रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे काय आहेत फायदे

रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे काय आहेत फायदे

भारतीय मसाल्याचे पदार्थ औषधी आहेत, हे आपण जाणतोच. मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने समाविष्ट होणारी लवंग आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. 

atharvaworld.com
लवंग एखाद्या पदार्थामध्ये टाकली की त्यामुळे पदार्थाला उत्तम सुगंध येतो. लवंग हा असाच एक मसाल्याचा औषधी पदार्थ. लवंग दिसायला अगदी छोटीशी असली. तरी त्याचे औषधी गुणधर्म जबरदस्त आहेत. जर तुम्ही दिवसांतून 2 लवंग रोज खाल्ले तर त्याचा होणारा फायदा हा अतिशय महत्वाचा आहे. 1) लवंग हा मसाल्याच्या पदार्थामधील एक जिन्नस आहे. मसाल्याप्रमाणे काही गोडाच्या पदार्थांमध्येही लवंग वापरली जाते. तिखट चवीची लवंग आरोग्याला फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळणंदेखील आरोग्याला फायदेशीर ठरते.

  • 2) हिवाळ्याच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळल्यास शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते. सोबतच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. रक्तामध्ये विषारी घटक असतात.

  • 3) नियमित लवंग चघळल्याने दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. दातदुखी होत असल्यास लवंग दाताखाली पकडून त्यामधील अर्क तोंडाचे आरोग्य सुधारते. पोटाचे अनेक विकार, समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी लवंग फयादेशीर ठरते.

  • 4) सायनसपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायनस असणाऱ्यांनी रोज ३-४ चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेतल्यामुळे इंफेक्‍शन दूर होईल आणि श्वास घेताना होणारा  त्रास कमी होईल.

  • 5) लवंगाच्या सेवनाने शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर लवंग पोटाच्या अनेक तक्रारी जसे गॅस, जळजळ, अपचन आणि उलट्या होणे यांसारख्या तक्रारींवर गुणकारी असते. तसेच लवंगाच्या सेवनाने अॅसिडिटीवरही आराम मिळतो. 

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याचे दुष्परीणाम

Disclaimer

I do not intend to violet infringe the rights of the author/publisher of this article/book or copyright or any other rights by publishing the excerpt from their original work. This paragraph is a taken from the respective published material only with the view to inspire or motivates our readers. We expressed our sincere thanks to author/publisher for their support.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या