'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक!

'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक!

आपल्या आजूबाजूला जर आपण नीट पाहिले तर सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये अनेकांना वेगवेगळ्या मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 
Image result for stress
raowellness.com
यात सगळ्यात जास्त लोकांना स्ट्रेसची समस्या भेडसावत असताना आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येत आहे. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे आपण रोजच्यारोज करत असलेल्या भोजनावर आपली संपूर्ण मानसिक पातळी अवलंबून असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा स्ट्रेस अधिक वाढतो. अशा पदार्थांपासून आपण दूरच राहिलेले बरे.

गोड पदार्थ - आपल्या माहितीसाठी इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे स्ट्रेसमध्ये व्यक्तीची शुगर लेव्हल ही आधीच वाढलेली असते. अशातच जर अशा व्यक्तीने आणखी काही गोड खालं तर स्ट्रेस आणखी वाढू शकतो. मग चिडचिडपणा अधिक होऊन तुमचं कशातच लक्षही लागणार नाही.
lokmat.com
जास्त प्रमाणात चहा - थकवा दूर करण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण दिवसातून २ किंवा त्यापेक्षा जास्तवेळा चहाचे सेवन करत असतील कारण सर्वसाधारण चहा प्यायल्याने थकवा दूर होतो, हे तितकच खरंही आहे. पण चहा आणि कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफीन असतं ज्याने झोप आणि भूक लागत नाही आणि जेंव्हा आपल्याला अधिक ताण असतो अशा वेळेस जर थोडा वेळ कुठे डोळे मिटून बसता किंवा झोपता आले तर ते आपल्या शरीरासाठी जास्त फायद्याचे आहे, म्हणूनच चहा आणि कॉफीमधील कॅफीनमुळे कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस असल्यावर याला दूर ठेवलं पाहिजे.

मीठ - तणावाच्या कोणत्याही प्रसंगी जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त मिठाचं सेवन करत असाल तर तुमच्यासाठी हे घातक ठरु शकतं. कारण सोडियमच्या अधिक सेवनामुळे आपल्या संपूर्ण शरीरात अस्वस्थता निर्माण होते. याने तुमचा तणाव अधिक प्रमाणात वाढू शकतो जो तुमच्या आरोग्यासाठी जास्त घातक ठरू शकतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते.
lokmat.com
तळलेले पदार्थ - तळलेले पदार्थ खाल्ल्याने वजन तर वाढतेच सोबतच तणावाच्या प्रसंगी अति तेलकट पदार्थ आपल्या शरीरासाठी जास्त घातक ठरू शकतात. म्हणूनच आपण केंव्हाही कमी तळलेले अथवा घरगुती जेवण जेवले पाहिजे, बाहेरचे तळलेले पदार्थ जाणीवपूर्वक टाळावेत.
lokmat.com


मद्यपान - एका संशोधनाद्वारे हे सिद्ध झालेले आहे की मद्यसेवन केल्याने विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता कमी होते. मद्य सेवन केल्याने तणाव कमी होण्यापेक्षा तो अधिकच वाढतो.

फास्ट फूड - जंक फूडमध्ये शरीराला आवश्यक असे प्रोटीन, फॅट, कार्बोहायट्रेडचं प्रमाण खूपच कमी असते आणि त्याऐवजी मोठ्या प्रमाणात मेद (फॅट) जास्त असते. जर तुम्ही तणावामध्ये असाल तर असे पदार्थ खाणे जाणीवपूर्वक टाळावे.
Image result for फास्ट फूड
zeenews.india.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या