रात्रीच्या जेवणातील 'या' चूकांमुळे वाढतो लठ्ठपणा

रात्रीच्या जेवणातील 'या' चूकांमुळे वाढतो लठ्ठपणा

आपल्या सर्वानाच माहित आहे की, आपले आरोग्य हे आपल्याच आहारावर अवलंबून असते. आपल्या प्रत्येक दिवसाची सुरूवात ही पोटभर नाश्ता करून झाली पाहिजे, संतुलित पोषण आहाराचा दुपारच्या जेवणामध्ये समावेश आणि रात्रीचे जेवण पचायला हलके व दिवसापेक्षा कमी प्रमाणात घेतले पाहिजे.
freepik.com


अशाप्रकारे पौष्टिक व संतुलित आहार योग्य वेळेवर घेतल्यास आपले शारीरिक स्वास्थ चांगले राखायला मदत होते. परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनात हे चक्र बरोबर उलटं झालेले आपल्याला आढळून येते. खूप जण वेळ नसल्यामुळे सकाळचा नाश्ताच करत नाहीत, दुपारी खूप कमी प्रमाणात खाल्लं जात आणि रात्री उशिरा जास्त प्रमाणात पचायला जड असं जेवण घेतलं जातं. आपल्या ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर मात्र विपरीत परिणाम होताना आढळून येतात.
थोडक्यात काय, जेवण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यामुळे आपलं वजन अतिरिक्त वाढतं. तसेच अनेक शारीरिक समस्याही निर्माण होतात. म्हणूनच आहारात योग्य बदल करणे आवश्यक आहे, तसेच रात्रीच्या आहारात विशेष काळजी घेणं गरजेचे आहे. वजन कमी करण्याचा मानस असल्यास रात्रीच्या जेवणातील पुढील गोष्टीची काळजी घ्या.
रात्रीच्या जेवणात 'या' चूका नकोच !  
१) रात्रीची झोप व जेवण ह्यामध्ये योग्य अंतर आवश्यक
आपले रात्रीचे जेवण आणि झोप ह्यामध्ये किमान 2 तासांचे तरी अंतर असायला हवे. जेवल्यावर लगेच झोपल्यास अन्न नीट पचत नाही. अन्न नीट पचले नाही तर अपचन, पित्त, गॅस, ब्लोटिंगचा त्रास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणात व झोपेत योग्य अंतर राखणे गरजेचे आहे.
cyberguy.com
२) रात्रीच्या जेवणात अति खाणं व पचायला जड पदार्थ टाळा 
रात्रीच्या जेवणात फ्राईड राईस, बिरयाणी, पिझ्झा असे पचायला जड  असलेल्या पदार्थांवर ताव मारणं आरोग्याला हानिकारक ठरू शकते. आहारात संतुलित पोषक घटकांचा तोल सांभाळणं गरजेचे आहे. म्हणून रात्रीच्या जेवणात शक्यतो पचायला हलके असेलेले पदार्थ असणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळेस रिफाईन्ड फूड्स व हवाबंद डब्यातील पदार्थ खाणं टाळा.
freeimages.com
३) रात्रीचं जेवण वेळेत तयार न होणं
खूप जण दिवसभर दमल्यामुळे रात्रीचं जेवण बनवायला कंटाळा करतात. बऱ्याचदा मग हॉटेलमधून ऑर्डर केलेले जेवण जेवलं जाते, त्यामुळे वजनात वाढ होण्यास मदत होते. म्हणूनच रात्री जेवणात काय बनवायचं हे आधीपासून ठरले असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल व त्याप्रमाणे तुम्ही आधीच भाज्या व तत्सम सामुग्री आणून ठेवू शकता.
४) रात्री मद्य आणि कॅफिनयुक्त द्रव पदार्थ घेणं टाळा.
आपल्या झोपेचे चक्र मद्य, कॅफिनयुक्त द्रव पदार्थांमुळे बिघडते. अतिरिक्त साखर आणि कॅफिनयुक्त पदार्थांमुळे झोपवर विपरीत परिणाम होतो. झोप अनियमित झाल्यामुळे अतिरिक्त वजन वाढ, मधुमेह, उच्च रक्तदाब इ. आजारांना निमंत्रण मिळते.

nbcnews.com 
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या