चेहऱ्यावरील डाग लगेच दूर करण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर!

चेहऱ्यावरील डाग लगेच दूर करण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर!


Image result for coconut water for skin
www.google.com

आपल्या सर्वांनाच हे माहित आहे की नारळाचं पाणी हे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती फायदेशीर आहे. पण येथे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे नारळाच्या पाण्याने  केवळ आपले आरोग्यच नाही तर आपलं सौंदर्य वाढवण्यासाठीही खूप मोठ्या प्रमाणात मदत मिळते.
नारळाच्या पाण्यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असल्याने आपल्या त्वचेला वेगवेगळे फायदे होतात. चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स दूर करण्यासाठी नारळाचं पाणी खूप फायदेशीर ठरतं. तसेच त्वचा मुलायम होण्यासही नारळाच्या पाण्याने मदत होते. 

चेहरा उजळवण्यासाठी फायदेशीर
तुम्हाला हे ऐकून जरा आश्चर्य वाटेल पण नारळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर एक प्रकारचा जबरदस्त तजेलदारपणा येतो. नारळ पाण्यात असलेल्या अँटी-ऑक्सिडेंट्स आणि मिनरल्समुळे ते आपल्या त्वचेच्या मुळात जाऊन त्वचेला चांगल्याप्रकारे पोषण देण्याचे काम करतात. तसेच नारळाच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, मॅग्नीज, पोटॅशिअम, सोडियम आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपली त्वचा चांगल्याप्रकारे उजळण्यासाठी ह्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत होते आणि आपल्या त्वचेला एक चांगल्या प्रकारे नैसर्गिक तजेलदारपणा प्राप्त होतो. 
www.lokmat.com

त्वचेवरील डाग होतात दूर
नारळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास खूपच मोठ्या प्रमाणात मदत मिळते आणि म्हणूनच जर तुमच्या त्वचेवर जर डाग असतील तर ते घालवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून कमीत कमी २ ते ३ वेळा नारळाचं पाणी चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर नारळाच्या पाण्याने हलक्या हाताने दाब देऊन चेहऱ्याची व्यवस्थित मसाज करा. नंतर साध्या पाण्याचे चेहरा स्वच्छ करा. याने त्वचेवरील डाग दूर मदत तर होईलच पण सोबतच त्वचेवरील सुरकुत्या देखील दूर होण्यास मदत होईल. 


पिंपल्सची समस्या होईल दूर
आपल्या शरीरात होणाऱ्या हार्मोन्समधील बदलामुळे आणि हल्लीच्या धावपळीच्या काळात चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच ज्यांची त्वचा तेलकट आहे अशा लोकांना ह्या पिंपल्सची समस्या अधिक प्रमाणात होते. अशा वेळेस नारळाच्या पाण्याचा वापर तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकतो. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर चेहरा नारळाच्या पाण्याने स्वच्छ करावा जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स हळूहळू दूर होण्यास मदत होऊन चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचे डागही राहणार नाहीत. 

टॅनिंगची समस्या होते दूर
ऋतू कोणताही असो, पण जास्त उन्हामुळे त्वचेवर टॅनिंगची समस्या निर्माण होते, म्हणजेच त्वचा जास्त उन्हामुळे काळवंडते. टॅनिंग आणि प्रखर सूर्यकिरणांमुळे त्वचेला होणारी समस्या मुळापासून दूर करण्यासाठी नारळाचं पाणी अत्यंत फायदेशीर ठरतं. जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचा काळवंडली असेल किंवा त्वचेची जळजळ होत असेल तर कापसाच्या मदतीने नारळाचं पाणी त्वचेवर व्यवस्थित लावून दररोज दिवसातून कमीतकमी दोनदा लावले तर ह्याच्या मदतीने त्वचा स्वच्छ होण्यास आणि उजळ होण्यास नारळाच्या पाण्याने खूपच मदत होईल.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या