तुम्हाला खूप राग येत असेल, तर मग हे वाचा

तुम्हाला खूप राग येत असेल, तर मग हे वाचा

ज्याला राग येत नाही असा या जगात शोधूनही कोणी सापडणार नाही. कारण मनुष्य हा संवेदनशील प्राणी आहे. यामुळे आनंद, दु:ख, राग, मत्सर, द्वेष, लोभ, प्रेम या भावना त्याच्यात कुटून भरलेल्या आहेत. 
जसा आनंद झाल्यावर आपण हसून तो व्यक्त करतो. दु:ख अश्रू ढाळून मोकळे करतो तसाच राग व्यक्त करण्यासाठी आपण ओरडतो, चिडचिड करतो, आदळआपट करतो. तर क्वचित प्रसंगी हाणामारीही करतो. त्यानंतर काहीवेळाने मात्र आपण शांत होतो.

झालेल्या गोष्टीचा विचार करू लागतो. यातून बऱ्याचवेळा फक्त पश्चाताप होतो. पण तोपर्यत वेळ निघून गेलेली असते. काहीक्षणाच्या त्या रागाने जवळची माणसं दूर गेलेली असतात. तर कधी आपणच स्वत:च नुकसान करुन घेतलेलं असतं. पण या रागाने आपलं फक्त एवढंच नुकसान केलंल नसतं तर जाताना तो आपल्याला उच्च रक्तदाब नावाची व्याधीही देऊन जातो. ज्यातून पुढे अनेक व्याधी जन्म घेतात. यामुळे अशा या राग नावाच्या भावनेला आवर घालणं फार गरजेचं आहे. यासाठी काही उपयुक्त टीप्स.
उत्तम श्रोते व्हा - समोरची व्यक्ती चिडून किंवा ओरडून बोलत असली तरी त्याच्यावर उलट ओरडण्यापेक्षा त्याचे बोलणे शांततेने ऐकून घ्या. त्याच्या बोलण्यामागचा अर्थ समजून घ्या. प्रतिक्रीया देण्याआधी विचार करा.
विचार करून बोला - कोणाशीही कुठल्याही विषयावर बोलताना, आपली मत व्यक्त करण्याआधी विचार करा. उगाच समोरचा बोलतो म्हणून तुम्ही विचार न करता त्याच्यावर ओरडू नका. त्याचे बोलणे खोटे व आपले खरे हे दाखवण्याचा प्रयत्न करताना तोल सांभाळा. नाहीतर आक्रस्ताळे आहात अशी तुमची प्रतिमा तयार होईल. तुमचे नुकसान होईल.
राग येत असेल तर शांत राहा -ऑफिसमध्ये, घरात कुठल्याही गोष्टीवरुन तुमचा कोणाशी वाद झाला असेल किंवा ती व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल तरी त्याच्यावर एकदम राग प्रकट करू नका. शांत राहा. समोरच्या व्यक्तीला बोलू द्या. त्याचे बोलणे झाले की तुमचा मुद्दा शांतपणे त्याला समजावून सांगा. यामुळे तुम्ही किती परिपक्व आहात ते समोरच्याला कळेल. यामुळे तुमच्याबद्दलची त्याची मतही बदलतील.
व्यायाम करा - व्यायाम केल्याने शरीरच सुदृढ होत नाही तर मनंही फ्रेश होतं असं म्हणतात. यामुळे जर एखाद्याचा तुम्हांला खूप राग येत असेल तर तिथून बाहेर पडा. मोकळ्या बागेत अथवा रस्त्यावर जा. फिरा. शक्य असल्यास जीमला जा. व्यायाम करा. मग बघा. तुम्हाला त्या व्यक्तीचा विसर पडलेला असेल.त्याच्याबद्दल आलेला रागाचा फुगा केव्हाच फुटलेला असेल हे तुमचे तुम्हालाच कळणार नाही.
गाणी ऐका - गाणं हे मन फ्रेश करण्याचं उत्तम साधन आहे. आवडती गाणी ऐकताना आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींचा विसर पडतो. गाण्यात दंग झाल्याने मूड बदलतो. यामुळे एखाद्याबरोबर तुमचे बिनसलं असेल तर त्याला विसरण्यासाठी तो वाद विसरण्यासाठी गाण्याचा सहारा घ्यावा. जेणेकरुन मन उदास होणार नाही आणि तुमची चिडचिडही होणार नाही.
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:Disclaimer


I do not intend to violet infringe the rights of the author/publisher of this article/book or copyright or any other rights by publishing the excerpt from their original work. This paragraph is a taken from the respective published material only with the view to inspire or motivates our readers. We expressed our sincere thanks to author/publisher for their support.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या