जाणून घ्या पोटदुखी टाळण्याचे काही उपाय

जाणून घ्या पोटदुखी टाळण्याचे काही उपाय

सध्याच्या बदलत्या जीवनमानामुळे आपल्याला विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातीलच एक समस्या म्हणजे पोटदुखी. 

mymahanagar.com

आजकाल बऱ्याच जणांना पोटदुखीची समस्या भेडसावत आहे. साधारण एका व्यक्‍तीच्या पोटात दिवसातून 20 वेळा तरी वायू तयार होत असतो, त्यामुळे ही पोट दुखू शकते.

पण कधी कधी ही पोटदुखी अगदी असह्य होऊन जाते. एखादी व्यक्ती पोटदुखीच्या समस्येने हैराण होऊन जाते. पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या पद्धती बघूया.

१) आहारात पित्त निर्माण करणारे पदार्थ टाळावे.
ज्यांना वारंवार पोटदुखीची समस्या भेडसावते, अशा व्यक्तीने आहारात पित्त निर्माण करणारे पदार्थ टाळावेत. उदा. अख्खी धान्ये, फूलकोबी, बीन्स इ. पदार्थ आहारात असतील, तर त्याने शरीरात पित्त होण्यास कारण होते. आपल्या पोटात वायू निर्माण होऊ नये म्हणून शक्यतो पित्तकारक पदार्थ जेवणातून वर्ज्य करावेत.
२) नेहमी अन्न चावून खावं
बहुतेक वेळा कामाच्या गडबडीत लोकांना भरभर जेवायची सवय असते. कधीही अन्न सावकाशपणे चावून जेवावे. जेव्हा आपण अन्न न चावता भरभर खातो तेव्हा पोटात वायू निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. आपण अन्न चावून जेवल्यास आपल्या पोटात वायू धरत नाही.
slate.com
३) काही पेये टाळणं आरोग्यासाठी चांगलं
सॉफ्ट ड्रिंक किंवा कार्बोनेटेड पेये ह्यांच्या सेवनाने पोटात वायू निर्मिती होते. म्हणून कोका कोला, बीअरसारखी पेये घेणे टाळणं हेच उत्तम आहे. ह्या पेयाच्या सेवनाने पोटात अतिरिक्त वायू निर्माण होऊन पोटदुखी होते.
ajabgjab.com
४) धूम्रपान टाळावे
पित्त होण्यामागे एक महत्वाचे कारण म्हणजे नियमितपणे केले जाणारे धूम्रपान. जे लोक अतिरिक्त प्रमाणात धूम्रपान करतात, त्यामुळे त्याच्या पोटात धूर तर जातोच, त्याबरोबर हवादेखील जाते. त्यामुळे पोटात वायू निर्माण होतो.
patrika.com
५) सॉसचे अतिसेवन टाळा
खूप जणांना सॉस जास्त प्रमाणात खाण्याची सवय असते. आपल्या आहारात अतिरिक्त सॉस खाण्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात.
६) नियमितपणे व्यायाम करा
रोज नियमितपणे व्यायाम ही निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे असं म्हणतात. नुसतं नियमितपणे चालणं झालं तरी शरीरासाठी चांगलं आहे. नियमित व्यायामाने पचनक्रिया योग्य राहते. जर पचनक्रिया उत्तम असेल, तर पोटदुखी होण्याची शक्यताही कमी असते.
thewirecutter.com

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या