या कारणांमुळे महिलांमध्ये वाढतो मधुमेहाचा धोका!

या कारणांमुळे महिलांमध्ये वाढतो मधुमेहाचा धोका!

lokmat.com
तुम्हाला कदाचित हे ऐकून नवल वाटेल की आजच्या धकाधकीच्या काळात पुरूषांच्या तुलनेत महिलांना मधुमेहाचा धोका अधिक प्रमाणात आहे. हल्लीची जीवनशैली, तणाव आणि लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे हल्लीच्या जवळ जवळ सर्वच वयोगटातल्या महिलांमध्ये मधुमेहाची लक्षणं जास्त आढळून येत आहेत.
याच कारणांबाबत अनेक तज्ञांनी आपल्या अहवालात असे नमूद केले आहे की, अनेक महिला आपल्या प्रकृतीपेक्षा आपल्या कुटुंबाच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष देताना आढळून येत आहेत. अशामुळे  घरातील सर्वांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करता करता आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडे मात्र लक्ष द्यायला हल्लीच्या महिलांना वेळ मिळत नाही आहे. याव्यतिरिक्त असेही आढळून आले आहे की अनेक महिला आपल्या वैद्यकीय चाचण्या करत नाहीत. त्यामुळे अनेकदा काही आजारांची लक्षणं लक्षात देखील येत नाहीत.

सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, तसेच सतत कामाचा असलेला ताण यांमुळे अनेक लोक आजच्या काळामध्ये डिप्रेशनमध्ये जगत आहेत. या आजाराचे परिणाम पुरूषांच्या तुलनेत मधुमेहाने पीडित असलेल्या महिलांवर जास्त प्रमाणात होताना तज्ञांना आढळून आलेले आहेत. त्यांनीं केलेल्या अनेक रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, डिप्रेशनमुळे अनेक महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत मधुमेहाचा धोका अधिक वाढल्याचे दिसून आले आहे.

खासकरून प्रेग्नन्सीच्या वेळेस काही महिलांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. अशा महिलांना भविष्यात मधुमेह होण्याचा धोका अधिक पटीने वाढतो.
lokmat.com

आतापर्यंत तज्ञांच्या झालेल्या अनेक प्रकारच्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, मधुमेहाने पीडित असलेल्या पुरूषांच्या तुलनेत महिलांना हृदयाशी निगडीत आजार होण्याचा धोका अधिक असतो.

सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये अनेक महिलांना पीसीओडीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. एका अभ्यासातून असंही समोर आलं आहे की, पीसीओडीचा त्रास असणाऱ्या महिलांमध्ये मधुमेहाचा धोका अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या