बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

बहुगुणी पेरूचे फायदे आपल्याला माहित आहेत का

बहुगुणी पेरूचे फायदे आपल्याला माहित आहेत का 

ऋतुमानानुसार आपल्याला वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचा आस्वाद वर्षभर घेता येतो. आपल्या आवडीप्रमाणे गोड, आंबट, रुचकर आणि बहुगुणी फळं आपल्या जिभेला तर खुश करतातच, पण आपल्या शरीरालाही आवश्यक असलेल्या पौष्टिक घटकांचा नैसर्गिकरित्या पुरवठा करतात. आज अशाच एका रुचकर आणि बहुगुणी फळाची माहिती जाणून घेऊयात, ते फळं म्हणजे "पेरू". 
Related image

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

चिकूचे हे फायदे आपल्याला माहित आहेत का

चिकूचे हे फायदे आपल्याला माहित आहेत का 


आपल्याकडील बाजारामध्ये हंगामाप्रमाणे विविध प्रकारची फळ आणि भाज्या उपलब्ध असतात. हंगामाप्रमाणे शरीराला आवश्यक असलेले पौष्टिक घटक आपल्याला निरनिराळ्या फळांमधून आणि भाज्यांमधून मिळतात. असेच सहज उपलब्ध असणारे आणि सर्वांचे आवडते फळ म्हणजे "चिक्कू". लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच चिक्कू खायला आवडतात. चिक्कू खाणं सोपं असल्याने आणि चवीला गोड, मऊ असल्याने सर्वच वयोगटासाठी सोयीचं ठरतं. खूप जणांना चिक्कूचा रस प्यायलाही आवडतो. 

Image result for चिकू

शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

खाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा म्हणजे काय

खाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा म्हणजे कायखाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बाय कार्बोनेट अथवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असे याचे इंग्रजी रासायनिक नाव आहे. हे एक प्रकारचे मीठ आहे. हा खाण्याचा सोडा अल्कली गुणधर्माचा आढळून येतो. हे पांढऱ्या भुकटीच्या म्हणजेच पावडरच्या स्वरुपात अथवा पांढऱ्या स्फटिक स्वरुपातसुद्या सापडते. 

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

आपल्या आयुष्यात पाण्याचे काय महत्व आहे

आपल्या आयुष्यात पाण्याचे काय महत्व आहेशरीरातील आम्लाचा प्रभाव कमी करण्यासाठी दिवसभरात चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करून जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर देणे, शरीरासाठी केव्हाही उपयुक्त ठरते. दिवसभरात कुठलेही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा पाणी पिण्यावर आपण भर देणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होईल.

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

मटार आपल्या आरोग्यासाठी खूपच फादेशीर आहेत

मटार आपल्या आरोग्यासाठी खूपच फादेशीर आहेत

हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीज, तांबे अशा पूर्व प्रकारच्या खनिजाचे प्रमाण जास्त असते. खनिजांचा योग्य प्रमाणात शरीराला पुरवठा झाल्याने वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला बचाव करता येतो.

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

चांगल्या फिटनेससाठी पौष्टिक खिचडीचा वापर नक्की करा

चांगल्या फिटनेससाठी पौष्टिक खिचडीचा वापर नक्की करा

जेव्हा आपण कामावरून दमून घरी येतो, दिवसभराच्या थकव्याने जेवण बनवण्याचा कंटाळा येतो. पण घरातील सात्विक अन्न खाण्याची इच्छा असल्याने आपण पटकन होणारी, रुचकर आणि पौष्टिक अशा खिचडीचा पर्याय निवडतो. कारण कमी वेळात होणारी, पचायला हलकी, चवीला उत्तम अशी खिचडी घरातील सर्वांनाच आवडते. जेव्हा पोटात गडबड असते, तेव्हाही खिचडीचा पर्याय उत्तम ठरतो. रोजच्या जेवणातून बदल म्हणूनही आपण खिचडीचा आनंदाने स्वीकार करतो. तर अशी ही सर्वांची आवडती खिचडी आपल्या पौष्टिक घटकांसाठी सर्वांची प्रिय आहे. आज आपण खिचडीतील गुणधर्म जाणून घेऊयात:

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

घरात औषधी हळद असणे हे कायम फायद्याचे ठरते

घरात औषधी हळद असणे हे कायम फायद्याचे ठरतेआपल्या रोजच्या जेवणात सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हळद. कुठलाही पदार्थ बनवताना आपण फोडणीमध्ये प्रथम हळद घालतो. हळद ही अत्यंत गुणकारी समजली जाते. आपल्याला जखम झाल्यास त्यावर जर आपण हळद लावली तर जखमेवर हळद अँटिसेप्टिक म्हणून काम करून आपली जखम लवकर बरी होण्यास मदत होते. तसेच सर्वाना माहित आहे, सुंदर त्वचेसाठी हळद विशेषकरून वापरली जाते. आपल्या लग्नसमारंभात नवरा-नवरीला हळद लावण्याचा एक पूर्वापार चालत आलेला अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. अशा ह्या सर्वगुणसंपन्न हळदीचे काही औषधी गुणधर्म आपण जाणून घेऊयात:

सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

काय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे

काय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदेसर्वांनाच जेवण करून झाल्यावर बडीशेप खाण्यास आवडते. गोड असो अथवा तिखट जेवणानंतर मुखशुद्धीसाठी बडीशेप खाण्यास चांगले वाटते. बडीशेपमध्ये विविध औषधी गुणधर्म आढळून येतात. बडीशेपेचे सर्वश्रुत असलेले फायदे म्हणजे अपचन दूर करणे अथवा पोटदुखी कमी करण्यास मदत होते. बडीशेपमध्ये खनिज आणि जीवनसत्त्व तसेच अनेक पोषक तत्वे आढळून येतात. तर अशा ह्या आवडत्या बडीशेपचे उपयोग जाणून घेऊयात:

रविवार, १० फेब्रुवारी, २०१९

थकवा पळवण्यासाठी सकाळी प्या 'ही' हेल्थ ड्रिंक्स

थकवा पळवण्यासाठी सकाळी प्या 'ही' हेल्थ ड्रिंक्स
आपल्या सर्वांनाच विविध प्रकारची पेय पिण्यास आवडतात. सगळ्यात नैसर्गिक पेय म्हणजे "पाणी". विविध प्रकारचे फळांचे, भाज्यांचे रस म्हणजे शरीरासाठी उत्तम, कारण त्यामध्ये विविध पौष्टिक गुणधर्म आढळून येतात. आज आपण काही आरोग्यासाठी उपयुक्त अशा पेयासंबंधी माहिती करून घेऊया:

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

खरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं

खरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं

जर कोणाच्या काही लक्षात राहत नसेल तर सर्रास आपण म्हणतो, "अरे भिजवलेले बदाम खा म्हणजे तुझी स्मरणशक्ती वाढेल". खरं पाहता, लहान मुलांना आपण आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे म्हणून भिजवलेले बदाम नेहमी खायला देतो. त्याची स्मरणशक्ती वाढणे हे गरजेचे असते. तसेच मोठ्या माणसांना पण सल्ला दिला जातो, भिजवलेले बदाम खा म्हणजे सर्व लक्षात राहील. तज्ञ सांगतात, बदामामध्ये अनेक गुणकारी घटक असल्याने बदाम खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते.

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...