बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

जर तुम्ही पाठदुखी किंवा अंगदुखीने त्रस्त असाल तर हे नक्की करा

जर तुम्ही पाठदुखी किंवा अंगदुखीने त्रस्त असाल तर हे नक्की करा

ही समस्या कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या किंवा एकाच जागी बसून काम करणाऱ्या व्यक्तींना जास्त प्रमाणात होते. पेशींमध्ये निर्माण होणाऱ्या वेदनांशी संबंधित ही समस्या आहे. 
lokmat.com
खांदे, पाठ, मान यामध्ये आखडलेपण, वेदना, सूज इत्यादी. या वेदना मान किंवा पाठीतून सुरु होऊन संपूर्ण शरीरात पसरतात. एकाच ठिकाणी खूप वेळ बसणं जसजसे कठीण होतं तसे हा त्रास पुन्हा पुन्हा होतो. 


कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या व्यक्ती एकाच स्थितीत तासंतास बसतात. अशा स्थितीत त्यांच्या संपूर्ण शरीरापैकी केवळ हातांच्या पेशी सक्रिय असतात. त्या सुद्धा साधारण एकाच स्थितीत. सतत कंबर वाकवून बसण्याने रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. 
123rf.com
आपल्या दुखण्याचे कसं संरक्षण कराल? 
पाठदुखी किंवा अंगदुखीच्या त्रासापासून सहजपणे वाचण्यासाठी काही सोप्या उपायांची अंबलबजावणी नक्कीच करता येते. कंबर ताठ ठेवून बसा. एका स्थितीत खूप वेळ काम करणं टाळा. पूर्ण काम माऊसवर करण्यापेक्षा कीबोर्डचाही अधूनमधून वापर करा. दर अर्ध्या तासाने ताठ उभे रहा आणि मान गोलाकार डाव्या उजव्या बाजूला फिरवा.

ऑफिसमध्ये सतत उभे राहणे शक्य नसल्यास दर अर्ध्या तासाला हात ताठ करून त्यांना झटका द्या, तर दर तासाने एक चक्कर मारा. 
freeimages.com
फक्त कॉम्प्युटरसमोर बसणाऱ्या आणि एकाच जागी बसून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे नियम लागू आहेत. हे सगळे नियम पाळले तर वेदना दूर पळतील शिवाय हा त्रासही कधी होणार नाही.

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract? खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेल...