तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे काय आहेत

तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे काय आहेत


www.google.com
आपणा सर्वांना तुळशीबद्दल माहिती आहेच, ती आपण आपल्या घरात लावतो आणि आपण तिची पूजा करतो. हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र मानले जाते. तुळस वनस्पती अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. ज्यामध्ये नैसर्गिक गुणधर्मांची संख्या खूप जास्त आहे.
तुळशीचा वापर अनेक रोगांपासून टाळण्यासाठी केला जातो. जर आपण तुळशीचा दररोज वापर केला, तर आपल्या शरीरातील बऱ्याच रोगांना आपण मूळापासून दूर करू शकतो. आज आपण तुळशीच्या पानांच्या फायद्यांबद्दल माहिती जाणून घेऊया.

तुळशीस फार पूर्वीपासूनच आपल्या भारतीय आयुर्वेदामध्ये एक रामबाण औषधही मानले जाते, कारण यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषक द्रव्ये आहेत, तसेच याचे तेल एक जैवप्रतिरोधी असल्याने या तेलाचा वापर विविध आजारांवरही आपल्या आयुर्वेदामध्ये फार पूर्वीपासून केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये यास एक घरगूती औषधाचा भंडार मानले जाते. सर्दी, खोकला, ताप, दांतदुखी, श्वासातील दुर्गंधी, दमा, फुफ्फुसांचे रोग, हृदयाचे विकार, हया सर्वांमध्ये प्राचीन काळापासून तुळस वापरली जाते. तुळशीची ताजी पाने कच्ची आहे तशी खाल्ल्यास सर्दी खोकला लवकर बरा होतो. दुखऱ्या दातांमध्ये तुळशीचे तेल भरल्यास दातांच्या वेदना कमी होण्यास मदत होते. तुळशीची ताजी पाने खाल्ल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

तुळस आपल्याला विविध शारीरिक संक्रमणापासून बचाव करण्यास मदत करते. तुळशीच्या पानांचे २- ३ थेंब जर पाण्यात टाकले तर ते पाणी निर्जंतुक होते. खासकरून लहान बाळांच्या अंघोळीसाठी तुळशीच्या पानांना पाण्यात टाकून त्याने लहान बाळांना अंघोळ घातल्यास ते त्यांच्यासाठी खूपच आरोग्यदायी मानले जाते. तुळशीची पाने ही खूपच सुगंधीत असतात, या पानांचा सुगंध घेतल्यास श्वसनलिकेतील जिवाणूंचे संक्रमण कमी होण्यास मदत होते. प्रत्येक घरासमोर एक तुळस असल्यास घरातील हवा शुध्द राहण्यास त्याची खूपच मदत होते. तुळशीच्या पानांना योग्य प्रकारे कूटून ती मधासोबत घेतल्यास घशातील कफ दूर होण्यास मदत होते. आपल्या भारतात पारंपारीक पध्दतीने विविध जैविक संक्रमणात विविध औषंधीसोबत तुळशीच्या पानांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

आजही बऱ्याच लोकांच्या मते तुळस वृंदावन आपल्या घरात असल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी करते आणि वाईट परिणामांपासून आपल्याला वाचवते. तुळशीतील प्रतिजैविक आणि वेदनानाशक गुणामुळे हे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. तूळशीच्या पानांचा चहा पिण्याने आपल्याला तजेलदार वाटते. त्यामुळे शरीरातील सकारात्मक उर्जा प्रवाहीत होण्यास मदत होते, जेणेकरून मानसिकदृष्टया व्यक्ती प्रबळ होते. खुप वेळा घरामध्ये एखादे तरी तुळस वनस्पती लावावी असे सांगितले जाते. संशोधकांनी आपल्या अनेक संशोधनातून तुळस ही औषधी गुणधर्माची वनस्पती असून तिचे मानवी शरिरासाठी अनेक फायदे असल्याचे सिद्ध केले आहे. तुळशीतील औषधी गुणांमुळे तुळशीचा समावेश औषधी वनस्पतींमध्ये नेहमीच करण्यात येतो. अशी ही गुणकारी तुळस वनस्पती प्रत्येकाच्या घरी असणे, हे नक्कीच प्रत्येकासाठी लाभदायक आहे.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या