झोप पूर्ण न झाल्यास पुरुषांना होऊ शकतात असे गंभीर आजार

झोप पूर्ण न झाल्यास पुरुषांना होऊ शकतात असे गंभीर आजार

आपल्यापैकी अनेकांना हे माहीतच असेल की झोप पूर्ण न झाल्याने आपल्याला विविध मानसिक आणि शारीरिक त्रास होतात. रात्रीची सलग ७ ते ८ तास झोप आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची असते हे डॉक्टरही नेहमी आपल्याला सांगत असतात. 

lokmat.com
अर्थातच जर रोजच्या रोज अशाप्रकारे झोप पूर्ण झाली नाही तर आपल्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. संशोधनातून असे निष्पन्न झाले आहे की पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. 

काय म्हणतात अभ्यासक?
जी लोकं दिवसभरात खूप जास्त व्यस्त असतात अशा लोकांसाठी झोपणे वेळ घालवण्यासारखे असू शकते. पण तज्ञांच्या अभ्यासानुसार, कमी झोप घेणाऱ्यांना भविष्यात हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता अधिक होऊ शकते.
झोप पूर्ण न होण्याची लक्षणे-
१) मधुमेहाचा धोका
जे लोक रात्री ५ तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोप घेतात अशा पुरुषांमध्ये हाय ब्लडप्रेशर, मधुमेह, जाडेपणा, कमी शारीरिक हालचाली ह्या सर्व बाबी सामान्यपणे आढळून येतात. तसेच तज्ञांच्या अभ्यासातून असेही समोर आले की, झोप पूर्ण होणे फार गरजेचे आहे. तसे न झाल्यास ते त्या व्यक्तीसाठी भविष्यात अत्यंत घातक ठरू शकते. 
freeimages.com
२) जाडेपणा
जर आपली झोप पूर्ण झाली नाही तर आपल्या शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण असंतुलित होते. त्यामुळे अशा व्यक्तीला खासकरून कॅलरी फूड खाण्याची इच्छा होते आणि पण जास्त कॅलरी असलेल्या पदार्थांमुळे आरोग्य तर बिघडतंच सोबतच वजन वाढण्याची समस्याही वाढते.
३) लैंगिक समस्या
आजकालच्या बऱ्याच तरुण मुलांना दिवसभराच्या कामाच्या व्यापामुळे रात्रीची झोप पूर्ण मिळत नाही परिणामी रोजची झोप कमी झाल्याने तरुणांना अनेक लैंगिक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.  
४) त्वचेसंबंधी समस्या
जर रात्रीची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला त्वचेसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण कमी झोपेमुळे त्वचेसंबंधी निर्माण झालेली समस्या रोजच्या कमी झोपेमुळे लवकर बरी होण्यास वेळ लागतो. 

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या