अशा उपायांनी वाढेल स्मरणशक्ती

अशा उपायांनी वाढेल स्मरणशक्ती

परीक्षा द्यायची आहे किंवा ऑफीसमध्ये प्रेंझेटेशन द्यायचं आहे. तुम्ही त्याची तयारी तर पक्की केली असेल मात्र तरी काही विसराल याची भीती वाटतेय. 

lokmat.com
तर अजिबात घाबरू नका. फक्त 10 मिनिटांचा अगदी छोटासा व्यायाम जसं की चालणं, योगा इतकं जरी केलं तरी तुमची स्मरणशक्ती वाढेल. 10 मिनिटांच्या व्यायामामुळे तरुणांच्या स्मरणशक्तीत वाढ होत असल्याचं संशोधकांना आढळलंय.

फक्त 10 मिनिटं चालण्यानं तुमचं मनच शांत होत नाही, तर तुमच्या मेंदूची साठवण क्षमता आणि स्मरणशक्तीही वाढत असल्याचं संशोधकांना आढळून आलंय. युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया, इर्वाईन आणि जपानमधील युनिर्व्हसिटी ऑफ सुकोबाच्या संशोधकांनी हे संशोधन केलंय.
stylecraze.com
संशोधकांनी 20 वर्षांच्या आतील 36 तरुणांचं सर्वेक्षण केलं. या तरुणांना सुरुवातीला 10 मिनिटं सायकल एर्गोमीटरवर व्यायाम करायला सांगितला. त्यानंतर त्यांना एक चित्र दाखवण्यात आलं आणि त्यावरून प्रश्न विचारण्यात आले. यानंतर याच तरुणांना कोणताही व्यायाम करायला न देता तेच चित्रं दाखवून प्रश्न विचारण्यात आले. व्यायाम केल्यानंतर तरुणांना जास्त लक्षात राहत असल्याचं दिसून आलं.
thisisinsider.com
असं का होतं, याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी संशोधकांनी यापैकी काही तरुणांचं ब्रेन स्कॅन केलं. त्यावेळी छोट्याशा व्यायायामुळेही मेंदूची स्मृती साठवण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता वाढत असल्याचं कळलं. संशोधनातून असं सिद्ध झालं की, चालणं, योगा अशा किमान 10 मिनिटांच्या शारीरिक कार्यामुळे मेंदूला चालना मिळते, आणि  स्मरणशक्ती वाढते.

या संशोधनात फक्त तरुणांचा सहभाग होता. त्यामुळे इतर वयोगटातील व्यक्ती आणि इतर गोष्टी लक्षात घेता याचा काही परिणाम होतो का हे तपासणं गरजेचं आहे. पुढच्या अभ्यासात वयोवृद्ध व्यक्तींवर हे संशोधन केलं जाणार असल्याचं संशोधकांनी म्हटलंय. वयोवृद्ध व्यक्तींची स्मरणशक्ती कमजोर होते, त्यांना डिमेन्शिया होतो. त्यामुळे म्हातारपणात होणाऱ्या या आजारांवर हे संशोधन किती फायदेशीर ठरतं हे पाहणं गरजेचं असल्याचं संशोधकांनी म्हटलंय.

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:Disclaimer

I do not intend to violet infringe the rights of the author/publisher of this article/book or copyright or any other rights by publishing the excerpt from their original work. This paragraph is a taken from the respective published material only with the view to inspire or motivates our readers. We expressed our sincere thanks to author/publisher for their support.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या