जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या ६ गोष्टी करा

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या ६ गोष्टी करा

आपल्या प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असते पण जर आपण आपल्या आजूबाजूला पाहिलेत तर फारच थोडी लोकं अशी दिसून येतील ज्यांना भव्य दिव्य यश मिळते आणि बाकीच्यांना साधारण यश मिळते किंवा अपयश येते. 
जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या ६ गोष्टी करा
zeenews.india.com
तुम्हाला जर तुमच्या जीवनात काही तरी मिळवायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या ६ गोष्टी केल्या पाहिजेत. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात त्यांनी ह्या ६ गोष्टी तंतोतंत पाळलेल्या आहेत आणि म्हणूनच ते आज यशस्वी झाले आहेत. तर मग आज आपण जाणून घेऊया त्या ६ गोष्टी जे यशस्वी लोक काटेकोरपणे पाळतात.


1. रिकाम्या वेळेचा सदुपयोग
आपल्यापैकी किती जण कामावरुन घरी गेल्यानंतर टीव्ही पाहतात, सोशल मीडियावर मित्रांसोबत चॅट करतात किंवा मग पार्टी करण्यासाठी जातात? जर तुम्ही तुम्हाला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा वापर योग्य पद्धतीने केला तर तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही.  स्टीव जॉब, इमा वॉट्सन, इलॉन मस्क आणि टीम कूक यासारख्या दिगजांनी रिकाम्या वेळेचा सदुपयोग करुनच भव्य दिव्य यश संपादन केलेले आहे.
Image result for एलन मस्क
hindi.news18.com

2. पुरेशी झोप घ्या

आपल्या सर्वांना हे तर माहीतच आहे की अपुरी झोप फक्त आपल्याला अस्वस्थच करत नाही तर आपला दुसरा दिवस देखील खराब करू शकते. याचा परिणाम आपण रोज करत असलेल्या कामावर नक्कीच होतो आणि ह्याचा अनुभव आपण कधीना कधी घेतलाच असेल. अॅपल कंपनीचे सीईओ रोज रात्री ९.३० ला झोपायचे आणि ७ तासांची झोप घ्यायचे. फेसबूकचे सीओओ सँडबर्ग झोप खराब होऊ नये म्हणून रात्री मोबाईल बंद करुन ठेवायचे. चांगल्या आरोग्यासाठी रोजच्या रोज ७ तासांची पुरशी ही झोप घेतलीच पाहिजे.

3. नियमित वाचन
आपण नेहमी आपल्याला प्रेरणा देईल असच वाचलं पाहिजे. वाचनामध्ये वेळ गुंतवल्याने त्याचे आपल्या कामातून परिणाम देखील चांगले येतात. यामुळे तुमचं ज्ञान, कौशल्य आणि तुमचं संभाषण कौशल्य देखील चांगलं होतं. वाचनाने आपल्या शब्द भंडारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते. इलॉन मस्क, वॉरेन बफेट, बिल गेट्स आणि इतर यशस्वी लोकांमध्ये सकारात्मक आणि प्रेरणादायी वाचन हे रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे.
Image result for bill gates reading books
http://fortune.com

4. व्यायाम 

व्यायाम केल्याने माणूस लवकर ताजातवाना होऊन पुन्हा जोमाने कामाला लागतो. व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक रिचर्ड ब्रान्सन यांनी एका मुलाखतीत असे सांगितले होते की, नियमित व्यायामामुळे त्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात दुप्पट यश मिळालं शिवाय, इतर अनेक फायदे देखील झाले. आत्मविश्वास पातळी, सर्जनशीलता, एकाग्रता पातळी, आणि उत्साह देखील भरपूर प्रमाणात वाढला.
Related image
paulmilano.com

5. नाही म्हणतांना घाबरु नका
तुम्हाला एका गोष्टीचे नवल वाटेल पण नाही म्हणणं हे देखील एक कौशल्य आहे. नाही म्हणण्याची कला प्रत्येकामध्ये नसते. जगातील सर्वच यशस्वी व्यक्तींच्या मते जेव्हा तुम्ही अनप्रोडक्टीव्ह काम, मिटींग आणि असाईमेंट्सला नाही म्हणता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने प्रोडक्टीव्ह कामाला सुरुवात करता. अशा लोकांचे नेहमीच हे म्हणणे असते की आपण कायम योग्य कामाला प्रधान्य दिले पाहिजे. ज्यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कामावर फोकस करु शकता आणि तुमचा परफॉर्मन्स आणखी चांगला होऊ शकतो. 

6. शिका आणि अभ्यास करा
आपण हे नेहमीच ऐकत आलोय की नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी वयाचं कोणतंच बंधन नसतं. आपण स्वत: ला कसे विकसित कराल आणि कशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्पर्धकाच्या पुढे जाल याचा विचार आपण सतत केला पाहिजे. यासाठी लेखन कार्यशाळा, मनोचिकित्सा किंवा नवीन विषयांचा अभ्यास करणं हे केंव्हाही फायद्याचं ठरु शकतं. आपल्याला ऐकून नवल वाटेल पण कारकिर्दीच्या उच्च शिखरावर असताना हॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री ईमा वॉटसनने आपल्या अभिनय करियरमधून काही काळासाठी ब्रेक घेऊन ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला होता.

Image result for ईमा वॉटसन
fucsia.co

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या