आनंदी राहण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा!

आनंदी राहण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा!

Related image
coolstyle.ba
ह्या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला आनंदी राहायला आवडत नाही. प्रत्येकालाच मनोमन आपण आनंदी आयुष्य जगावं असच नेहमी वाटत असते. आपल्याला हे तर माहीतच असेल की आपण जेवढे आनंदी राहतो तेवढं आपल्या शरीरासाठीही ते एका अर्थाने खूपच चांगलं असतं.
यामुळे आपला मूडही सदैव फ्रेश राहतो आणि आपण करत असलेल्या कामातही आपले चांगले लक्ष लागून राहते. परंतु सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये बहुतेक सगळेच जण टेन्शनमध्ये वावरताना दिसून येत असतात. बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतही नाही. अशावेळी तुम्ही फक्त याच विचारात असता की माझ्या समोर असलेल्या ह्या विविध समस्यांच निवारण करायचं तरी कसं? पण अशाही काही टिप्स आहेत ज्यांचा तणावाच्या प्रसंगी जाणीवपूर्वक वापर करून काही वेळातच तुम्ही तणावमुक्त होऊ शकता. जाणून घेऊयात काही टिप्स ज्या वापरून तुम्ही आनंदी होऊ शकता. 

नेहमी सकारात्मक विचार करा
तुम्ही जर रोजच्या कामामध्ये फार ताणावर असाल तर तुम्ही स्वतःशीच गप्पा मारू शकता. आनंदी राहण्यासाठी बऱ्याचदा स्वतःशी सकारात्मक गप्पा मारू शकता ह्या गप्पांमध्ये आपण पूर्वी जे काही सकारात्मक काम केले आहे त्याचाच आपल्या बोलण्यात प्रामुख्याने उल्लेख करा, असे केल्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार नाहीसे होण्यास खूपच मदत होईल. 

डार्क चॉकलेट
ह्या जगात चॉकलेट न आवडणारी व्यक्ती शोधून सापडणं तसं कठीणच आहे, डार्क चॉकलेट हे असे चॉकलेट आहे जे योग्य प्रमाणात खाल्याने आपला मूड एकदम फ्रेश होण्यास मदत होते आणि मन आनंदी राहण्यासाठी देखील खूपच मदत होते. जर तुम्हाला एखाद्या तणावाच्या प्रसंगी आनंदी राहायचं असेल तर जाणीवपूर्वक योग्य प्रमाणात डार्क चॉकलेट्सचं सेवन करा. 
lokmat.com

आपल्या आवडत्या व्यक्तींचा विचार करा
आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये असेही काही लोक असतील जे आपल्याला जास्त प्रमाणात आवडतात, मग कोणत्याही तणावाच्या प्रसंगी अशाच आपल्या आवडत्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत घालवलेल्या आनंदाच्या प्रत्येक क्षणांचा विचार करा आणि आपल्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी ह्या पद्धतीचा प्रभावीपणे आणि जाणीवपूर्वक वापर करा. त्यामुळे तुमचा मूड चांगला होण्यास मदत होईल. 
Image result for happy thinking
videoblocks.com

तणावापासून दूर रहा
आपल्यापैकी कोणालाच तणाव आवडत नाही आणि जेव्हा तुम्ही फार दुःखी असता त्यावेळी त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक त्यासाठी ठोस पावले उचला. नकारात्मक विचारांना आपल्या डोक्यातून काढून टाका आणि सकारात्मक गोष्टींचा विचार सुरू करा. कारण आपल्या आयुष्यात कधीतरी चांगल्या घटना ह्या नक्कीच घडल्या असतील, तर अशावेळेस त्या चांगल्या घटनांचाच विचार करा जेणेकरून तुम्ही आपोआपच तणावापासून दूर जाल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या