या ५ पदार्थांनी आपण आपल्या शरिरातील प्लेटलेट्स वाढवू शकतो

या ५ पदार्थांनी आपण आपल्या शरिरातील प्लेटलेट्स वाढवू शकतो

जस जसे वातावरण बदलते तसे ह्या बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार अधिक प्रमाणात आपल्या चहूबाजूला आपल्याला पसरताना दिसून येतात. या वातावरणात अशा आजारांशी दोन हात करणं बऱ्याच वेळेला काही लोकांना कठीण जातं. आपल्या सर्वांना हे माहीतच असेल की डेंग्यू झाल्यावर शरीरातील ब्लड प्लेटलेट्स अधिक प्रमाणात घटतात परंतु जर तुम्ही खाली दिलेले पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट केलेत तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. 
बीट  
बीटाच्या रसात अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडेन्ट असल्यामुळे शरीरातील प्रतिकार क्षमता चांगल्या प्रमाणात वाढते. जर दोन ते तीन दिवस बीटाचा ग्लासभर रस आपण प्यायलात तर ब्लड प्लेटलेट्स अधिक वाढण्याची शक्यता दिसून येते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, फ्लोवेनॉइड्स आणि बेटासायनिन असते. 
behealthready.com
पपई आणि पपईच्या पानांचा रस 
जर आपल्याला आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या ब्लड प्लेट्स वाढल्या पाहिजेत ज्यासाठी पपई अत्यंत उपयुक्त फळ आहे. पपई नुसता किंवा त्याच्या ज्यूस जरी आपण करून प्यायलात तरी ते आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर आहे. जमल्यास पपईच्या पानांचा रस घेतला तरी तो अत्यंत उपयुक्त आहे. पपईची पाने पाण्यात उकळून ते पाणी प्यावं. हे पाणी साधारण ग्रीन टी प्रमाणेच लागते. 
freepik.com
दुधी भोपळ्याचा रस 
भोपळ्याच्या रसामध्ये 2 चमचे मध घालून प्यायल्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत.
lokmat.com
गुळवेल 
गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. गुळवेलाचा ज्यूस आपल्या शरीरातील ब्लड सेल्स वाढवण्यास चांगल्या प्रकारे मदत करतात. पण जर आपण डेंग्यू झाल्यावर दररोज याचे सेवन केले तर यामुळे ब्लड प्लेट्स वाढून आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 
लाल फळे आणि भाज्या 
टोमॅटो, टरबूज, चेरी यासारखी फळे आणि भाज्या खाल्यामुळे विटामिन आणि मिनिरल्ससोबतच आपल्या संपूर्ण शरीरात अॅन्टी ऑक्सिडेंट्सची मात्रा वाढण्यास मदत होते शिवाय आपल्या शरीरातील ब्लड प्लेटलेट्स देखील वाढण्यास मदत होते. 
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या