वायु प्रदूषणापासून सुटका करण्यासाठी करा 'हे' उपाय!

वायु प्रदूषणापासून सुटका करण्यासाठी करा 'हे' उपाय!


Image result for वायु प्रदूषण
independentmail.in
सध्या आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर थंडी हळू हळू वाढत असून सगळेजण गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. पण एकीकडे आज आपल्याला असेही दिसून येत आहे की भारतातील अनेक शहरांना वाढत्या वायू प्रदुषणाच्या परिणामांचा सामना करावा लागत आहे.
अनेक लहान मोठ्या शहरांमध्ये अनेक लोकं तोंडावर मास्क लावूनच घराबाहेर पडताना अगदी सहज दिसून येत आहेत. अनेक लोकांना ह्या वाढलेल्या प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागत आहे. श्वसनासंबंधातील समस्या चांगल्या प्रकारे दूर करण्यासाठी काही घरगुती उपायांचा वापर करणं नेहमीच फायदेशीर ठरेल. तर आता आपण जाणून घेऊया वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या या काही सोप्या उपायांबाबत.

काळी मिरी :
आपल्या सर्वांना हे तर माहीतच आहे की वायु प्रदुषणामुळे सर्वात जास्त त्रास आपल्या फुफ्फुसांनाच प्रथम  होतो. ज्यामुळे छातीत वेदना सुरु व्हायला लागतात. या समस्येपासून जर व्यवस्थित सुटका करून घ्यायची असेल तर बाजारात सहजच उपलब्ध असणारी काळी मिरी फार फायदेशीर ठरते. काळ्या मिरीची पूड मधासोबत घेतली तर फुफ्फुसांमध्ये वायू प्रदूषणामुळे जमा झालेली घाण साफ होण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. जर आपल्याला खोकला किंवा कफ झाला असेल तरीदेखील हा घरगुती उपाय खूपच फायदेशीर ठरतो. 
marathi.webdunia.com

ओवा :
प्रदुषणाच्या अनेक समस्येपासून जर चांगल्या प्रकारे बचाव करायचा असेल तर ओवा अत्यंत फायदेशीर ठरतो. सकाळी उठल्या उठल्या रात्री एका ग्लासात भिजवून ठेवलेल्या ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ निघून जाण्यास खूपच मदत होते. त्याचप्रमाणे ओव्याच्या झाडाच्या पानांचाही आहारात समावेश करणं आपल्या शरीरासाठी ओव्यामध्ये असलेल्या अनेक औषधी कारणांनी खूपच फायदेशीर ठरतं. 
discountcity.in

गूळ आणि मध :
वायू प्रदूषणामुळे वाढलेल्या आजारांशी लढण्यासाठी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम गुळ आणि मध अत्यंत चांगल्या प्रकारे करतात.

लसूण :
आपल्या सर्वांना कदाचित हे माहित नसेल, पण आपल्या अतिप्राचीन अशा आयुर्वेदामध्ये लसूण अनेक रोगांसाठी एक प्रभावी अॅन्टी-बायोटिक समजलं जातं. थंडीमध्ये लसणाच्या पाकळ्या भाजून खाणं आपल्या शरीरासाठी केव्हाही फायदेशीर ठरतं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आपोआपच मदत होते. 
lokmat.com


आलं :
वायू प्रदूषणामुळे लोकांना सतत सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो अशा प्रकारच्या सतत होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी आलं खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं. एक चमचा मधामध्ये आल्याचा रस मिसळून त्याची योग्य प्रमाणात एक पेस्ट तयार करून, ह्या मिश्रणाचे दिवसातून 2 ते 3 वेळा सेवन केल्याने लवकर आराम मिळतो.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या