थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी कशा प्रकारे घ्यावी

थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी कशा प्रकारे घ्यावी


www.google.com
थंडीच्या दिवसांत कोरड्या हवेने त्वचेचा ओलावा नाश पावतो. यामुळे त्वचेवर ताण आणि डाग निर्माण होतात. त्याचा प्रभाव केवळ तुमच्या चेहऱ्यावरच नाही, तर शरीराच्या इतर भागांवर देखील होतो. या हंगामात आपल्याला विशेष काळजी घेतली पाहिजे.
हिवाळ्यात देखील त्वचा निरोगी बनविण्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. हिवाळ्यातील त्वचेच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी, हिवाळ्यामध्ये विशेषतः कोणती काळजी घ्यावी, ह्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

१) सामान्य त्वचेची समस्या:
आजकालच्या तणावाच्या वातावरणात तजेलदार चेहरा शोधणे थोडे अवघड आहे. हिवाळ्यात त्वचेला कोरडेपणा आणि खाज येणे हे फारच सामान्य आहे. कोरडी हवा नेहमी त्वचेचा ओलावा शोषून घेते, त्यामुळे त्वचा फुटणे आणि जळजळ यांसारख्या समस्या उद्भवतात. हिवाळ्यात, त्वचेच्या विविध समस्या टाळण्यासाठी विशेष त्वचेची काळजी घ्यावी. सौम्य साबण आणि मॉइस्चरायझरचा वापर करून, आपण बऱ्याच अंशी कोरडेपणापासून सहज दूर राहू शकतो. ज्या लोकांची त्वचा अत्यंत संवेदनशील आहे, त्यांनी अशा मॉइस्चरायझरचा वापर करावा ज्यामध्ये कोणताही सुगंध नसतो.
www.google.com
२) सूर्यकिरणे टाळा:
या हंगामात आपल्याला सूर्यप्रकाश चांगला वाटतो. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, या हंगामात देखील त्वचेसाठी सर्वात हानीकारक सूर्यप्रकाशाची परावर्तित किरणे म्हणजेच अल्ट्राव्हायलेट किरणे असतात. ही किरणे टाळण्यासाठी खूप सूर्यप्रकाशात बसू नये. तरीही, त्वचेच्या दृष्टीने ह्या हंगामात सन बाथ करणे तितकेसे लाभदायक नसते. कर्करोगाच्या जोखिमेसह, या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे आपल्या त्वचेच्या पेशी आणि रक्तवाहिन्या कमी होतात. सकाळच्या सूर्यप्रकाशात विटामिन डीच्या पुरवठ्याची काळजी घेतली जाते, तोपर्यंत सकाळी सूर्यकिरणे घेऊ शकतो. दुपार झाल्यानंतर, जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशात बाहेर जाल, तेव्हा त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावा.
www.google.com
३) कोमट पाण्याने स्नान करा:
हिवाळ्यात जास्त गरम पाणी वापरल्याने त्वचा कोरडी बनते. हे टाळण्यासाठी, कोमट पाण्याचा वापर करावा, जे त्वचेपासून आवश्यक नैसर्गिक तेल त्वचेतून पूर्णतः काढत नाही. हिवाळ्यात साबणाचा वापर कमी करावा. त्वचेवर घाण झाल्यास त्वचेवर स्क्रबिंग थांबवा, कारण ते त्वचे वरील छिद्र तर उघडेल, परंतु त्वचा आणखी कोरडी होण्याची श्यक्यता असते. त्वचा तेलकट असेल तरच स्क्रब करा जेणेकरुन ते त्वचेचे तेल कमी करेल. हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी स्क्रबिंग उपयुक्त नाही.
www.google.com
४) मॉइश्चरायझर:
तोंड धुतल्यावर किंवा अंघोळ केल्यावर लगेच मॉइस्चरायझर वापरावे, त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. नैसर्गिक मॉइस्चरायझर वापराणे केव्हाही उत्तम, जे आपल्या त्वचेला कोरडी होण्यापासून संरक्षित करते आणि आवश्यक असलेला ओलावा देते. ग्लिसरिन आणि गुलाब पाण्याद्वारे चेहरा, नाक आणि ओठ मालिश करणे फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या व हाताच्या तळव्यावर तसेच नखांवर, टाचांवर ते नियमितपणे लावा. यामुळे आपली त्वचा निरोगी राहील आणि त्वचेत ओलावा राहण्यास मदत होईल, जेणेकरून आपण त्वचेशी संबंधित रोगांपासून दूर राहू.
www.google.com

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या