तुम्हाला घरीदेखील ऑफिसमधील कामाचा ताण येतो का

तुम्हाला घरीदेखील ऑफिसमधील कामाचा ताण येतो का


आजकालची जीवन धावपळीचे, गुंतागुंतीचे आणि ताणतणावाचे झालेले आहे. घर, संसार, ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना अगदी दमछाक होऊन जाते आहे. 

lokmat.com
ऑफिसमधील कामाचा ताण, वातावरण याचा नक्कीच आपल्यावर परिणाम कळत नकळतपणे होत असतो. तर कौटुंबिक ताण, वाद याचा परिणाम कामावर झालेला बऱ्याचवेळा दिसून येतो.

पण हे दोन्हीही ताण एकमेकांपासून वेगवेगळे कसे ठेवावे, हे आपल्याला व्यवस्थित माहीत असायला हवे. पण अनेकांना ते जमत नाही. मग ऑफिसमधून घरी गेल्यावरही ऑफिसमधील टेंशन्स डोक्याभोवती फेऱ्या मारू लागते. दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्ये काय होईल याची चिंता सतत सतावू लागते. पण या काही टिप्सने तुम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमधील ताळमेळ योग्य प्रकारे साधू शकता.


* सर्वात आधी एक मर्यादा स्वतःला आखून घ्या. स्पर्धा सोपी नसली तरी ऑफिसचे काम घरी नेऊन कदापि करु नका. यामुळे तुमचा वर्क लाइफ बॅलन्स बिघडून जाईल. तसेच ऑफिसचे काम घरी आणल्याने त्यासोबत टेन्शनही आपोआप येणार. परिणामी पर्सनल लाइफवर त्याचा परिणाम होणार. म्हणून शक्यतो ऑफिसचे काम ऑफिसमध्येच संपवा.
webhostinggeeks.com
* ऑफिसमधून निघाल्यावर आपल्याला काय काय काम करायचे आहे, याचा विचार करा आणि त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशीची व्यवस्थित योजना आखा. त्यामुळे घरी जाऊन कामाचा ताण अजिबात जाणवणार नाही.

* वेळेचे नियोजन नीट करा. तुमच्या क्षमतेनुसार ठरवलेल्या वेळेत काम पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला कमी ताण येईल. अनेकदा काम वेळेत पूर्ण न झाल्याने ताण येतो. तर काम टाळण्याच्या सवयीमुळे काम बऱ्याच वेळेला अधिक वाढते. त्यामुळे वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे.
patch.com
* ऑफिसमध्ये असताना सोशल मीडियापासून जास्तीत जास्त दूर राहा. कारण यात किती वेळ जातो, याचा बऱ्याच वेळेला अंदाज लागत नाही. त्याचबरोबर त्याचा परिणाम कामावरही होतो, हे लक्षात येत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना सोशल मीडियाचा वापर शक्यतो टाळा.
videoblocks.com

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
Disclaimer
I do not intend to violet infringe the rights of the author/publisher of this article/book or copyright or any other rights by publishing the excerpt from their original work. This paragraph is a taken from the respective published material only with the view to inspire or motivates our readers. We expressed our sincere thanks to author/publisher for their support.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या