शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

'या' समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतो आल्याचा चहा!
lokmat.com
आपल्यापैकी जवळ जवळ सगळेच जण सकाळी चहा किंवा कॉफी घेत असाल पण सकाळी एक कप आल्याचा चहा प्यायल्यानं तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायद्यांचा लाभ होतो. आल्यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि अन्य खनिजांचा भरपूर समावेश असतो. त्यामुळेच आले हे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत फायदेशीर असे खाद्य आहे.

आल्याच्या चहामध्ये तुम्ही पुदीना, मध आणि लिंबाचाही समावेश करू शकता जेणेकरून त्याला एक वेगळी चव येईल. अमेरिकन जर्नल ऑफ न्यूट्रीशनच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार आल्याचा चहा प्यायल्यानं आरोग्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला  मिळतात.1) आल्याच्या चहामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास खूपच मदत होते. शिवाय, बऱ्याच वेळेस जास्त प्रमाणात जेवण खाल्ल्यानंतर पोट फुगण्याची जी समस्या निर्माण होते, त्यापासून देखील चांगल्याप्रकारे आपल्याला सुटका मिळू शकते.


2) आल्याच्या चहामध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण भरपूर असल्यानं रक्ताभिसरण सुधारण्यास चांगल्या प्रकारे मदत मिळून आपल्या हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित असलेल्या समस्या कमी होण्यास त्याचा खूपच मोठा हातभार लागतो. शिवाय आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू नये, यासाठी देखील आले उत्तम असून यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होण्यास खूपच मदत होते.

3) श्वसनासंबंधातील म्हणजेच दम्यासारख्या आजारांपासून व्यवस्थित सुटका करण्यासाठी हा आल्याचा  चहा उपयुक्त नेहमीच ठरतो. त्याचप्रमाणे वारंवार होणाऱ्या सर्दी आणि खोकल्यावरही आले अत्यंत फायदेशीर ठरते.

4) स्त्रियांमधील मासिक पाळीदरम्यान शरीराच्या एखाद्या अवयवात क्रॅम्प येण्याची समस्या जर होत असेल तर यावर उत्तम उपाय म्हणजे आल्याचा चहा असून ह्या चहाची चव जरी तुम्हाला कडू लागली तरी तुम्ही यामध्ये थोडे मध टाकून त्याचा चांगल्या प्रकारे आस्वाद आणि फायदा घेऊ शकता.

5) सततच्या कामामुळे आणि त्यामुळे आलेल्या ताणापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही जर आल्याचा चहा घेतलात तर ह्या चहामध्ये डोके शांत करण्याचे गुण असल्यानं, तणाव कमी होण्यास खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला ह्याची मदत होते. तणावापासून मुक्ताता मिळवण्याचे गुणधर्म आल्यामध्ये असल्यानं आपल्या रोजच्या आहारात आल्याचा चहा नक्की समाविष्ट करावा.

6) जर तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमजोर असेल तर तुम्ही वारंवार आजारी पडता अशावेळेस आल्याचा चहा आपल्याला खूपच फायदेशीर ठरतो कारण आल्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्सचे प्रमाण प्रचंड असल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास खूपच मदत होते.

7) जर तुम्ही एखाद्या लांबच्या प्रवासासाठी जाणार असाल तर एक कप आल्याचा चहा नक्की प्यावा. यामुळे प्रवासादरम्यान ज्यांना उलट्यांचा त्रास होतो, तो काही प्रमाणात कमी होण्यास चांगल्या प्रकारे मदत मिळते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight हल्लीच्या धावपळीच्या काळात वजन कमी करण्य...