तुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही? वेळीच सावध व्हा!

तुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही? वेळीच सावध व्हा!
Image result for diabetes
medicalxpress.com
सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याशी निगडी अनेक समस्यांचा सामना बऱ्याच लोकांना करावा लागत आहे. अशातच हल्लीच्या काळात लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये सहज आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह असून अनेक कारणांमुळे मधुमेह होऊ शकतो.
तुम्हाला हे तर माहीतच आहे की आजकाल अनेक लोकं कोणत्या ना कोणत्या तणावाखाली वावरत आहेत त्यामुळे ह्यातील अनेक लोकं मधुमेहाच्या बॉर्डर लाइनवर आढळून येत आहेत. पण घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण सोप्या भाषेत म्हणजे मधुमेहाची (डायबिटीजची) बॉर्डर लाइन म्हणजे त्या व्यक्तीला मधुमेह झालेला नसतो पण होण्याची शक्यता अधिक असते. तुम्हीदेखील असेच डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर उभे असाल तर घाबरून जाऊ नका फक्त तुमच्या दैनंदिन रूटीनकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि थोडे बदल करा. 


मधुमेहाची (डायबिटीजची) बॉर्डर लाइन म्हणजे नक्की काय?

सामान्य व्यक्तींच्या रक्तामध्ये साखरेची पातळी जर आपण जेवणापूर्वी मोजली तर ती साधारण १०० मिलीग्रामपर्यंत असते आणि जेवल्यानंतर साधारण १३५ मिलीग्राम असते. पण जर हेच प्रमाण अनुक्रमे १४० आणि २००  मिलीग्रामपर्यंत पोहोचले तर ही मधुमेहाची बॉर्डर लाइन आहे असे समजावे. तसं पाहायला गेलं तर यामध्ये औषधं खाण्याची गरज नसून आपण आपली व्यवस्थित काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. कारण हे रिडींग जर आपण पाहिलं तर ही एक आपल्यासाठी सुचनाच असते. तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवून स्वतःचा मधुमेह होण्यापासून बचाव करू शकता. परंतु तुम्ही जर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र तुम्ही मधुमेहासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होऊ शकता म्हणूनच वेळीच सावध होऊन पावलं उचलणे केव्हाही चांगलेच. 

मधुमेह होण्याची कारणं काय आहेत:

१) रोजची जीवनशैली ठिक नसणं 
२) रोज वेळेवर न झोपणं आणि उठणं
३) सतत तणावाखाली वावरत राहणे
४) चुकीच्या पद्धतीने आहार घेणं आणि  व्यायाम न करणं
५) काही अनुवांशिक कारणं

मधुमेहाचे  प्रकार :

मधुमेहाचे दोन प्रकार असतात. पहिला आहे टाइप वन आणि दुसरा टाइप टू मधुमेह. टाइप वन मधुमेहाचा प्रकार साधारण लहान मुलांमध्ये आढळून येतो कारण त्यांच्या शरीरातील वीटासेल डॅमेज झाल्यामुळे त्यांना हा आजार होतो. अशा टाइप वन मधुमेह झालेल्या मुलांना आयुष्यभर इन्सुलिनचं सेवन करावं लागतं. टाइप टू मधुमेह प्रौढ व्यक्तींमध्ये आढळून येतो. परंतु हल्लीच्या काळामध्ये मधुमेह झालेल्या रूग्णांमध्ये तरूणांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

मधुमेह झालेल्या व्यक्तींना खालील समस्यांचा सामना करावा लागू शकतो :

१) सतत भूक लागणं तसेच तहान लागणं
२) सतत लघवीला होणं
३) वारंवार थकवा येणं
४) डोळ्यांच्या समस्या किंवा डोळ्यांची दृष्टी कमी होणं
५) त्वचेला इन्फेक्शन होणं

मधुमेहापासून असा करा बचाव :

१) गोड पदार्थांचं सेवन शक्यतो टाळा.
२) जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाणं टाळा.
३) दर दोन तासांनी थोडं थोडं खाणं अत्यंत आवश्यक. 
४) रक्तातील साखरेचे प्रमाण नेहमी तपासत रहा.
५) सगळ्यात महत्वाचे म्हणजे रोजच्या रोज व्यायाम करा. 

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या