तुम्हाला आनंदी राहण्याची मानसिकता माहीत आहे?

तुम्हाला आनंदी राहण्याची मानसिकता माहीत आहे?अनेकदा आपल्या आजूबाजूला काही लोकांना आपण पाहतो की, सगळं काही त्यांच्या आयुष्यात व्यवस्थित असूनही ते बऱ्याचदा आनंदी  नसतात. आनंदी राहणं ही एक मानसिक क्रिया आहे. 
Related image
artofliving.org

त्यामुळे याबाबत तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मानसिकतेला जाणून घेऊ शकत नसाल तर तुम्ही कधीही आनंदी राहू शकणार नाहीत. 

कधी कधी आपल्याला असेही बघायला मिळते की, काही लोक कळत नकळतपणे स्वत:बाबत फार नकारात्मक बोलत असतात. एक गोष्ट कायम आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे नकारात्मकता येताच तुमच्या जीवनात दु:खाचा प्रवेश होतो. अशात आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला आनंदी राहण्यासाठी चांगल्याप्रकारे मदत करतील. चला तर मग जाणून घेऊ आनंदी राहण्याची मानसिकता कशी असली पाहिजे.

काळजी करण्याची सवय

सतत कोणत्या ना कोणत्या घटनेची किंवा गोष्टींची काळजी करण्याची सवय व्यक्तीच्या दु:खाचं मोठं कारण असतं. अनेकदा आपण आपल्या आजूबाजूला अशी काही लोकं पाहतो की, ती दुसऱ्यांचा फार जास्त विचार करत बसतात आणि दु:खी होतात. कधी कधी कुणी तुमची काळजी घेत नाही हे बघूनही अशा व्यक्तींना दु:ख होतं. या अशा प्रकारच्या सवयींमधून वेळीच बाहेर यायला हवं कारण या सवयींमुळे तुम्हाला दु:ख होतं. त्यामुळे फार काळजी करणे आपण सोडून दिले पाहिजे.  
Related image
jivnatshikleledhade.com

तुलनात्मक दृष्टीकोन

अलिकडे जर आपण आपल्या आजूबाजूला नीट नजर टाकली तर बरेच लोक फार जास्त तुलनात्मक विचार करुन जगताना दिसून येत आहेत. सोशल मीडियाच्या अति वापरामुळे अशा प्रकारचा हा तुलनात्मक प्रभाव अधिकच वाढला आहे. अनेकदा असेही दिसून आले आहे की काही लोकं सोशल मीडियातील इतर लोकांच्या वागण्याची स्वत:शी तुलना करु लागतात आणि याने निराश होतात. या समस्येतून जितकं जमेल तितकं लगेच बाहेर यायला पाहिजे. 
Related image
saveonphone.com

सल्ला दिल्यावर कुणी दुर्लक्ष करणे

आपल्यापैकी अनेकांची ही सवय असते की, त्यांना कोणत्याही विषयात इतरांना सल्ला द्यायचा असतो. अनेकदा असं पाहिलं गेलंय की, जर काहींनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं किंवा तो ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं तर सल्ला देणाऱ्या व्यक्तीला दु:ख होतं. पण तुम्ही दिलेला सल्ला ऐकलाच गेला पाहिजे किंवा लोकांनी तसंच वागलं पाहिजे हा विचार तुम्ही जर करत असाल तर मग ह्यातून स्वतःला सावरून एक गोष्ट कायम लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे सल्ला देणं तुमचं काम आहे, तो ऐकायचा कि नाही हे समोरच्या व्यक्तीचं काम. त्यामुळे एखाद्याला सल्ला दिल्यावर तुम्ही त्याच्या निर्णयाची वाट न पाहता आपल्या कामात आपले मन रमवले पाहिजे.


स्वत:वर प्रेम कराआनंदी राहण्यासाठी स्वत:वर प्रेम करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात घ्या, दुसऱ्या कुणाला उत्तर देण्यापेक्षा आधी स्वत:ला उत्तर देणं आपण शिकून घेतले पाहिजे. जर जीवनात तुम्ही खरोखरच आनंदी राहण्याचा एक चांगला मार्ग शोधत असाल तर स्वत:वर प्रेम करायला शिका. याने तुम्ही वेगवेगळ्या तुलनांमधून आणि दु:खातून सहजपणे बाहेर याल.


Related image
pepsic.bvsalud.org

बदलासाठी तयार रहा

आपल्या सर्वांना हे तर ठाऊकच आहे की बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि जेव्हा तुम्ही हा बदल समजू शकत नाहीत तेव्हा तुम्ही दु:खी राहता. जीवनात जे काही बदल होत आहेत ते स्वीकारा आणि जमेल तितकेवेळा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. बदलांमुळे तुमचा तणावही कमी होतो. 
Related image
 isvara.com.br


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या