शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

वारंवार जांभई येणं देते या '4' आजारांचे संकेत

वारंवार जांभई येणं देते या '4' आजारांचे संकेत

साधारणपणे आपल्यापैकी सर्वांनाच झोपेतून उठल्यावर, थकल्यानंतर किंवा कंटाळा आला की जांभई येते. 
freeimages.com
मात्र काही लोक असेही आहेत ज्यांना रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसभरात वारंवार जांभाई देण्याची सवय असते. 

जांभई येणे ही केवळ कंटाळा आल्याचे संकेत देते असे नाही तर तज्ञांच्या मते यामागे काही आरोग्याशी निगडीत समस्यांचा धोकाही काही वेळेला असू शकतो ज्याकडे आपण वेळीच लक्ष दिले पाहिजे. आपल्या शरीरात रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असणाऱ्या काही आजारांच्या धोक्याचे संकेत देखील ह्या सतत येणाऱ्या जांभई मधून मिळत असतात. म्हणूनच जर आपल्यालाही सतत जांभाई येत असेल तर काही आजारांचा धोका वाढतोय का? हे तुम्ही वेळीच तपासून बघितले पाहिजे. 
कोणत्या आजारांचा असू शकतो धोका ? 
१. एखाद्या व्यक्तीचं यकृताचे (लिव्हर) कार्य बिघडले असेल तर अशा व्यक्तीला दिवसभरात सतत थकवा जाणवत राहतो.
freeimages.com
ह्या अशा सततच्या होणाऱ्या थकव्यामुळे जांभई येण्याचं प्रमाण देखील जास्त प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही संबंधित त्रासाबद्दल वेळीच डॉक्टरांशी सल्ला मसलत करणे योग्य ठरेल. 
२. तज्ञांच्या एका अभ्यासात असे निर्दशनास आले आहे की जर एखाद्या व्यक्तीला, हृद्य आणि फुफ्फुसाचा आजार असेल तर अशा आजारामध्येही जांभई येण्याचं प्रमाण अधिक असू शकते. हृद्य आणि फुफ्फुसाचं काम नीट होत नसेल तर कालांतराने दम्याचा (अस्थमाचा) त्रास वाढू शकतो. 
drughealth.in
३. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका संशोधनानुसार असे निर्दशनास आले आहे की, ज्यांना वारंवार जांभई येते अशांना ब्रेन ट्युमर असू शकतो कारण ब्रेन ट्युमरमध्ये पिट्युटरी ग्लॅन्डवर ताण येऊन परिणामी जांभई येण्याचं प्रमाण सातत्याने वाढत जाते.  
healthunbox.com
४. सततच्या ताणतणावामुळे देखील अनेकांना रक्तदाबाचा त्रास जाणवतो. अनियमित रक्तदाबामुळे  हृद्याची धडधड मंदावून मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही. सतत येणाऱ्या जांभई द्वारा तोंडावाटे श्वास घेतला तर मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. पण ह्यावर वेळीच उपाय करणेही गरजेचे आहे. 
 
freeimages.com

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract? खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेल...