वारंवार धाप लागतेय? जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपाय!

वारंवार धाप लागतेय? जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपाय!



आपल्यापैकी असे अनेक जण असतील ज्यांना अनेकदा थोडं चाललं किंवा थोडी धावपळ झाली तरीदेखील धाप लागते. असं होण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे शरीरातील सर्व अवयवांना व्यवस्थित ऑक्सिजन न मिळणं. 

lokmat.com
यामुळे आपली फुफ्फुसं ऑक्सिजन मिळवण्यासाठी श्वास घेण्याची गती वाढवितात आणि ह्याच प्रक्रियेला आपण धाप लागणं असं म्हणतो. याकडे दुर्लक्ष करण्याचे गंभीर परिणाम तुम्हाला तुमच्या भविष्यात येणाऱ्या दिवसांमध्ये भोगावे लागू शकतात.
वारंवार होणारा हा त्रास दूर करण्यासाठी काही सोपे उपाय देखील आहेत. आपण आताच पाहिले की शरीराला भासणाऱ्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे शरीराला बाहेरून अतिरिक्त ऑक्सिजन देणं हे जास्त फायदेशीर ठरतं

महत्त्वाचं कारण

धाप लागण्याची साधरणतः दोन मुख्य कारणं आहेत. पहिले कारण आहे आणि ते म्हणजे लठ्ठपणा आणि दुसरं म्हणजे शरीरात असलेली रक्ताची कमतरता. शरीरात ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं सर्वात मुख्य काम हे आपल्या शरीरात असलेल्या हिमोग्लोबिन मार्फत आपले शरीर करतं. त्यामुळे जर आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचीच कमतरता असेल तर मात्र शरीराला ऑक्सिजन पुरेसा मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होतात.

आपल्या देशामध्ये आज अनेक लोकं कुपोषणाचे शिकार होताना दिसून येत आहेत. तसेच खासकरून अनेक महिलांमध्ये गरोदरपणातील काही जटिल समस्या आणि बाळाला जन्म देतेवेळी होणारा अतिरिक्त  रक्तस्त्राव यांमुळे रक्ताची कमतरता आढळून येते. तसेच ज्या महिलांच्या दोन मुलांच्या जन्मामधील अंतर कमी असते अशा महिलांमध्ये एनीमिया आणि धाप लागणं यांसारख्या आजारांच प्रमाण हे जास्त आढळून आले आहे. 

1. लठ्ठपणा 

सध्या आपल्या आजूबाजूला अनेक लोकांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण जरा जास्तच प्रमाणात वाढत आहे. नियमितपणे सकाळी चालणं आणि व्यायामाची कमतरता, व्यसनं करणं, अधिक फॅट्स असलेल्या पदार्थांचं भरपूर सेवन करणं यांमुळे अनेक लोकं लठ्ठपणाचे शिकार होताना दिसून येत आहेत. अशा लोकांना त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये थोडीशी जरी धावपळ झाली तरीदेखील धाप लागते अशी समस्या अनेक लठ्ठ लोकांकडून आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते. पण जर योग्य मार्गदर्शनाखाली वेळीच योग्य उपाय केल्यास लठ्ठपणावर सहज नियंत्रण मिळवता येते. 
Image result for लठ्ठपणा
 aarogyasanskar.com

2. फुफ्फुसांचे आजार उद्भवण्याचं मुख्य कारण

आजूबाजूच्या वातावरणातील प्रदूषण, हे फुफ्फुसांमधील इन्फेक्शन, निमोनिया आणि टीबी यांसारखे आजार होण्यासाठी सर्वात प्रमुख कारणांपैकी एक आहे. श्वसन नलिकेला सूज येणं हे देखील धाप लागण्याचं मुख्य कारण ठरू शकतं. 

3. हृदयाचे विकार

जर एखादी व्यक्ती अनेक दिवसांपासून हृदय विकारांनी त्रस्त असेल तरी देखील त्या व्यक्तीला धाप लागण्याची समस्या उद्भवते. जर एखाद्याचे हृदय कमजोर असेल आणि अशा व्यक्तीला कधी हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर त्या व्यक्तीचा हृदयाचा एखादा भाग कमजोर होऊन त्याचे हृदय देखील कमजोर होतं. जर एखाद्या व्यक्तीला जन्मापासूनच हृदयाशी निगडीत आजार असतील तर शरीरामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र होतं. अशावेळी त्या व्यक्तीच्या शरीरावर हलकासा निळसरपणा दिसून येतो. अशा व्यक्तीच्या ओठ आणि हातांच्या बोटांवर याचा स्पष्ट परिणाम दिसून येतो. त्यामुळे धाप लागते. 

आवश्यक तपासण्या

जर आपल्याला धाप लागण्याचा त्रास वारंवार होत असेल तर काही महत्त्वाच्या तपासण्या योग्य वेळेत  करून घेणं हे केव्हाही फायदेशीर ठरतं. छातीचा एक्स-रे काढणं, रक्त तपासणी यांसारख्या तपासण्या करणं फायदेशीर ठरतं. 

धाप लागल्यावर काय कराल?

जर आपल्याला वारंवार धाप लागत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. त्यांच्या सल्ल्याने आवश्यक त्या तपासण्या पूर्ण करा. त्यानंतर देण्यात आलेले सर्व औषधोपचार वेळेत पूर्ण करा. 


Post a Comment

0 Comments