बुधवार, २३ जानेवारी, २०१९

जाणून घेऊयात काय आहे नक्की कोलेस्टेरॉल

जाणून घेऊयात काय आहे नक्की कोलेस्टेरॉलआपण व्यायामाने कोलेस्टेरॉल कमी करू शकतो का?
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असला तरी आपण जसा व्यायाम करून आपण शरीरातील चरबी कमी करू शकतो तसा, शरीरातील कोलेस्टेरॉलचा स्तर कमी करू शकत नाही.

सोमवार, २१ जानेवारी, २०१९

शरीराच्या योग्य वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याबद्दल जाणून घेऊया

शरीराच्या योग्य वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याबद्दल जाणून घेऊयाआपण आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याबद्दल माहिती घेऊया. "अन्न हे पूर्ण ब्रह्म" हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या शरीराची वाढ ही आपण घेत असलेल्या पौष्टिक व संतुलित आहारावर अवलंबून असते. अन्नाप्रमाणेच एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते ते म्हणजे "पाणी".

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

नवीन माहिती मिळाल्यामुळे आपल्या ज्ञानात नेहमीच भर पडते

नवीन माहिती मिळाल्यामुळे आपल्या ज्ञानात नेहमीच भर पडतेलहान मुलांकडूनही बरंच काही शिकण्यासारखं असत. स्वतःला हवी असलेली वस्तू मिळेपर्यंत लहान मुलं शांततेने किंवा आपल्या मागे लडिवाळपणे तगादा लावून हवी असलेली वस्तू मिळवतात. 
त्या दरम्यानं आपण त्याच्यावर कितीही रागावलो तरी ते आपला हट्ट म्हणा किंवा मागणी म्हणा मागे घेत नाही. जर आपण आपला विचार केला तर आपल्याला जाणवेल आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची पूर्तता होतं नसल्यास, हे घडणारच नाही अशी स्वतःची समजूत करून घेतो व त्या गोष्टीचा नाद सोडून देतो.
पण लहान मुलं त्यांना मिळेपर्यंत विविध शक्कल लढवून आपल्याला हवी असलेली गोष्ट ती पण आनंदाने आपल्याकडून मिळवतात. बऱ्याच वेळा जर आपलं कुणाशी भांडण झालं किंवा काही वाद झाला तर आपण त्या व्यक्तीबरोबर अबोला धरतो, त्यांच्याशी नीट वागत नाही, आपण कुणाला पटकन क्षमा करू शकत नाही.
तेच जर तुम्ही लहान मुलांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल त्याचं जर कोणाबरोबर भांडण झालं तर दुसऱ्या क्षणाला ते विसरून त्या व्यक्तीबरोबर पाहिल्यासारखे सहज मिसळून जातात. आपणही कधी कधी रागाच्या भरात मुलांना ओरडतो, ते ऐकत नाही म्हणून आपली चिडचिड होते. आपल्या डोक्यातून हा राग पटकन जात नाही, पण मुलं मात्र दुसऱ्या क्षणाला सार काही विसरून आपल्याशी नीट वागतात. खरंच लहान मुलांकडून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
वयाची मर्यादा न बाळगता आपल्याला जे आवश्यक आहे, जे आपल्या ध्येयाप्रती गरजेचे आहे किंवा जे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगी आहे ते शिकण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. ज्या गोष्टी शिकून आपल्या ज्ञानात भर पडून आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात त्याचा आपल्याला फायदा होणार असल्यास अशा गोष्टी शिकण्यासाठी कधीच वयाचं आणि वेळेचं बंधन न बाळगता ती नवीन गोष्ट शिकण्याची आपली तयारी असली पाहिजे.

