थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५ फायदे!

थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५ फायदे!

5 amazing benefits of take bath with salty water | थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५ फायदे!
haribhoomi.com
आता जवळपास आपल्या देशात सगळीकडे कमी-जास्त प्रमाणात थंडी जाणवायला लागली असून ह्या थंडीच्या दिवसात काही लोक आंघोळ करण्यासाठी वेगवेगळे पर्याय आपल्याला अनेकवेळा निवडताना दिसून येतात तर काही लोक थंडीमुळे आंघोळीची टाळाटाळ करताना देखील दिसून येतात.
या दिवसात बहुतेक लोकांना भेडसावत असलेली चिंतेची बाब म्हणजे त्वचेच्या होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या. काही लोकांची त्वचा या दिवसात खूपच कोरडी होते. तर काहींच्या त्वचेला अनेक भेगाही पडतात. त्यामुळे अनेकजण रोजच्या आंघोळीच्या पाण्यात गुलाब जल किंवा दुधाचा वापर करताना मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पण थंडीच्या दिवसात आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यावर काय फायदे होतात हे फार कमी लोकांना माहीत असेल. आज आम्ही तुम्हाला आंघोळीच्या कोमट पाण्यात मीठ टाकल्याने काय फायदे होतात हे सांगणार आहोत.

त्वचेची स्वच्छता - रोजच्या प्रदूषणामुळे आपल्या त्वचेला नेहमीच काहींना काही समस्यांचा सामना सतत करावा लागतो. जसे आपल्याला हे तर माहीतच असेल की मिठामध्ये मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे मिनरल्स त्वचेच्या छिद्रांमध्ये खोलवर जाऊन त्वचेची चांगल्याप्रकारे स्वच्छता करतात. तसेच त्वचेला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. 

तणाव दूर होतो - कोमट पाण्यामध्ये मिठ टाकून आंघोळ केल्यास रोजच्या कामातून आलेला तणाव  दूर होण्यास खूपच चांगल्या प्रकारे मदत होते. जास्त थकवा असेल तर अशा व्यक्तींनी आवर्जून  कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करायला हवी. 

त्वचेवर येतो ग्लो - त्वचेवर ग्लो येण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण खूप काही उपाय करताना आढळून येतात पण  थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणे आरामदायक वाटत असले तरी याने त्वचेला काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. म्हणूनच जर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआपच त्वचेवर ग्लो येण्यास सुरवात होते. 

सांधेदुखीपासून आराम - वाढत्या वजनाच्या तक्रारींमुळे आजकाल बऱ्याच लोकांना सांधेदुखीने वेढले आहे आणि थंडीच्या दिवसात तर ही समस्या आणखीनच तीव्र होते, अशावेळी अशा लोकांनी कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने बऱ्याच अंशी सांधेदुखीपासून आराम मिळतो.


त्वेचेच्या मृत पेशी होतात दूर - थंडीच्या दिवसात अनेकांच्या बाबतीत मृत त्वचेची समस्या ही एक सर्व सामान्य बाब आहे. ही मृत त्वचा दूर करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास अशा प्रकारची मृत त्वचा आणि पेशी दूर होण्यास मदत होऊ शकते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या