपण आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे म्हणून भिजवलेले बदाम नेहमी खायला देतो. त्याची स्मरणशक्ती वाढणे हे गरजेचे असते. तसेच मोठ्या माणसांना पण सल्ला दिला जातो, भिजवलेले बदाम खा म्हणजे सर्व लक्षात राहील. तज्ञ सांगतात, बदामामध्ये अनेक गुणकारी घटक असल्याने बदाम खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते.

सर्वप्रथम रात्री पाण्यामध्ये अंदाजे ४ ते ६ बदाम भिजत ठेवा आणि सकाळी नाश्त्याबरॊबर किंवा नाश्त्यानंतर साल काढून बदाम खा. कारण जर बदाम भिजवून आणि साल न काढता खाल्ले गेले तर शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढू शकते. तसेच रिकाम्या पोटी कधीही बदाम खाऊ नये, त्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो, तसेच पचनक्रियेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. बदामाच्या सालामध्ये टॅनिन असते आणि हे टॅनिन बदामातील पोषण तत्वांचा फायदा होण्यापासून शरीराला रोखते. म्हणून बदाम भिजवून खाणे फायदेशीर ठरते, कारण बदाम भिजवल्यामुळे त्याची सालं निघतात आणि बदामामधील सर्व पौष्टिक घटकांचा शरीराला फायदा होतो.

आता आपण भिजवलेल्या बदामाचे काही फायदे जाणून घेऊयात:

1) बदामात मुबलक प्रमाणात अनेक व्हिटॅमिन आणि खनिजे आढळून येतात. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे ह्याचे प्रमाण भरपूर असते. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या सर्व पोषण तत्वांचा आपल्या शरीराला लाभ मिळवण्यासाठी बदाम रात्रभर भिजवून खाणे फायद्याचे ठरते.

2) बदाम हे आपल्या शरीरातील वाताला शांत करण्यास मदत करतात.

3) केव्हाही सेंद्रीय बदाम खाणे उत्तम ठरते, त्याने त्वचेचा तजेलेदारपणा कायम राखण्यास मदत होते.

4) बदामाची साल ही पचण्यास जड असल्याने बदाम भिजवून नंतर साल काढून खाणं सोयीस्कर ठरतं, त्यामुळे बदाम सहजरित्या पचले जातात. 

5) भिजवलेले बदाम हे पचण्यास उत्तम असतात, त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होते.

6) भिजवलेले बदाम खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

7) भिजवलेले बदाम खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. कारण बदामामुळे भूक कमी लागते. जर वजन कमी करायचे असल्यास रोज मूठभर बदाम खावेत, जेणेकरून अतिरिक्त न खाता आपले वजन योग्य नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.

8) बदामामध्ये व्हिटॅमिन बी17 आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात आढळून येते, त्यामुळे भिजवलेल्या बदामाच्या नियमित सेवनाने कॅन्सरसारख्या रोगापासून वाचण्यास मदत होऊ शकते. कारण ते शरीरातील ट्यूमरची वाढ रोखण्यास मदत करते.

तर अशा ह्या गुणकारी बदामाला भिजवून खाल्ले तर त्यातील सर्व पौष्टिक घटकांचा शरीराला योग्यप्रकारे फायदा मिळतो. म्हणूनच घरातील सर्वांनी भिजवलेल्या बदामाचा आपल्या खाण्यात जरूर सहभाग करावा.


खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या 

Regards
Sanket Prasade
health tips in marathi


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या