सतत काहीतरी नवीन शिकण्याने आपल्या मनाला ताजेतवाने वाटते. नवीन माहिती मिळाल्यामुळे आपल्या ज्ञानसागरात भर पडते, त्याचा उपयोग आपल्याला आपल्या समस्या सोडविण्यासाठी होतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये "आता काय करू?" असा प्रश्न न पडता आपल्याकडे असलेल्या ज्ञानातून, माहितीतून त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मार्ग काढायला मदत होते. वयाची कुठलीही मर्यादा न पाळता सतत काहीतरी नवीन शिकून आपल्या ज्ञानात जरूर भर घाला.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

सोमवार, ७ जानेवारी, २०१९

पाणी हेच जीवन, भाग २

पाणी हेच जीवन, भाग २ 
आपण आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याबद्दल माहिती घेऊया. "अन्न हे पूर्ण ब्रह्म" हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या शरीराची वाढ ही आपण घेत असलेल्या पौष्टिक व संतुलित आहारावर अवलंबून असते. अन्नाप्रमाणेच एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते ते म्हणजे "पाणी".
Image result for पाण्याचे महत्व

आपल्या शरीरात पाण्याची मात्रा ७०% आहे. दिवसभरात येणार घाम, लघवीद्वारे, श्वसनक्रिया ह्यांमार्फात सतत आपल्या शरीरातील पाण्याची मात्रा कमी होत असते. म्हणूनच दिवसाला ७-८ ग्लास (अंदाजे २ लिटर) पाणी पिणे गरजेचे आहे. साधारण २० किलो वजनाच्या व्यक्तीला दिवसातून १ लिटर पाणी पिण्याची गरज असते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यावरून आपण आपला पाणी पिण्याचा अंदाज सहज लावू शकतो. पाण्यामुळे आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते व दिवसभरात येणारा थकवा कमी होण्यास मदत होते.

योग्य प्रमाणात योग्य वेळी पाणी घेतल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. शरीरातील विषारी द्रव्य (toxins) बाहेर टाकण्यास पाणी मदत करते. सकाळी उठल्यावर पाणी पिण्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्याची क्रिया सुरळीतपणे पार पडते. पाण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हृदयाला आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला नियमितपणे व योग्य प्रमाणात रक्तपुरवठा करण्यास पाण्याची मदत होते. फळे म्हणजे पाण्याचा नैसर्गिक स्रोत आहे. फळांमध्ये जीवनसत्त्व व खनिजे असतात. फळ आणि पाणी ह्यांच्या योग्य समन्वयाने आपली त्वचा मुलायम व उजळ राहण्यास मदत होते.


दिवसभराच्या कामामध्ये व्यस्त असताना एकाच वेळेस भरपूर पाणी पिणे किंवा पाणी खूपच कमी प्रमाणात पिणे हे दोन्ही आरोग्यासाठी घातकच आहे. दिवसभरात एकाचवेळी पाणी पिण्यापेक्षा दर काही तासांनी पाणी पिण्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही. बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते किंवा पाण्याच्या घोटाबरोबर जेवायची सवय असते. पण संशोधनात असे आढळून आले आहे की, जेवणानंतर लगेच पाणी पिण्याने किंवा जेवताना सतत पाणी पिण्याने शरीरावर कालांतराने वाईट परिणाम होतात.

जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्यामुळे खाल्लेलं अन्न पचण्यास बाधा निर्माण होते आणि पोट सुटण्याचा संभव असतो, ज्यामुळे भविष्यात ते विविध आजारांसाठी निमंत्रण ठरू शकते. म्हणूनच जेवणाआधी आणि जेवणानंतर अंदाजे ३० मिनिटांनी पाणी प्यावे. रात्रीपेक्षा दिवसभरात प्रमाणात पाणी पिणे शरीरासाठी योग्य असते. दिवसा वेळ मिळत नाही म्हणून अवेळी पाणी पिणे शरीरासाठी अयोग्य आहे. योग्य वेळी व योग्य प्रमाणात पाणी पिण्याने आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते आणि बऱ्याच आजारांचे उगम स्थान असलेल्या पोटाच्या समस्याही दूर होण्यास मदत होते.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

पाणी हेच जीवन, भाग १

पाणी हेच जीवन, भाग १ 


आपण आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याबद्दल माहिती घेऊया. "अन्न हे पूर्ण ब्रह्म" हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या शरीराची वाढ ही आपण घेत असलेल्या पौष्टिक व संतुलित आहारावर अवलंबून असते. अन्नाप्रमाणेच एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते ते म्हणजे "पाणी".
Related image
hopeinasunrise.com

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...